Heart Health: सध्या हृदयाशी संबंधित आजार झपाटयाने वाढत आहेत. हृदयाच्या आरोग्यावर परिणाम करणारे अनेक आजार आहेत आणि ते जगभरातील मृत्यूचे सर्वात मोठे कारण ठरले आहेत. डब्ल्यूएचओच्या अहवालानुसार, हृदयविकारामुळे दरवर्षी सुमारे २० दशलक्ष लोकांचा मृत्यू होतो. त्यामागील सर्वात मोठी कारणे म्हणजे अनहेल्दी अन्न, शारीरिक हालचालींचा अभाव, तंबाखू आणि अल्कोहोलचा हानिकारक वापर ही सगळी मुख्य कारण आहेत. मात्र, चांगली बातमी अशी आहे की बहुतेक हृदयरोग टाळता येऊ शकतात. हा धोका कमी करण्याचा एक सोपा मार्ग म्हणजे चालणे. एका नवीन अभ्यासात असे आढळून आले आहे की फक्त काही मिनिटे चालणे हृदयविकाराचा धोका लक्षणीयरीत्या कमी करू शकते. तर जाणून घेऊया दिवसातून किती वेळ चालल्याने हृदयविकाराचा धोका कमी होऊ शकतो.
हार्वर्ड मेडिकल स्कूलच्या संशोधनानुसार, दिवसातून फक्त २१ मिनिटे चालल्याने हृदयविकाराचा धोका ३० टक्क्यांनी कमी होतो. हे आठवड्यातून अडीच तास चालण्यासारखे आहे. जर तुम्ही दररोज याचे योग्य प्रकारे पालन केले तर ते वजन, रक्तदाब आणि कोलेस्ट्रॉल कमी करण्यास, स्मरणशक्ती वाढवण्यास आणि हृदयरोग, मधुमेह आणि कर्करोगाचा धोका कमी करण्यास देखील मदत करू शकते.
( हे ही वाचा: Swine Flu: करोनाच्या मध्येच आता स्वाईन फ्लूने वाढवली लोकांची चिंता; जाणून घ्या त्याची लक्षणे, उपचार आणि प्रतिबंधाच्या पद्धती)
चालण्याने हृदयाचे आरोग्य कसे सुधारते?
अमेरिकन हार्ट असोसिएशन (एएचए) च्या मते, चालणे हा हृदयाच्या आरोग्यासाठी सर्वोत्तम व्यायामांपैकी एक आहे. हे केवळ ऊर्जा वाढवण्यास मदत करत नाही तर याने कोलेस्ट्रॉल आणि रक्तदाब पातळी देखील सुधारते. या व्यतिरिक्त, संशोधनात असे दिसून आले आहे की चालण्याने मधुमेह, विशिष्ट कर्करोगाचा धोका कमी होऊ शकतो आणि हाडांची घनता देखील राखली जाऊ शकते. तसंच तज्ज्ञांचा असा विश्वास आहे की चालण्यामुळे तणाव कमी होतो, जो हृदयविकाराचा एक प्रमुख जोखीम घटक आहे.
पाहा व्हिडीओ –
चालण्याचे इतर फायदे काय आहेत?
हृदयविकार, पक्षाघात, उच्च रक्तदाब, कर्करोग आणि टाईप २ मधुमेह यांसारखे अनेक आजार चालण्याने टाळता येतात. यासोबतच चालण्याने हृदयाची तंदुरुस्ती वाढते, हाडे आणि स्नायू मजबूत होतात, ऊर्जा पातळी वाढते आणि शरीराचे वजन निरोगी राहते.
( हे ही वाचा: Mansoon Tips: पावसाळ्यात ‘हे’ घरगुती उपाय सर्दी आणि ताप कमी करतील; रोगप्रतिकारक शक्ती देखील होईल मजबूत)
हृदयविकाराचा धोका कमी करण्यासाठी आणखी काय करावे लागेल?
- सीडीसीच्या मते, भरपूर ताजी फळे आणि भाज्यांचे सेवन हृदयविकाराचा धोका कमी करू शकतात.
- तसंच प्रक्रिया केलेल्या पदार्थांचे सेवन कमी करणे महत्त्वाचे आहे.
- ज्या पदार्थांमध्ये सॅच्युरेटेड फॅट्स आणि ट्रान्स फॅट्स जास्त असतात ते हृदयाच्या आरोग्यासाठी चांगले नसतात.
- हृदयाच्या आरोग्यासाठी निरोगी वजन राखणे महत्त्वाचे आहे.
- याशिवाय धुम्रपान, मद्यपानापासून दूर राहणेही हृदयाच्या आरोग्यासाठी महत्त्वाचे ठरते.