Kitchen jugad: मित्रांनो, दूध ओतू जाऊन गॅस, ओटा खराब झाला म्हणून तुम्हाला घरच्यांचा ओरडा खावा लागतो का? असे असेल तर हा लेख तुमच्यासाठी एक मोठा रिलीफ आहे. आज आम्ही तुम्हाला अगदी सोप्या ६ ट्रिक्स सांगणार आहोत. ज्यामुळे ह्या समस्येवरचं उत्तर, हमखास तुम्हाला मिळेल. आपण स्वयंपाकघरात काहीतरी काम करत असतो. एकीकडे गॅसवर दूध तापायला ठेवलेलं असतं. आता दूध तापत आलंय, एका मिनिटात गॅस बंद करायचाय अशी आपल्या मेंदूने नोंद पण घेतलेली असते. पण तितक्यात काहीतरी कारणाने क्षणभरासाठी आपण वळतो आणि भसाभस दूध ऊतू जातं…
काय ओळखीचा वाटतोय ना हा प्रसंग? घराघरात नेहमीच घडणारी ही गोष्ट, घरातल्या गृहिणींना मात्र त्रस्त करते. परंतु असे होऊ नये म्हणून आज आम्ही तुम्हाला काही ट्रिक्स सांगणार आहोत ज्यामुळे तुम्ही दूध ऊतू जाण्यापासून वाचवू शकाल. चला तर मग जाणून घेऊया एक सोपी ट्रिक…याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झालंय.
तुम्हाला अगदी सोपा घरगुती उपाय करायचा आहे आणि तेही एकही पैसा खर्च न करता. तसेच तुम्हाला यासाठी फक्त एक चमचा लागणार आहे. या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, एक चमचा दुधाच्या पातेल्या टाकायचा आहे. फक्त एक लक्षात ठेवा हा चमचा पूर्ण तळाला जाता कामा नये. तर तो पातेल्यात आडवा अडकला पाहिजे. याचा परिणाम असा की दूध जेव्हा उकळून वर तेव्हा चमचा अडथळा ठरतो आणि दुध पातेल्यातच उकळत राहतं. त्यामुळे गृहिणींनो आता दूध ऊतू जायचं टेन्शन नाही. आता बिंधास्त राहा.
पाहा व्हिडीओ
हेही वाचा >> VIDEO: किचनमध्ये उंदीर, मच्छर, झुरळांनी सुळसुळाट घातलाय? फक्त २ रुपयांच्या कापूर गोळीचा ‘असा’ वापर करा
तुम्ही सुद्धा हा जुगाड घरच्या घरी अगदी एकही रुपया खर्च न करता करून पाहू शकता. तुमहीही ही ट्रिक वापरा आणि याचा तुम्हाला फायदा होतो का हे आम्हाला नक्की कळवा.