आपली त्वचा ही अनेक थरांनी बनलेली असते या थरांमध्ये नवे नव्या पेशी सतत बनत असतात आणि नष्ट होत असतात अनेकदा हे डेट सेल्स त्वचेच्या वरच्या थरावर जमा होतात आणि ज्यामुळे चेहरा निस्तेज दिसू लाग तो म्हणूनच त्वचेवर वरचेवर स्क्रब करणं गरजेचं असतं. स्क्रबिंग केल्यावरच त्वचा अॅक्टिव्ह होते आणि इतर प्रोडक्ट्स योग्य प्रकारे शोषून घेऊ शकते, परंतु अनेकदा स्क्रब करताना आपण मोठ्या चुका करतो. ज्यानंतर त्याचे साइड इफेक्ट्स आपल्या चेहऱ्यावर दिसून येतात. अनेक वेळा पार्लरमध्येही चुकीच्या पद्धतीने एक्सफोलिएशन केले जाते, त्यामुळे चेहऱ्याचा बाहेरचा थर खराब होतो आणि पिंपल्ससारखे डाग आता दिसू लागतात. आज आपण जाणून घेणार आहोत की स्क्रब करण्याची योग्य पद्धत कोणती आहे तसेच स्क्रबिंग किती वेळ करावं तेही जाणून घेऊया.

स्क्रब किती वेळा वापरावा हे तुमच्या त्वचेच्या प्रकारावर अवलंबून असते.

Alum Cleaning Hacks
घरातील फरशी चकाचक करण्यासाठी तुरटी आहे अत्यंत फायदेशीर; जाणून घ्या सोप्या टिप्स
Eknath Shinde on Ladki Bahin Yojana Sixth installment
महायुतीला सत्ता मिळाली, लाडक्या बहिणींना २१०० रुपये कधीपासून…
Is Dandelion Tea Really Beneficial
कंबरदुखीपासून सुटका मिळवण्यासाठी डँडेलियन चहा खरंच फायदेशीर आहे का? वाचा, तज्ज्ञांचे मत…
Tips To Measure Your Blood Pressure
Tips To Measure Your Blood Pressure : रक्तदाब तपासण्याची योग्य पद्धत कोणती, हात कसा ठेवावा? अचूक रीडिंग टाळण्यासाठी डॉक्टरांनी सांगितल्या ‘या’ टिप्स
Video Story Of Ravindra Dhangekar And Devendra Fadnavis.
Ravindra Dhangekar: “निवडणूक हरत असल्याचे लक्षात येताच…” फडणवीसांच्या ‘ॲक्सिडेंटल आमदार’ टीकेला धंगेकरांचे प्रत्युत्तर; पाहा व्हिडिओ
14th November Daily Astrology in Marathi
१४ नोव्हेंबर पंचांग: वैकुंठ चतुर्दशीला मेष ते मीनपैकी कोणाच्या डोक्यावर असेल श्रीहरी व महादेवाचे कृपाछत्र; वाचा तुमचे राशिभविष्य
How many times you should wash your bedsheets cleaning tips to wash your sheets
तुम्ही तुमची बेडशीट महिन्यातून किती वेळा धुता? जाणून घ्या स्वच्छ करण्याच्या ‘या’ सोप्या टिप्स

आठवड्यातून जास्तीत जास्त दोन वेळा स्क्रबिंग करणे योग्य मानले जाते. स्क्रबिंग करण्यासाठी बोटावर स्क्रब घ्या आणि त्याला चेहऱ्यावर सर्क्युलर मोशनमधे अप्लाय करा. आणि चेहऱ्यावर स्क्रबिंग फक्त दोन ते तीन मिनिटेच करा. जास्त स्क्रबिंग केल्याचे चेहऱ्याची बाहेरची त्वचा डॅमेज होऊ लागते. स्क्रबिंग केल्यानंतर चेहऱ्याला थंड्या पाण्याने धुवून घ्या. अनेक स्त्रिया अपूर्ण माहितीअभावी बऱ्याच वेळ चेहऱ्यावर स्क्रब अप्लाय करतात. पार्लरमधेसुद्धा १० मिनिटांपर्यंत स्क्रबिंग केली जाते. याचे फायदे कमी आणि नुकसान तुम्हाला जास्त झाल्याचे दिसून येईल. तुमच्या त्वचेची आऊटर लेयर डॅमेज व्हायला लागते.

किती वेळ स्क्रबिंग करणे योग्य

१. जर तुमची त्वचा तेलकट असेल तर तुम्ही आठवड्यातून २-३ वेळा स्क्रब करू शकता.

२. ज्यांची त्वचा संवेदनशील आहे त्यांनी आठवड्यातून १ ते २ वेळा स्क्रब वापरावा.

३. स्क्रबिंग करताना चेहरा जोरात घासणार नाही याची काळजी घ्या, असे केल्याने त्वचेला जळजळ होऊ शकते.

४. स्क्रबिंगनंतर मॉइश्चरायझर लावायला विसरू नका, यामुळे त्वचा हायड्रेट आणि निरोगी राहील.

हेही वाचा >> उन्हाळ्यात दररोज मिठाचं पाणी प्यायल्यानं काय होतं? ६ आश्चर्यकारक फायदे; चांगल्या तब्येतीचा सोपा फंडा

काही स्क्रब तुम्ही घरीही बनवू शकता

टोमॅटो स्क्रब

त्वचेचे टॅनिंग दूर करण्यासाठई हे स्क्रब खूप फायदेशीर आहे. एक चमचा वाटलेले टोमॅटो घ्या आणि त्यामध्ये एक चमचा साखर मिसळा आणि चेहऱ्यावर स्क्रब करा. टोमॅटोचे तुकडे साखरमध्ये टाकून चेहऱ्यावर चोळा.

पपई स्क्रब

जर तुम्हाला तुमच्या चेहऱ्यावर मोठे खड्डे दिसले, हे व्हाईटहेड्स आहेत, तर तुम्ही हा फेस स्क्रब बनवून लावू शकता. पपईच्या गरामध्ये एक चमचा साखर आणि एक चमचा लिंबाचा रस मिसळून हा स्क्रब तयार करता येतो.