Parenting: मुलं लहानपणापासून वडिलांना पाहून त्यांच्यासारखे होण्याचे स्वप्न पाहत मोठे होतात. त्याच्या अनुपस्थितीतही ते वडिलांची जागा भरून काढण्याचा प्रयत्न करतात. सामान्यतः असे दिसून येते की, जर वडिलांच्या काही चांगल्या सवयी असतील तर त्या मुलांमध्ये देखील दिसून येतात आणि जर वडिलांना काही वाईट सवयी असतील तरीही मुलं त्यादेखील त्यांना स्वीकारू लागतात. अशा परिस्थितीत, वडिलांनी आपल्या मुलांना कोणत्या प्रकारची व्यक्ती बनवत आहाता याची विशेष काळजी घेणे आवश्यक आहे. तुमची मुलं इतरांची काळजी घेणारी, दयाळू आणि आदरणीय व्यक्ती बनू इच्छित असल्यास, तुम्हालाही त्या सवयी असणे महत्त्वाचे आहे.

वडिलांच्या सवयीतून मुलगा शिकतो


चूक मान्य करणे

वडील हे कुटुंबप्रमुख असल्याचे अनेकदा दिसून येते. संपूर्ण घर त्याला घाबरते आणि त्याच्या चुकांची माफी मागते. पण, वडील क्वचितच कोणाची माफी मागताना दिसतात. असे वडील होऊ नका. तुमच्या चुकांबद्दल माफी मागणारी व्यक्ती व्हा जेणेकरून तुमच्या मुलांनाही समजेल की, माफी मागून कोणीही लहान किंवा मोठा होत नाही, ही खूप सामान्य गोष्ट आहे.

ias saikiran nandala upsc
विड्या विकून आईनं बनवलं मुलाला IAS अधिकारी, UPSC परीक्षेत मिळवला २७ वा क्रमांक; वाचा अनोखी यशोगाथा
Who is Jaydeep Apte in Marathi
Jaydeep Apte : जयदीप आपटेला पोलिसांनी हाक मारली, रडत गयावया करु लागला आणि म्हणाला; “मला…”
children sexual assault in schools marathi news
शहरबात: समित्या आहेत, सुसंवादाचं काय?
Honey Singh Opens Up About drugs addiction,| Honey Singh Opens Up About Mental Health
अमली पदार्थांचे सेवन, करिअरला लागलेली उतरती कळा; गायकाने सांगितला वाईट काळाचा अनुभव
Parents silent actions affect children
पालकांच्या निशब्द कृतीचा फटका
Shev Paratha Recipe in marathi how to make
मुलांच्या डब्यासाठी सकाळच्या घाईत झटपट बनवा शेव पराठा; ही घ्या सोपी मराठी रेसिपी
What does your eye discolouration say about your health? Dark Circles Solution
तुमच्या डोळ्यांचा रंग तुमच्या आरोग्याबद्दल काय सांगतो? जाणून घ्या डॉक्टर काय सांगतात…
Boy hold poster of fathers love in front of school video goes viral
VIDEO: शाळेबाहेर तरुणानं झळकवली अशी पाटी की लहान मुलेही थांबून विचार करायला लागली; पाटीची सोशल मीडियावर तुफान चर्चा

अहंकाराला प्रोत्साहन देऊ नका
वडील म्हणून तुम्ही तुमच्या मुलांना अंहकारी बनवू नका हे खूप महत्वाचे आहे. तुमच्या मुलांनाही अशा सवयी लागू नयेत म्हणून तुम्हाला स्वतःचा अहंकार दूर ठेवावा लागेल.

हेही वाचा – Parenting Tips: मुलांना चांगले संस्कार देण्यासाठी प्रत्येक आईला माहीत असल्या पाहिजेत ‘या’ महत्त्वाच्या गोष्टी

प्रेम व्यक्त करा
जेव्हा वडिलांच्या मनात आपल्या कुटुंबाबद्दल आणि विशेषत: आपल्या मुलांबद्दल प्रेमाची भावना असते . पण जेव्हा वडील ते प्रेम व्यक्त करतात तेव्हा मुलं देखील प्रेम व्यक्त करणारी व्यक्ती बनतो. तो असा माणूस बनत नाही जो त्याच्या भावनांनी निराश होतो.

सर्वांचा आदर करणे
घरात कोणीही लहान असो वा मोठा, तो आदरास पात्र असतो. मुलं वडिलांकडून ज्या गोष्टी शिकतात, त्यामध्ये त्यांचा आदर करायला शिकणंही महत्त्वाचं आहे. जेव्हा एखादा पिता आपल्या मुलाचा, मुलीचा, पत्नीचा, त्याच्या आईचा आणि वडिलांचा आदर करतो, तेव्हा हा गुण मुलांमध्येही येतो.

हेही वाचा –Mental Health Special: गेमिंग आणि पॉर्नची एकमेकांना संगत?

इतरांचे म्हणणे ऐका
अनेकांना त्यांचे विचार कसे मांडायचे हे माहित असते पण फार कमी लोक त्यांचे ऐकतात. तुम्ही बसून सर्वांचे म्हणणे ऐकून समजून घेतले तर तुमच्या मुलांनाही हीच सवय लागेल. ते त्यांचे मत लादण्याऐवजी सर्वांचे ऐकण्याचा प्रयत्न करतील.