हळुहळु वाढणाऱ्या थंडीमुळे हिवाळ्याला सुरूवात झाल्याचे जाणवत आहे. हिवाळ्यात बदलणाऱ्या वातावरणामुळे सर्दी, खोकला असे आजार बळावतात. नेहमी असणारे प्रदूषण, त्यात हिवाळ्यात पडणारे धुके, वातावरणात होणारे बदल यांमुळे श्वसनाचे आजार असणाऱ्या व्यक्तींना अधिक त्रास होतो. त्यामुळे त्यांना या दिवसात आरोग्याची विशेष काळजी घेण्याचा सल्ला दिला जातो. हिवाळ्यामध्ये होणाऱ्या आजारांपासून वाचण्यासाठी काही फळं मदत करतात, कोणती आहेत ती फळं जाणून घ्या.

संत्री
हिवाळ्यात शरीराला ‘विटामिन सी’ ची गरज भासते कारण यामुळे सतत होणाऱ्या सर्दीपासून सुटका मिळवण्यास मदत होते. संत्र्यामध्ये ‘विटामिन सी’ भरपूर प्रमाणात आढळते. तसेच यामध्ये फोलेट, पोटॅशिअमचेही उत्तम स्रोत मानले जाते. त्यामुळे हिवाळ्यात सतत होणाऱ्या सर्दीपासून वाचण्यासाठी डाएटमध्ये संत्र्यांचा समावेश करणे फायदेशीर ठरेल.

What to do if rain water gets in the car
कारमध्ये पावसाचे पाणी गेल्यास काय कराल? ‘या’ टिप्स करा फॉलो
How to protect your skin from common infections during monsoon Tips
पावसाळ्यात त्वचेच्या आणि केसांच्या समस्या त्रास देऊ शकतात; ‘या’ उपायांनी मिळवा लगेच आराम
Benefits Of Drinking Tulsi Water
तुळशीचे पाणी पिण्याचे अमृतासमान फायदे वाचा; सर्वाधिक फायद्यांसाठी कसे करावे सेवन? वाचा आहारतज्ज्ञांचा स्पष्ट सल्ला
World Health Organization
मद्यपान, अमली पदार्थांचे सेवन करताय? जागतिक आरोग्य संघटना काय म्हणतेय जाणून घ्या…
how to drive on hill roads
पावसाळ्यात घाटात गाडी चालवताना जरा जपून; सुखरूप प्रवासासाठी पाळा हे नियम….
How to Reduce Underarms Fats Exercise
काखेजवळील फॅट्स, दंडाखालील चरबी कमी करण्याचे सोपे व्यायाम वाचा; डॉ. मेहतांचा सल्ला वापरून स्लिव्हलेस घाला बिनधास्त
Essential motorcycle gear to carry during monsoon rides
पावसाळ्यात फिरायला जाताय? मग अशी करा तयारी; ‘या’ गोष्टींकडे दुर्लक्ष करणं पडू शकतं महागात
weight gain and exercise
झटपट वजन कमी करण्यासाठी उच्च तीव्रतेचा व्यायाम केल्यामुळेही वाढू शकतं वजन? तज्ज्ञ काय सांगतात…

आवळा
आवळा शरीरातील रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यास मदत करते. तसेच यामध्ये भरपूर प्रमाणात अँटिऑक्सिडंट आढळतात ज्यामुळे डोळे, केस, त्वचा यांमधील कोरडेपणा कमी होण्यास मदत मिळते.

आणखी वाचा : वजन कमी करण्यासाठी ‘हे’ पदार्थ करतात मदत; लगेच करा रोजच्या जेवणात समावेश

काळी द्राक्ष
काळ्या द्राक्षांमध्ये देखील ‘विटामिन सी’ भरपूर प्रमाणात आढळते आणि हिवाळ्यात काळी द्राक्ष सगळीकडे उपलब्ध होतात. त्यामुळे यांचा डाएटमध्ये समावेश करणे फायदेशीर ठरेल.

गाजर
गाजर देखील हिवाळ्यात सगळीकडे मोठ्या प्रमाणात उपलब्ध होते. हे डोळ्यांच्या आरोग्यासाठी उपयुक्त मानले जाते. तसेच यामध्ये प्रोटीन, फायबर, कार्बोहायड्रेट्स अशी पोषकतत्वे आढळतात.

(येथे देण्यात आलेली माहिती घरगुती उपचार आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. अधिक माहितीकरिता तज्ञांचा सल्ला घ्या.)