Water Intake According Weight: पाणी म्हणजेच ज्याला आपण जल असे म्हणतो. या पृथ्वीवरील सर्व पशु पक्षांचे आणि माणसाचे जीवन हे पाण्यावरच अवलंबून आहे त्यामुळे पाण्याला जीवन असे सुद्धा म्हणतात. आपले शरीर हे ६५ ते ७० टक्के पाण्याने भरलेले आहे. शरीरातील प्रत्येक अवयवाला कार्य करण्यासाठी पाण्याची आवश्यकता असते. आपल्या शरीरातील अवयवांची अंतर्गत कार्यप्रणाली व्यवस्थित चालू राहण्यासाठी पाणी खूप महत्त्वाचे असते. पाण्या अभावी ही कार्य प्रणालीत बिघाड होऊ शकतो. त्यामुळे दिवस भरात जास्तीत जास्त पाणी पिणे आवश्यक आहे. मात्र, तुम्हाला माहिती आहे का, तुम्ही दिवसाला किती प्रमाणात पाणी प्यावे, हे तुमच्या वजनावर अवलंबून असते. शरीराच्या वजनानुसार पाण्याची गरज जाणून घेण्याची एक पद्धत आहे आणि हे जाणून घेणं खूप सोपं आहे.
- कोणी किती पाणी प्यावे?
भरपूर पाणी प्यावे, असे आपण नेहमी ऐकतो. पण भरपूर म्हणजे नेमकं किती पाणी प्यावे, ते कळत नाही. आणि भरपूर पाणी पिण्याच्या नादात आपण जास्तीचे पाणी पिऊन बसतो. जे आरोग्यास चांगले नसते. तसेच बरेच लोक एकाच वेळी दोन दोन ग्लास पाणी पितात. यामुळे ही शरीराला त्रास होऊ शकतो. त्यामुळे आपले वय आणि वजन किती आहे, याचा विचार करून मग त्या हिशोबाने पाणी पिले पाहिजे.
प्रत्येकाच्या वयानुसार पाण्याची गरज वेगवेगळी असते. १५ वर्षे वय पर्यंतच्या मुलांनी साधारणपणे एक ते दोन लिटर पाणी पिले पाहिजे. प्रौढ व्यक्तींनी तीन ते चार लिटर पाणी दररोज प्यावे. ज्यांचे वय ६० वर्षे पेक्षा जास्त आहे अश्या व्यक्तींनी तीन लिटर पर्यंत पाणी प्यावे.
तसेच २५ किलो वजनाच्या व्यक्तीने चार ते पाच ग्लास पाणी पिणे आवश्यक असते. त्याच प्रमाणे ५० किलो वजनाच्या व्यक्तीने दिवसातून आठ ग्लास पाणी पिणे आवश्यक आहे. मेहनतीचे काम करणाऱ्यांनी व गरोदर स्रियांनी या पेक्षा थोडे म्हणजे एक दोन ग्लास जास्त पाणी पिल्यास चालते.
(आणखी वाचा : Measles Disease: लहान मुलांमध्ये गोवरचा उद्रेक, ‘अशी’ घ्या काळजी!)
- वजनानुसार पाणी पिण्याचे सूत्र
प्रथम तुमचे वजन मोजा. एकदा शरीराचं वजन (किलोग्रॅममध्ये) तपासलं गेल्यानंतर त्या संख्येला ३० ने भागायचं. येणारी संख्या ही रोज किती लीटर पाणी प्यायला हवं याची गणना आहे. म्हणजेच, या सूत्रानुसार, आपल्याला समजेल की, शरीराच्या वजनानुसार आपण दररोज किती लिटर पाणी प्यावं. समजा वजन ६० किलो असेल तर ते ३० ने भागाकार केल्यास २ ही संख्या मिळेल. म्हणजेच, ६० किलो वजनाच्या व्यक्तीने दररोज २ लिटर पाणी प्यावं. जर वजन ५० किलो असेल तर १.६ लिटर (१ लिटर आणि ६०० मिली) पाणी प्या. आरोग्य तज्ज्ञांच्या मते, जर तुम्ही योग्य प्रमाणात पाणी प्यायले तर ते वजन कमी करण्यातही मदत करेल. पाण्यात कॅलरीज नसतात. म्हणजेच जितके जास्त पाणी प्याल तितके वजन कमी होईल आणि शरीर हायड्रेटेड राहील.
- पाणी पिण्याची योग्य पद्धत काय आहे ?
– पाणी नुसते पिऊन उपयोग नसतो, ते योग्य पद्धतीने प्यायले पाहिजे. पाणी पिताना नेहमी एका जागी बसून प्यावे. उभे राहून, चालतांना, किंवा गटागट पाणी पिऊ नये.
– हळू हळू एक एक घोट पाणी प्यावे. तसेच जर तुम्ही खूप तहानलेले असाल तर एकदम पाणी न पिता, एक ग्लास आत्ता व दुसरा ग्लास एक तासाने प्यावे.
– तसेच पाणी काही ठराविक वेळी पिल्यास त्याचे शरीराला चांगले फायदे मिळतात. जसे की सकाळी उठल्यावर लगेच ब्रश न करता एक ते दोन ग्लास पाणी प्यावे. यामुळे शरीर हायड्रेट होते व पित्ताचा त्रास होत नाही. त्यानंतर जेवणाआधी न जेवणा नंतर एक ग्लास पाणी प्यावे. डोके दुखत असेल तर पाणी प्या.
पाणी किती महत्वाचे आहे ते आपल्या सर्वांना समजले असेलच. त्यामुळे दररोज भरपूर पाणी प्या व निरोगी आयुष्य जगा.