शहरांमध्ये प्रत्येक घरामध्ये कपडे धुण्यासाठी आज वॉशिंग मशीनचा सर्रास वापर केला जातो. ही मशीन वापरणे अत्यंत सहज-सोपे असल्यामुळे सर्वजण त्याचा वापर करतात. पण कपडे धुताना वॉशिंगमशीनमध्ये किती डिटर्जंट पावडर टाकावी हे कदाचित तुम्हाला माहित नसेल. लोकांना वाटते की, जर कपडे खूप जास्त खराब असतील तर जास्त पावडर टाकायची आणि कमी खराब असेल तर कमी पावडर टाकायची. पण हे अगदी चुकीचे आहे. जर तुम्ही कपडे धुताना योग्य प्रमाणात वॉशिंग पावडर वापरली नाही तर तुमचे कपडे पूर्णपणे खराब होऊ शकतात.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

जास्त पावडर टाकल्यास काय होते?

कपडे धुताना तुम्ही मशीनमध्ये जास्त प्रमाणात डिटर्जंट पावडर टाकल्यास ते तुमचे कपडे खराब करू शकतात. यामुळे तुमच्या कपड्यांचा रंग फिका पडू शकतो, कपडे धुतल्यानंतरही पांढरे-पांढरे डाग दिसू शकतात जे खूप घाणेरडे दिसतात. यासोबतच कपडे धुताना जास्त डिटर्जंट पावडर वापरल्यामुळे तुमच्या कपडे लवकर खराब होतात.

हेही वाचा : संत्री-लिंबाच्या तुलनेत आवळ्यामध्ये ९ पट जास्त असते व्हिटॅमिन सी, जाणून घ्या त्याचे फायदे

वॉशिंग मशिनमध्ये किती पावडर टाकावी

वॉशिंग मशिनमध्ये कपडे धुताना किती पावडर टाकावी हे तुम्हाला कोणत्याही डिटर्जंट पावडरच्या पॅकेटवर लिहिलेले दिसेल. यामध्ये स्पष्टपणे लिहिले आहे की, जर तुम्ही रोज वापरलेले कपडे धुत असाल तर वॉशिंग मशिनमध्ये 150 ग्रॅम डिटर्जंट पावडर टाका. दुसरीकडे, जर तुमच्या कपड्यांवर डाग पडले असतील किंवा ते खूप घाणेरडे असतील, तर ते धुण्यासाठी तुम्ही वॉशिंग मशिनमध्ये किमान 225 ग्रॅम डिटर्जंट पावडर टाका.

हेही वाचा : कोरफड जेलपासून खोबरेल तेलापर्यंत, काही मिनिटांत मेकअप काढून टाकतात हे ६ सोपे घरगुती उपाय

वॉशिंग मशीन मोठे असल्यास काय करावे

वर नमूद केलेले आकडे त्या वॉशिंग मशिनसाठी आहेत, ज्या सामान्यत: घरांमध्ये वापरल्या जातात. पण तुमचे कुटुंब मोठे असेल किंवा तुम्ही लाँड्री करता तर तुम्ही कपडे धुण्यासाठी किती डिटर्जंट पावडर वापराल? वास्तविक, वर नमूद केल्याप्रमाणे डिटर्जंट पावडरचे प्रमाण कपड्यांच्या वजनावर अवलंबून असते. घरात वापरल्या जाणार्‍या वॉशिंग मशिनमध्ये एकावेळी ७ ते ९ किलो कपडे धुतले जातात, तर मोठी वॉशिंग मशीन यापेक्षा जास्त कपडे धुतात. तुम्हाला फक्त कापड्याच्या प्रमाणानुसार डिटर्जंट पावडरचे प्रमाण वाढवावे लागेल.

मराठीतील सर्व लाइफस्टाइल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: How much detergent powder to use for washing clothes in the washing machine snk
Show comments