LPG Cylinder Expiry Date : जेव्हा जेव्हा आपल्याला काही खाण्यासाठी बनवायचं असतं तेव्हा आपण लगेच गॅस चालू करतो आणि आपली आवडते पदार्थ बनवतो. शहरातच नाही तर अगदी खेड्यापाड्यातील दुर्गम भागातही आता गॅसची शेगडी पोहोचली आहे. लोक लाकूड सोडून आता गॅसकडे जात आहेत. गॅस कनेक्शन घेणं देखील खूप सोपं आहे आणि ते वापरणं देखील तितकंच सोपं आहे. पण तुम्हाला माहीत आहे का की तुमच्या गॅस सिलेंडरवर एक्स्पायरी डेटही असते? कदाचित तुम्हाला याची माहिती नसेल, कारण बहुतेक लोकांना याबद्दल माहिती नाही. चला तर मग ही एक्सपायरी डेट कशी पहायची जाणून घेऊया…
ही आहे पद्धत:-
जर तुम्ही गॅस सिलेंडरकडे बारकाईने पाहिले तर तुम्हाला A, B, C किंवा D अक्षरांपैकी एक दिसेल. वास्तविक, हा तोच नंबर आहे ज्याद्वारे तुम्ही एक्सपायरी डेट ओळखू शकता.
ग्रूप तयार केले जातात
गॅस कंपन्या काय करतात, तर ते संपूर्ण वर्ष म्हणजे १२ महिन्यांचे चार भाग (A, B, C आणि D) अशा भागांमध्ये एक-एक ग्रूप तयार करतात.
आणखी वाचा : Shani Transit 2022 : ३० वर्षांनंतर शनीचा होणार कुंभ राशीत प्रवेश, या राशींच्या लोकांचं नशीब उजळणार
कोणत्या महिन्यात कोणते गट?
A गट – जानेवारी, फेब्रुवारी आणि मार्च
B गट – एप्रिल, मे आणि जून
C गट – जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर
D गट – ऑक्टोबर, नोव्हेंबर आणि डिसेंबर
आणखी वाचा : Chanakya Niti : अशा लोकांपासून नेहमी सावध राहा, तुमच्या विनाशाचे कारण बनू शकतात
अशा प्रकारे एक्सपायरी ओळखली जाते
आता तुम्हाला समजले असेलच की कोणता महिना कोणत्या गटात येतो. उदाहरणार्थ, जर तुमच्या गॅस सिलेंडरवर D-2020 लिहिलेले असेल, तर याचा अर्थ हा सिलेंडर डिसेंबर 2020 मध्ये संपला आहे. अशा परिस्थितीत या पलीकडे सिलेंडर वापरणे धोकादायक ठरू शकते.