भारतीय पद्धतीने जेवण बनवताना त्यात हमखास कांद्याचा वापर केला जातो. कांदा नसेल तर आपल्याला तो पदार्थच अपूर्ण वाटतो. तर काहींना जेवणाबरोबर कच्चा कांदा खायलाही भरपुर आवडते. कांदा प्रत्येक स्वयंपाक घराचा अविभाज्य भाग आहे असे म्हणायला हरकत नाही. पण कांदा वापरायचा असेल तर एक मोठी अडचण जाणवते, ती म्हणजे कांदा कापताना डोळ्यातून येणारे पाणी. कांदा कापताना डोळ्यातून येणाऱ्या पाण्यामुळे आपल्याला त्रास होतो, काही जणांना तर हा त्रास कांदा कापून झाला तरी काही वेळासाठी होतो. त्यामुळे अनेकजण कांदा कापण्याचे टाळतात. यावर काही उपाय करता येऊ शकतात.
काही सोपे उपाय करून कांदा कापताना डोळ्यातून येणारे पाणी टाळता येऊ शकते. कोणते आहेत ते उपाय जाणून घ्या.
आणखी वाचा: दही खाणे कोणी टाळावे? जाणून घ्या दह्याचे Side Effects
कांदा कापताना वापरा या ट्रिक्स–
फ्रिज किंवा मायक्रोवेवमध्ये ठेवा
कांदा कापण्यापुर्वी तो फ्रिज किंवा मायक्रोवेवमध्ये ठेवा. कापण्यापुर्वी कांदा १५ मिनीटांसाठी फ्रिजमध्ये ठेवल्यास त्यातील ऍसिड एंजाइमचे प्रमाण कमी होते. ज्यामुळे तो कापताना डोळ्यातून पाणी येत नाही. तसेच कांदा कापण्यापुर्वी ४५ सेकंदापर्यंत मायक्रोवेवमध्ये ठेवल्यासही कांदा कापताना डोळ्यातून पाणी येत नाही.
आणखी वाचा: चहा करून पावडर फेकून देताय? त्याचे फायदे जाणून तुम्हीही व्हाल आश्चर्यचकित
च्विंगम किंवा ब्रेड खा
कांदा कापताना ब्रेडचा एक तुकडा तोंडात ठेवल्यास किंवा च्विंगम खाल्यास डोळ्यातून पाणी येत नाही.
चष्मा वापरा
कांदा कापताना चष्मा वापरल्यास डोळ्यांची जळजळ होणार नाही. तसेच कांदा कापताना नाकाऐवजी तोंडाने श्वास घ्या यामुळे गॅस डोळ्यांपर्यंत पोहोचणार नाही आणि डोळ्यांची जळजळ होणार नाही.
कांदा कापताना मेणबत्ती लावा
कांदा कापताना त्याजवळ मेणबत्ती लावा, यामुळे कांद्याचा गॅस मेणबत्तीकडे जाईल आणि त्याचा डोळ्यांना त्रास होणार नाही.
आणखी वाचा: घराच्या खिडकीत कबुतरांनी मांडलाय उच्छाद? ‘या’ सोप्या ट्रिक्स वापरून लगेच पळवून लावा
चाकूवर लिंबाचा रस लावा
कांदा कापताना डोळ्यातून पाणी येऊ नये यासाठी चाकूवर लिंबाचा रस लावा. लिंबाचा रस लावल्याने कांदा कापताना डोळ्यातून पाणी येणार नाही.
व्हिनेगर वापरा
व्हिनेगर वापरल्याने कांद्यातील गॅस काढण्यास मदत मिळते. यासाठी पाण्यात थोडे मीठ आणि व्हाईट व्हिनेगर टाकून नीट मिसळा. त्यानंतर कांदा सोलून या मिश्रणात टाका. काही वेळाने हा कांदा कापल्यास डोळ्यातून पाणी येणार नाही.