Coconut oil benefits : केस काळे करण्यासाठी लोक सामान्यतः केमिकल हेअर डाय वापरतात. जे काही मिनिटांत तुमचे केस काळे तर करतातच पण केसांनाही नुकसान पोहोचवतात. जेव्हा तुम्ही घरगुती उपाय वापरता तेव्हा तुमचे केस नैसर्गिकरीत्या मुळांपासून काळे होतील आणि केस पांढरे होणार नाही. आज आम्ही तुम्हाला केसांना खोबरेल तेल कसे लावायचे याबद्दल सांगणार आहोत ज्यामुळे तुमचे केस नैसर्गिकरित्या काळे होतील.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

केसांना नारळाचे तेल कसे लावायचे –

केसांचे पोषण वाढवण्यासाठी तुम्ही नारळाच्या तेलाचा वापर हेअर मास्क म्हणून करू शकता. यासाठी प्रथम २ चमचे खोबरेल तेल घ्या, नंतर त्यात १ चमचा कोरफडीचे जेल आणि १ चमचा मध मिसळा आणि केसांना लावा. आता हा मास्क रात्रभर राहू द्या. त्यानंतर सकाळी उठून शॅम्पूच्या मदतीने केस धुवा.

हेही वाचा- तुमची मुलं विनाकारण वाद घालतात अन् समजावले तरी शांत होत नाही का? पालक म्हणून तुम्ही कसे वागावे, जाणून घ्या

खो बरेल तेल केसांसाठी खूप फायदेशीर ठरू शकते.हे तेल लावल्याने कोंड्याची समस्या कमी होईल आणि केसांचा नैसर्गिक रंगही परत येण्यास सुरुवात होईल. हे स्कॅल्पला मॉइश्चरायझ करण्याचेही काम करते. त्याच्या नियमित वापराने केस लांब, दाट आणि मजबूत होतात.

हे स्कॅल्प इन्फेक्शन टाळण्यासाठी देखील काम करते. तुम्ही खोबरेल तेलात कढीपत्ता मिक्स करून केसांना लावू शकता. यामध्ये अँटिऑक्सिडेंट्स भरपूर असतात, ज्यामुळे केस निरोगी राहण्यास मदत होते. आम्ही तुम्हाला सांगतो की कढीपत्ता तुमच्या केसगळतीच्या समस्येपासून देखील आराम देईल.

हेही वाचा – Coconut Peel : नारळाच्या शेंड्या फेकून देताय? पण त्याचे आहेत अनेक फायदे, कसा करू शकता त्यांचा वापर, जाणून घ्या

अँटी-मायक्रोबियल आणि अँटीऑक्सिडंट गुणधर्मांसोबत, कॅल्शियम, पोटॅशियम, मॅग्नेशियम, व्हिटॅमिन सी यांसारखे आवश्यक पोषक तत्त्वे नारळाच्या तेलात आढळतात, जे तुम्हाला निरोगी ठेवण्यासाठी आवश्यक आहेत.