How To Buy Best Tomatoes: टोमॅटोशिवाय भारतीय किचन अपूर्ण आहे. कोणताही पदार्थ बनवण्यासाठी मग तो व्हेज असो वा नॉनव्हेज, ग्रेव्हीसाठी टोमॅटोचा वापर केलाच जातो. टोमॅटोने जेवणाला एक वेगळीच चव येते. इतकंच नव्हे तर अनेक आजारांसाठी सुद्धा टोमॅटोचे सेवन गुणकारी मानले जाते. टोमॅटो हा अनेक रूपात वापरला जातो म्हणजे समजा तुम्हाला सॅलेड मधून टोमॅटो खायचा असेल तर बेबी साईज टोमॅटो उत्तम ठरतात किंवा जर तुम्हाला चटणी करायची असेल तर हिरव्या टोमॅटोला प्राधान्य दिले जाते. याच विविध प्रकारांमुळे अनेकदा टोमॅटो खरेदी करताना आपण गोंधळून जातो. विशेषतः उन्हाळयात टोमॅटोमध्ये अनेकदा कीड सापडण्याची शक्यता असते. हीच तक्रार दूर करण्यासाठी आज आपण बेस्ट टोमॅटो कसा ओळखावा याच्या काही सोप्या टिप्स पाहणार आहोत. चला तर मग…

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

ताजे टोमॅटो कसे ओळखावे? (How To Buy Fresh Tomatoes)

1)टोमॅटो दाबून पाहा: जेव्हा तुम्ही टोमॅटो खरेदी करता तेव्हा तो दाबून पाहा. टोमॅटो कडक असल्याने सहजासहजी सडत नाहीत आणि ते साठवायलाही सोपे असतात. इतकंच नव्हे तर कडक टोमॅटो बराच काळ ताजे राहतात.

2) लाल टोमॅटो: जेव्हा तुम्ही टोमॅटो खरेदी करता तेव्हा त्यांच्या रंगाचीही विशेष काळजी घ्या. पिवळे किंवा रंग नसलेले टोमॅटो कधीही खरेदी करू नका. टोमॅटो किंचित हिरवा आणि लाल असल्यास उत्तम.

3) बुरशी किंवा जाळी असलेले टोमॅटो टाळा: खरेदी करताना बुरशी किंवा किंचित जाळी असणारे टोमॅटो शक्यतो टाळा. बुरशी असणारे टोमॅटो खराब असल्यास इतर टोमॅटोंना सुद्धा सडवु शकतात. तर जाळी असणारे टोमॅटो हे सहसा अधिक पिकलेले असतात.

4) छिद्र पडलेले टोमॅटो घेऊ नका: टोमॅटो काळे असल्यास किंवा छिद्रे असल्यास, खरेदी करणे टाळा. अशा टोमॅटोमध्ये किडे असू शकतात किंवा ते आतून काळे असू शकतात.

5)मोठे टोमॅटो खरेदी करू नका: जर तुम्ही मोठे टोमॅटो विकत घेतले तर ते नैसर्गिकरित्या पिकण्याची शक्यता कमी असते. असे टोमॅटो कृत्रिम शेतीतून तयार केले जातात. त्यामुळे टोमॅटो मध्यम आकाराचे असतील असे पाहा.

हे ही वाचा<< संत्री गोड आहे की आंबट कसे ओळखाल? संत्र्यावर निसर्गाच्या ‘या’ पाच खुणा पाहून सेकंदात करा परीक्षा

फक्त टोमॅटोचं नाही तर फळभाज्या खरेदी करताना एक गोष्ट कायमलक्षात ठेवा जर तुम्ही लगेचच वापर करणार नसाल तर साठवून ठेवण्यासाठी भरपूर प्रमाणात खरेदी करू नका. फ्रीजमध्ये पडून राहिल्याने अनेकदा भाज्या खराब होतात.

मराठीतील सर्व लाइफस्टाइल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: How to buy best fresh tomatoes red and juicy or green five signs to check tomato while buying summer kitchen tips svs