How To Buying Perfect Matka In Summer : उन्हाळ्यात बाजारात साध्या माठापासून ते विविध डिझाइन आणि नळ जोडलेले माठ पाहायला मिळतात. हे रंगीत माठ बाहेरून दिसायला फारच आकर्षक वाटतात; पण त्यात पाणी गार राहीलच, असे नाही. अनेकदा आपण माठ खरेदी तर करतो; पण तो वापरल्यानंतर खूप जास्त पाझरतो किंवा गळू लागतो. अशा वेळी नैसर्गिक गार पाणी पिण्याचा आनंद मिळविण्याच्या नादात आपले पैसे वाया गेले, असे वाटते. त्यामुळे चांगला माठ खरेदी करताना नेमक्या कोणत्या गोष्टींची काळजी घेतली पाहिजे याविषयी जाणून घेऊ..
उन्हाळ्यात मातीचं माठ खरेदी करताना कोणत्या गोष्टींची काळजी घ्यावी? (How To Choose Perfect Matka Or Math For Summer)
१) माठाची गुणवत्ता तपासा
माठ खरेदी करता तेव्हा त्याची गुणवत्ता तपासा. तसेच पाणी थंड ठेवण्यासाठी नेहमी लाल आणि काळ्या रंगाच्या मातीचाच माठ खरेदी करा. पांढरे नक्षीदार किंवा वेगवेगळ्या रंगांचे माठ खरेदी करणे टाळा.
२) जाडी आणि वजन पहा
नेहमी जड आणि जाड माठ खरेदी करा. कारण- अशा माठात पाणी बराच काळ थंड राहते. तसेच जड माठ सहजासहजी फुटत नाही. तसेच माठ खरेदी करताना त्याच्यावर नेहमी थाप मारून वाजवून पाहा. थाप मारताच त्यातून मोठ्याने मजबूत आणि भरल्यासारखा आवाज येत असेल, तर तोच माठ खरेदी करा. बारीक, हलका आवाज येत असेल, तर तो माठ बिलकूल खरेदी करू नका.
३) माठ गळतोय की नाही तपासा
जेव्हा कधी तुम्ही माठ खरेदी करण्यासाठी जाल तेव्हा दुकानातच त्यात पाणी टाकून तो गळतोय की नाही हे तपासून घ्या. तसेच तो तळावर व्यवस्थित ठेवता येतोय ना हेही पाहा. त्याशिवाय त्यावर नळ व्यवस्थित बसवला गेला आहे की नाही, कुठे छिद्र तर पडले नाही ना हेही तपासा.
४) रंग आणि आकार
खूप चमकदार माठ खरेदी करणे टाळा. कारण- त्यात पाणी चांगले थंड होत नाही. असा माठ फक्त बाहेरून रंगवलेला असतो. तसेच मोठ्या आकाराचा माठ खरेदी करा; जेणेकरून तुम्हाला तो वारंवार भरावा लागणार नाही आणि त्यात पाणीही थंडगार राहील.
त्याशिवाय आजकाल नळ जोडलेले माठ मोठ्या प्रमाणात बाजारात उपलब्ध आहेत. शक्य झाल्यास तसे माठ खरेदी करा. कारण- त्यामुळे तुम्हाला पाणी काढण्यासाठी वारंवार माठ उघडावा लागणार नाही. त्याशिवाय पाणीही थंड आणि शुद्ध राहील.