How Much Space Between Fridge And Wall Needed : मुंबई, पुण्यासारख्या मोठ्या शहरांमध्ये फ्रिज नसलेली घरं सापडणं आजच्या जमान्यामध्ये तसं फार कठीण. अनेक घरांमध्ये फ्रिज किचनमध्येच ठेवला जातो मात्र काही घरांमध्ये जागेच्या उपलब्धतेनुसार एखाद्या रुममध्ये अथवा हॉल आणि किचनच्या दाराजवळ फ्रिज ठेवला जातो. पण फ्रिज भिंतीपासून सुरक्षित अंतरावर ठेवणं फार महत्त्वाचं असतं हे तुम्हाला ठाऊक आहे का? याचबद्दल आपण जाणून घेऊयात…

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

अनेकजण फ्रिजमुळे वीज बिल येतात म्हणून आरडाओरड करत असतात पण तुम्हाला माहिती आहे का कधी कधी आपल्या चुकीमुळेच वीज बिल जास्त येतं. फ्रिज अन् भिंतीमध्ये असलेल्या अंतरावरुनही कधी कधी वीज बिल कमा जास्त येतं. तुम्ही म्हणाल, हे कसं शक्य आहे? पण हे खरंय. अनेकजण फ्रिज वापरतात पण फ्रिजला भिंतीपासून किती दूर ठेवावे, याविषयी कुणालाही फारसं माहिती नसतं. आज आपण त्या विषयीच जाणून घेणार आहोत. चला तर जाणून घेऊयात.

फ्रिजला भिंतीपासून किती दूर ठेवावे

तुम्ही कुठेही फ्रिज पाहिला असेल तर तो भिंतीला चिटकवून ठेवल्याचं दिसून येतं. मात्र असं केल्याने आपल्या खिशाला कात्री लागू शकते. त्यामुळे फ्रिज अगदी भिंतीला खेटून ठेवू नये. फ्रिज भिंतीपासून किती दूर ठेवावा यासंदर्भात काही अलिखित नियम आहेत. एक्सपर्ट्सच्या मते फ्रिज हा भिंतीपासून ६ ते १० इंच दूर ठेवला पाहिजे. असं का सांगितलं जातं हे सविस्तर जाणून घेऊयात. तुम्ही कधी जवळून पाहिलं असेल तर तुम्हालाही माहिती असेल की, या सर्व प्रक्रियेमध्ये फ्रिजच्या मागील बाजूस असलेल्या ग्रीलच्या माध्यमातून उष्ण हवा बाहेर फेकली जाते. त्यामुळेच फ्रिज अगदी भिंतीला चिटकवून ठेऊ नये असं सांगितलं जातं.

वीज बिलात कसा फरक पडतो?

जर तुम्ही फ्रिजला भिंतीच्या जवळ ठेवता तर गरम हवा व्यवस्थित बाहेर पडत नाही. अशात फ्रिजला आतून थंड होण्याच्या प्रोसेसला वेळ लागतो. यामुळे तुमचं वीज बिलही वाढू शकतं कारण या प्रोसेस दरम्यान अतिरीक्त विजेचा वापर होतो. त्यामुळे तुम्ही तुमचा फ्रिज भिंतीच्या ६-१० इंचच्या अंतरावर ठेवायला हवे. पण सोबतच आणखी एक गोष्ट लक्षात ठेवा ती म्हणजे, फ्रिजला कधीच हीटर किंवा कोणत्याही गरम वस्तूजवळ ठेवू नये.

हेही वाचा >> रात्री झोपण्याआधी फक्त एकदा फ्रिजमध्ये चहाची गाळणी फिरवा; पहिल्याच महिन्यात अर्ध्यापेक्षा कमी येईल वीज बिल

फ्रिजसंदर्भातील या छोट्या गोष्टींची काळजी घेतली तर तो कमी खर्चामध्ये म्हणजेच वीजेचं बिल आणि मेन्टेन्समध्ये अधिक चांगली सेवा देतो. यामुळे तुमच्या वीज बिलात मोठा फरक तुम्हाला पाहायला मिळेल आणि पैसेही वाचतील.