Never Apply Perfume On These Body Parts : टिपटॉप कपडे, स्टायलिश वॉच व मॅचिंग सँडलप्रमाणे तुमच्या लूकला पूर्णत्व देणारा परफ्यूमसुद्धा (Perfume) तितकाच गरजेचा ठरतो. परफ्यूम लावल्याने शरीराला चांगला सुगंध येतो. चांगला वास मूड फ्रेश ठेवून, व्यक्तीला आत्मविश्वास देऊन जातो. म्हणून आपण संपूर्ण कपड्यांवर पाहिजे तितका परफ्यूम स्प्रे करतो. पण, परफ्यूम हे रसायन वापरून बनवले जाते. परफ्यूमचा योग्य रीतीने वापर केला नाही, तर त्यामुळे अनेक शारीरिक समस्यांचा त्रास होऊ शकतो. त्यामुळे शरीराच्या कोणत्याही भागावर परफ्यूम लावणे योग्य नाही.
तर या बातमीतून आपण शरीराच्या कोणत्या भागावर परफ्यूम (Perfume) वापरू नये याबद्दल जाणून घेऊ…
१. परफ्यूममध्ये अल्कोहोल आणि इतर रसायने असतात. त्यामुळे चेहरा आणि डोळ्यांजवळ चुकूनही परफ्यूम मारू नये.
२. अंडरआर्म्सवर परफ्यूम वापरणे टाळा. कारण- त्यामुळे त्वचेची जळजळ होऊ शकते किंवा त्वचेवर पुरळ येऊ शकते. खासकरून जर तुम्ही अलीकडेच केस काढले असतील तर…
३. शरीराच्या खासगी भागांभोवती परफ्यूम (Perfume) लावणे टाळावे. त्यामुळे चिडचिड किंवा त्रास होऊ शकतो.
४. खरचटले असेल (स्क्रॅच) किंवा जखम झाली असेल अशा ठिकाणी परफ्यूम लावू नका. त्यामुळे चिडचिड आणि वेदना होऊ शकतात.
५. तोंड आणि नाक या अवयवांवर परफ्यू लावणे टाळा. परफ्यूममुळे हानिकारक रसायने शरीरात जाऊन शरीराला हानी पोहोचू शकते.
६. पोट आणि नाभीच्या (बेंबी) सभोवतालच्या त्वचेवर परफ्यूम लावल्याने जळजळ होऊ शकते, विशेषतः जर तुमची त्वचा संवेदनशील असेल तर…
७. कानाच्या आत किंवा आजूबाजूला परफ्यूम लावल्याने जळजळ आणि त्रास होऊ शकतो. कानाच्या मागे जर तुम्हाला आवडत असेल, तर परफ्यूम लावता येतो.
परफ्यूम (Perfume)लावताना संभाव्य त्रास कसा टाळायचा?
१. दाढी केल्यानंतर लगेच परफ्यूम लावू नका. कारण- परफ्यूममधील रसायनांमुळे त्वचेची जळजळ होऊ शकते.
२. तुम्ही नवीन परफ्यूम लावणार असाल, तर छोट्या भागावर थोडा परफ्यूम स्प्रे करून चाचणी (पॅच टेस्ट) घ्या. हे तुम्हाला परफ्यूमची ॲलर्जी आहे की नाही हे ओळखण्यास मदत करेल.
३. परफ्यूमच्या बाटलीचे नोझल (nozzle) स्वच्छ आणि बंद ठेवा. त्यामुळे धूळ किंवा जीवाणू त्यात प्रवेश करणार नाहीत. त्यासाठी परफ्यूम वापरल्यानंतर झाकण व्यवस्थित बंद करा.
४. चांगल्या दर्जाचे परफ्यूम खरेदी करा. स्वस्त, बनावट परफ्यूममध्ये हानिकारक रसायने असू शकतात; ज्यामुळे इन्फेक्शन होते.
५. खुल्या आणि हवेशीर ठिकाणी परफ्यूम लावा; जेणेकरून श्वासोच्छवासाचा त्रास टाळता येऊ शकतो.
६. आवश्यकतेपेक्षा जास्त परफ्यूम वापरू नका. जास्त प्रमाणात परफ्यूम वापरल्याने त्वचेचे संक्रमण होऊ शकते.
मनगट, मान, कानाच्या मागे व कोपर यांसारख्या अवयवांवर लावा. त्यामुळे परफ्यूमचा सुगंध जास्त काळ टिकतो आणि तुम्हाला फ्रेश वाटते.