Truth About Eggs And Cholesterol: अंडी खाणे प्रत्येकाला आवडते. बहुतेक घरांमध्ये, नाश्त्यामध्ये अंड्यांचा समावेश केला जातो. अंड्यापासून वेगवेगळे चवदार पदार्थ देखील तयार केले जातात. म्हणूनच रविवार असो वा सोमवार अंडी रोज खावीत असे म्हटले आहे. आपण दररोज १ ते २ अंडी खाणे आवश्यक आहे. पण दररोज अंडी खाणे हृदयासाठी चांगले आहे का? अंडी खाल्ल्याने हृदयविकाराचा धोका वाढतो का? जर तुम्ही हृदयाचे रुग्ण असाल तर तुम्ही दिवसातून किती आणि किती अंडी खाल्ली पाहिजेत? चला जाणून घेऊया याबद्दलची माहिती…
एनसीबीआयच्या अहवालानुसार, एका दिवसात २ अंडी खाल्ल्याने लठ्ठपणा कमी होतो. रोज अंडी खाल्ल्याने शरीरातील लाल रक्तपेशी वाढतात. अंडी खाल्ल्याने शरीराला प्रथिने आणि जीवनसत्त्वे मिळतात. त्यामुळे बराच वेळ भूक लागत नाही. निरोगी व्यक्तीने दररोज २ अंडी खावीत असे अनेक संशोधनात म्हटले आहे. मात्र, अनेक अहवालांमध्ये असेही म्हटले आहे की अंड्यांमध्ये इतर पदार्थांपेक्षा जास्त कोलेस्ट्रॉल असते.
( हे ही वाचा: लैंगिक संबंध ठरतंय गर्भाशयाच्या कर्करोगाचे प्रमुख कारण? दरवर्षी ६७ हजार महिलांचा होतो मृत्यू, अशाप्रकारे घ्या काळजी)
अंड्यांमध्ये कोणते पोषक घटक आढळतात
एक अंड्यामध्ये सुमारे ७५ कॅलरीज, ५ ग्रॅम फॅट, ६ ग्रॅम प्रथिने, ० कार्बोहायड्रेट, ७० ग्रॅम सोडियम, ६७ मिलीग्राम पोटॅशियम आणि २१० मिलीग्राम कोलेस्ट्रॉल आढळते. अंडी व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन डी आणि व्हिटॅमिन बी १२ चा चांगला स्रोत आहे. अंड्यांमध्ये कोलीन देखील आढळते, जे मेटाबॉलिजम करण्यास मदत करते.
अंडी खाल्ल्याने कोलेस्ट्रॉल वाढते का?
उच्च कोलेस्टेरॉल असलेल्या रुग्णांमध्ये हृदयाच्या समस्यांचा धोका वाढतो, ज्यामुळे तुमचा जीव धोक्यात येऊ शकतो. अनेक संशोधनांमध्ये असे आढळून आले आहे की अंड्यांमध्ये आढळणारे कोलेस्ट्रॉल शरीरावर कोणताही परिणाम करत नाही. मात्र हे तुम्ही अंडी कशाप्रकारे खाता यावर अवलंबून आहे. जर तुम्ही अंडी भरपूर तेलात किंवा बटरमध्ये बनवून खात असाल तर या दोन गोष्टी मिळून नुकसान करू शकतात.
( हे ही वाचा: तुमच्या ‘या’ वाईट सवयींमुळे वाढू शकतो कॅन्सरचा धोका; वेळीच बदला नाही तर उद्भवू शकते मोठी समस्या)
हृदयरोगींनी किती आणि कशी अंडी खावीत?
हृदयरोगी दिवसातून एक अंडे खाऊ शकतात.मात्र खाताना अंड्याचा फक्त पांढरा भाग खाण्याचा प्रयत्न करा. यामुळे कोलेस्टेरॉल वाढणार नाही आणि शरीराला प्रोटीन मिळेल. जर तुम्ही अंडी जास्त प्रमाणात खात असाल तर अंड्यातील पिवळ बलक खाऊ नका. अंडी उकळवून किंवा अगदी कमी बटरमध्ये बनवून खाण्याचा प्रयत्न करा. अंडी हृदयासाठी हानिकारक असतात हा गैरसमज आहे.