Lip Care in Monsoon : पावसाळा सुरू झाला आहे. या हंगामामध्ये त्वचेसोबतच ओठांचीही काळजी घेणे आवश्यक असते. जर तुम्हीही फाटलेल्या ओठांनी त्रस्त असाल, तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. आपले ओठ सुंदर राहावेत यासाठी प्रत्येक जणत, विशेषत: स्त्रिया प्रयत्न करीत असतात. तेव्हा आम्ही तुम्हाला सुंदर व गुलाबी ओठ मिळवण्यासाठी काही खास टिप्स सांगणार आहोत.
एलोवेरा जेल
ही रेमेडी अवलंबण्यासाठी सर्वप्रथम अॅलोवेरा जेल, बदाम तेल व व्हिटॅमिन ई कॅप्सूल घ्या. मग या तिन्ही गोष्टी नीट एकत्र करून मिसळा. त्यानंतर हे द्रावण एका छोट्या काचेच्या बाटलीत किंवा कंटेनरमध्ये भरून ठेवा. हे द्रावण नियमितपणे तुम्ही ओठांवर लावल्यास तुम्हाला नक्कीच फायदा होईल.
खोबरेल तेल वापरा
सर्वप्रथम तुम्हाला तुमचे ओठ कोमट पाण्याने धुवावे लागतील. मग तुमचे ओठ कोरडे करा आणि मग हलक्या हातांनी तेल लावून मसाज करा. रात्रभर ओठांवर हे तेल राहू द्या. त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी ओठ कोमट पाण्याने धुवा. दोन दिवसांत तुम्हाला या उपायाचा परिणाम दिसून येईल.
नारळ आणि मध लिप स्क्रब
या उपायासाठी तुम्हाला अर्धा चमचा कोमट पाण्यात एक चमचा खोबरेल तेल, एक चमचा मध व दोन चमचे ब्राऊन शुगर हे घटक मिसळावे लागतील. या सर्व गोष्टी मिसळून, घट्ट पेस्ट बनवा. ही पेस्ट पाच मिनिटे ओठांवर राहू द्या आणि नंतर ते पाण्याने धुवा.
दुधाची साय
तुम्हालाही रुक्ष ओठांचा त्रास होत असेल, तर दुधाची साय तुमची यातून सुटका करू शकेल. रुक्ष ओठांवर दुधाची साय लावल्याने फायदा होतो.
कोरफड वापर
कोरफड ही त्वचेला हायड्रेट ठेवण्यास मदत करते. फाटलेले ओठ मऊ करण्यासाठी हा एक चांगला पर्याय ठरू शकतो. तुम्ही रात्री झोपण्यापूर्वी तुमच्या ओठांवर कोरफडीचे जेल लावू शकता. त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्यानंतर ते धुऊन टाका. काही दिवसांत तुम्हाला या समस्येतून आराम मिळेल.
बीट आणि गाजराचा रस
तुम्हाला जर ओठांवरचा काळपटपणा घालवायचा असेल, तर बीट व गाजराच्या रसाचा उपयोग करून ओठांचा काळेपणा घालवण्यासाठी एक छोटा चमचा बीट व गाजराचा रस आणि एक छोटा चमचा ई जीवनसत्त्वाची कॅप्सूल घ्यावी. एका छोट्या वाटीत बीट व गाजराचा रस काढून घ्यावा. त्यात ई जीवनसत्त्वाची कॅप्सूल फोडून टाकावी. हे मिश्रण एकजीव करून घ्यावे. हे मिश्रण रात्री झोपण्यापूर्वी ओठांना लावावे. हा उपाय नियमित केल्यास ओठ मऊ मुलायम तर होतातच; पण त्याशिवाय ओठांची लालीही वाढते.
हेही वाचा >> Nail Care Tips: पावसाळ्यात नखांची काळजी कशी घ्याल? जाणून घ्या सोप्या टीप्स
(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून, अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)
© IE Online Media Services (P) Ltd