Low Blood Pressure Symptoms : आजकाल अनेकांना ब्लड प्रेशरची समस्या जाणवते. केवळ वयस्कर व्यक्तीचं नाही तर तरुणांमध्येही ही समस्या दिसून येत आहे. ब्लड प्रेशरच्या समस्येमुळे ह्रदयाच्या आजारांचा धोका वाढतो. पण अनेक जण याला सामान्य समस्या समजून दुर्लक्ष करतात. यामुळे जगभरातील अनेक लोक या आजाराने त्रस्त आहेत. यात लो ब्लड प्रेशरची सामान्य लक्षणे म्हणजे चक्कर येणे किंवा आजारी पडणे.

पण लो ब्लड प्रेशरही सामान्य समस्या नाही, यावर वेळीच उपचार झाले नाही तर तुम्हाला ह्रदयविकार, स्ट्रोक, किडनी निकामी होण्यासह अनेक समस्या उद्भवू शकतात. पण लो ब्लड प्रेशरची समस्या घरच्या घरी सोडवली जाऊ शकते. यावर तुम्हाला काही घरगुती उपाय करावे लागतील. डॉक्टराकडूनही नेहमी रक्तदाब म्हणजेच बीपी तपासण्याचा सल्ला दिला जातो.

Miscarriages Frequently
स्त्री आरोग्य : वारंवार गर्भपात होतोय का?
What Sharad Pawar Said About Ladki Bahin Yojana
Sharad Pawar : “लाडकी बहीण योजनेमुळे महायुतीचं राज्य…
Advanced Artificial Intelligence Techniques for Flood Forecasting
कुतूहल : पुराच्या अंदाजासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता
behavior, offensive, past, someone behavior,
माणसं अशी का वागतात?
Driving a scooty in the wrong way
चुकीच्या पद्धतीने स्कुटी चालवल्याने उद्भवतील अनेक समस्या; ‘या’ टिप्स करतील मदत
Budh gochar 2024 mercury transit in tula horoscope
पैसाच पैसा! बुधाच्या तूळ राशीतील संक्रमणामुळे ‘या’ तीन राशींचे चमकणार नशीब; नोकरी, व्यवसायातून मिळू शकतो आर्थिक फायदा
increasing weight, health special, health,
health special : वाढत्या वजनाने मानसिकतेवर कसा परिणाम होतो?
how to become a loco pilot training to become loco pilot
चौकट मोडताना : हळूहळू सकारात्मक होणारा समाजाचा दृष्टिकोन

उन्हाळ्याच्या दिवसांत खा ‘हे’ पदार्थ; रोगप्रतिकारशक्ती वाढण्यासह होतील अनेक फायदे

ब्लड प्रेशर कमी होण्याची कारणे

१) डिहायड्रेशन

जेव्हा शरीराला पुरेसे पाणी मिळत नाही, तेव्ह रक्ताचे प्रमाण कमी होऊ लागते. यामुळे रक्तवाहिन्यांमधून रक्त पंप करण्यासाठी ह्रदयाला अधिक मेहनत घ्यावी लागते. यामुळे ब्लड प्रेशर कमी होते. डिहायड्रेशनची समस्या टाळण्यासाठी भरपूर पाणी प्या.

२) गर्भधारणा

गरोदरपणातही ब्लड प्रेशर अनेकदा कमी होताना दिसते. अशा परिस्थितीत विशेष काळजी घेणे गरजेचे आहे.

३) ह्रदयाशी संबंधित समस्या

ह्रदयाशी संबंधित समस्या शरीरातील रक्ताभिसरणात अडथळा निर्माण करतात. ज्यामुळे ब्लड प्रेशर कमी होते. जर हृदय त्याचे कार्य योग्यरित्या करत नसेल, तर ते शरीराच्या गरजा पूर्ण करण्यासाठी पुरेसे रक्त पंप करू शकत नाही, ज्यामुळे ब्लड प्रेशर कमी होऊ शकते.

४) पोषक तत्वांचा अभाव

शरीरास आवश्यक पोषक तत्वांची कमतरता हे देखील ब्लड प्रेशर कमी होण्याचे कारण आहे. व्हिटॅमिन बी १२ आणि लोह सारख्या काही पोषक तत्वांच्या कमतरतेमुळे अशक्तपणा होऊ शकतो, ज्यामुळे रक्तदाब कमी होऊ शकतो.

ब्लड प्रेशर कमी झाल्यास काय उपाय कराल?

१) मिठाचे सेवन करा

मिठाचे फायदे, तोटे दोन्ही आहेत. त्याचे अतिसेवन सुद्धा घातक आणि कमी सेवन करणे देखील घातकच आहे, त्यामुळे निरोगी ब्लड प्रेशरसाठी मीठ योग्य प्रमाणात सेवन केले पाहिजे. फळे आणि भाज्यांमध्ये असलेल्या नैसर्गिक मीठाचे सेवन करण्याव्यतिरिक्त आपण आहारातही योग्य प्रमाणात मीठ सेवन केले पाहिजे.

२) जास्त द्रव पदार्थ्यांचे सेवन करा

तुमच्या शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी होऊ देऊ नका. शरीरात पुरेसे पाणी राखण्यासाठी अधिकाधिक निरोगी द्रवपदार्थ प्या. यामुळे ब्लड प्रेशरसाठी कारणीभूत असलेली डिहायड्रेशनची समस्या जाणवणार नाही.

३) कॅफिन

कॅफिनची योग्य मात्रा तुमचे ब्लड प्रेशर स्थिर ठेवण्यास मदत करु शकते.

४) तुळशीची पान

तुळशीच्या पानांमध्ये अनेक पोषक तत्वांचा खजिना आहे. त्यात भरपूर मॅग्नेशियम, पोटॅशियम आणि व्हिटॅमिन सी असते. शिवाय यात युजेनॉल नावाचे अँटीऑक्सिडंट असतात जे ब्लड प्रेशर नियंत्रित करण्यास मदत करते.

(प्राप्त माहितीवर आधारित ही बातमी आहे. त्यामुळे तुम्ही योग्य वैद्यकीय सल्ल्यानुसारच उपचार घ्या.