Bollywood celebrities’s Fitness costs : सेलिब्रिटी लोक नेहमी त्यांच्या फिटनेसची काळजी घेतात. निरोगी जीवनशैली आणि पोषक आहार घेत ते फिट राहण्याचा प्रयत्न करतात. पण, तुम्हाला माहितीये का सेलिब्रिटी मंडळी फिटनेससाठी किती रुपये खर्च करतात? लल्लनटॉप सिनेमाला नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत सोनू सूद, तमन्ना भाटिया आणि कंगना रणौत यांसारख्या सेलिब्रिटींना ट्रेनिंग देणारा सेलिब्रिटी फिटनेस ट्रेनर योगेश भटेजा यांनी सेलिब्रिटींच्या फिटनेस खर्चाविषयी सांगितले.

सेलिब्रिटी फिटनेससाठी किती पैसे खर्च करतात?

बॉलीवूड सेलिब्रिटी फिटनेसवर महिन्याला किती रुपये खर्च करतात, याविषयी सांगताना भटेजा यांनी खुलासा केला की, “खर्च खूप असतो, पण दरमहा दोन ते पाच लाखांच्यादरम्यान असू शकतो. याला कोणतीही मर्यादा नाही. त्यांच्या डाएटसह दरमहा दोन-पाच लाखांच्या दरम्यान त्यांना खर्च येतो.”

फिटनेस प्लॅनमध्ये डाएट ही महत्त्वाची भूमिका बजावतात आणि अनेक सेलिब्रिटी ब्लूबेरी, ॲव्होकॅडो आणि ऑरगॅनिक प्रोटिन्स इत्यादी सुपरफूड खातात, ज्यामुळे अधिक खर्च वाढतात. भटेजा पुढे सांगतात की, “हे सूपरफूड जरी फायदेशीर असले तरी ते प्रत्येक व्यक्तीने सेवन करणे आवश्यक नाही. डाळिंब आणि अंडीसारखे परवडणारे पर्याय शरीराला समान पौष्टिक घटक पुरवू शकतात. ”

स्पेशलाइज्ड डाएटला सोडून, सेलिब्रिटी ट्रेनर्स भरमसाठ फी घेतात. भटेजा सांगतात की सरासरी सेलिब्रेटी फिटनेस ट्रेनर प्रत्येक सेशनला जवळपास ३ ते ५ हजार कमावतो. हा आकडा त्यांचा अनुभव, ते हाताळत असलेल्या क्लायंटची संख्या आणि ते कसे ट्रेनिंग देतात इत्यादी घटकांवर अवलंबून असतो.

लक्झरी फिटनेस स्टुडिओ आणि जिम हे नवनवीन उपकरणे, प्रायव्हसी आणि लक्झरी सेवांसाठी ओळखले जाते, यामुळेसुद्धा खर्च वाढतो. व्यस्त दीनचर्येमुळे सेलिब्रेटी अनेकदा वन टू वन ट्रेनिंग सेशन, कस्टमाइज्ड वर्कआउट प्रोग्राम्स आणि घरी जिम सेटअपची निवड करतात.
सेलिब्रिटी खूप लवकर शारीरिक बदल मिळवण्याचा प्रयत्न करतात. वजन कमी करण्यासाठी ओझेम्पिकचा वापर आणि बॉडी बिल्डिंगसाठी स्टेरॉइड्सचा वापर करतात. अचानक वजन कमी करणे आणि एका आठवड्यात बॉडी तयार करणे शक्य नाही. अशावेळी सेलिब्रिटी आणि त्यांचे ट्रेनर बाहेरची मदत घेत असतील तर त्यांना त्याचे परिणाम आरोग्यासाठी खूप धोकादायक ठरू शकतात.

सेलिब्रेटी जरी त्यांच्या फिटनेससाठी लाखो रुपये खर्च करत असले तरी भटेजा सांगतात, “फिट राहण्यासाठी जास्त खर्च करण्याची गरज नाही. परवडणारे, पौष्टिक आहार आणि नियमित वर्कआउटवर लक्ष केंद्रित करा. लक्झरी जिमचे सदस्य होण्यापेक्षा किंवा महागडे सूपरफूडचे सेवन करण्यापेक्षा सातत्य आणि स्मार्ट निवडीवर भर द्या. ”

Story img Loader