कर्ज घेताना सिबिल स्कोर सर्वात महत्त्वाचा असतो. बँकेकडून कर्ज घेताना किंवा एका बँकेकडून घेतलेलं कर्ज दुसऱ्या बँकेकडे हस्तांतरीत करताना सिबिल स्कोअर म्हणजेच क्रेडीट स्कोअर बघितला जातो. मात्र अनेकांना सिबिल स्कोअर कसा बघायचा याबाबत माहिती नाही. एका कालमर्यादेत अनेक प्रकारच्या कर्जांची किंवा क्रेडिटची परतफेड यात समाविष्ट असते. यावरून तुम्ही तुमची मागील पेमेंट किती वक्तशीरपणे आणि कार्यक्षमतेने केली आहे याची कल्पना येते. सिबिल स्कोअर ३०० ते ९०० गुणांपर्यंत असतो. अधिक स्कोअर म्हणजे चांगला स्कोअर. तुम्ही तुमचा सिबिल स्कोअर ऑनलाइन कसा तपासू शकता, जाणून घ्या
चांगला सिबिल स्कोअर तुम्हाला सहज कर्ज मंजूर होण्यास मदत करतो. TransUnion CIBIL वेबसाइटनुसार, ७९ टक्के कर्ज अशा ग्राहकांना दिले जाते, त्यांचा सिबिल स्कोअर ७५० गुणांपेक्षा जास्त आहे. तुम्ही तुमचा सिबिल स्कोअर एकाधिक एजन्सींद्वारे तपासू शकता. यापैकी काही तुमचा सिबिल स्कोअर विनामूल्य देतात, तर काही एजन्सी सदस्यत्व शुल्क आकारतात.
सिबिल स्कोअर तपासण्यासाठीची प्रक्रिया
- प्रथम तुम्ही cibil.com वर जा. होमपेजवर तुम्ही Personal टॅबवर जा आणि मदत केंद्रावर क्लिक करा. आता Free CIBIL Score and Report निवडा. त्यानंतर Get Your Free CIBIL Score and Report बटणावर क्लिक करा. त्यानंतर पुढचे पान दिसेल.
- तिथे तुमची काही वैयक्तिक माहिती विचारली आहे जसे की, ईमेल पत्ता, पासवर्ड तयार करा, नाव, फोन नंबर आणि आयडी नंबर इ. हा आयडी क्रमांक तुमचा पॅन, पासपोर्ट, मतदार आयडी, ड्रायव्हरचा परवाना किंवा रेशन कार्ड क्रमांक असू शकतो.
- एकदा तुम्ही वरील माहिती एंटर केल्यानंतर, तुम्हाला Accept आणि Continue वर क्लिक करावे लागेल.
- यानंतर तुम्हाला सबस्क्रिप्शन प्लॅन निवडण्यास सांगितले जाते. पण इथे तुम्हाला तळाशी दिलेल्या No Thanks बटणावर क्लिक करावे लागेल.
- तुम्ही ही साइट ज्या डिव्हाइसद्वारे चालवत आहात, त्याला या वेबसाइटशी जोडण्यास सांगितले जाते. कारण पुढच्या वेळी तुम्ही या साइटवर लॉग इन कराल तेव्हा तुमची लॉगिन प्रक्रिया अधिक सोपी होईल. तुमच्या इच्छेनुसार तुम्ही कोणताही पर्याय निवडू शकता. त्यानंतर तुम्हाला Continue वर क्लिक करावे लागेल.
- आता तुमच्या समोर एक स्क्रीन दिसेल, “You have successfully enrolled!” (आपण यशस्वीरित्या नोंदणी केली आहे). येथे Go To Dashboard चे बटण दिले आहे ज्यावर तुम्हाला क्लिक करावे लागेल.
- पुढील स्क्रीनवर तुम्हाला तुमचे शहर, उत्पन्नाचा प्रकार आणि मासिक उत्पन्न विचारले जाईल जेणेकरुन तुम्हाला क्रेडिट्स ऑफर करता येतील. हे ऐच्छिक आहे, तुम्ही विंडो वगळण्यासाठी वरील क्रॉसवर क्लिक करू शकता.
- पुढील पृष्ठ तुमचा सिबिल स्कोअर दर्शवेल. जर तुम्हाला वर्षातून एकापेक्षा जास्त वेळा तुमचा स्कोअर तपासायचा असेल तर तुमच्याकडून या सेवेसाठी शुल्क आकारले जाते. याशिवाय, CRIF, Experian सारख्या अनेक अधिकृत संस्था आहेत ज्यातून तुम्ही तुमचा सिबिल स्कोअर विनामूल्य तपासू शकता.
- काही थर्ड पार्टी वेबसाइट्स आणि अॅप्स आहेत जे तुमचा CIBIL स्कोर उघड करतील. परंतु त्यांच्या सुरक्षिततेवर आणि विश्वासार्हतेवर पूर्णपणे विश्वास ठेवला जाऊ शकत नाही, म्हणून आम्ही तुम्हाला अधिकृत CIBIL वेबसाइटची प्रक्रिया सांगितली आहे.