दिवाळीचा सण सुरु झाला आहे, दिवाळीत घरोघरी मिठाई भरपूर प्रमाणात खाल्ली जाते. यावेळी लोक एकमेकांना मिठाई देखील भेट देतात. अशा परिस्थितीत बाजारात मिठाईची मागणी वाढते आणि त्यामुळे फसवणूक करणारे आणि भेसळ करणारेही सक्रिय होतात. आणि बनावट मिठाईही बाजारात येतात. व्यापाऱ्यांकडून भेसळयुक्त व बनावट मिठाई ग्राहकांच्या माथी मारण्याचा प्रयत्न होत असतो. या मिठाईमुळे व्यक्तीच्या आरोग्यास मोठा धोका होऊ शकतो.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

बऱ्याचवेळा आपण खरेदी केलेली मिठाई ही शुद्ध असेल की नाही याबाबत काही माहिती सांगू शकत नाही. अनेकदा भेसळयुक्त मिठाई सर्रासपणे विकली जाते. अशावेळी चांगली आणि भेसळ नसलेली मिठाई निवडता यावी यासाठी काही गोष्टी लक्षात ठेवणं आवश्यक आहे. त्यामुळे दिवाळीच्या पार्श्वभूमीवर मोठ्या प्रमाणात विकल्या जाणारी अशी बनावट मिठाई कशाप्रकारे ओळखता येईल, हे जाणून घेऊया…

भेसळ कशी होते?

माव्यापासून बनवलेल्या मिठाईत भेसळ करतात म्हणजेच खवा हा दुधापासून तयार केला जातो. मात्र हे लोक दुधचं भेसळयुक्त बनवतात. बनावट वस्तूंपासून दूध केक तयार केला जातो. मिठाई रंगीबेरंगी दिसण्यासाठी त्यामध्ये आरोग्यास हाणीकारक असे बनावट रंग मिसळले जातात. जे आरोग्यासाठी अत्यंत घातक असतात.

अशा प्रकारे बनावट मिठाई ओळखा

  • दुकानात मिठाई खरेदी करणार असाल तर नुसते रंग पाहून मिठाई पॅक करून घेऊ नका. सर्वप्रथम मिठाई खरी आहे की बनावट हे ओळखा. गोड खूप रंगीबेरंगी वाटत असेल तर घेऊ नका.
  • हातात घ्या आणि बघा त्याचा रंग तुमच्या हाताला लागतोय का…असं असेल तर घेऊ नका.
  • मिठाई किंवा खवा तळहातावर घेऊन रगडा. तो जर कोरडा न होता तेलकट वास आला तर भेसळ समजावी.
  • मिठाईचा तुकडा तोंडात टाकताच तेलकट वाटला तर त्यात भेसळ असू शकते. मिठाईचा वास घ्या, शिळी वाटत असेल तर विकत घेऊ नका. मिठाईवरचे चांदीचं अर्क लगेच निघत असेल तर समजा हे बनवाट आहे.

हेही वाचा >> Video : घरात नको असलेल्या या गोष्टीने सजवा तुमचे घर; पाहा दिवाळी सजावटीसाठी हे सुंदर DIY

  • मिठाई व खव्यावर तीनचार आयोडिनचे दोन थेंब टाका. भेसळ असल्यास थेंबाची जागा काळसर होईल.
मराठीतील सर्व लाइफस्टाइल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: How to check fake sweets in market know these things danger due to these sweets in diwali srk