प्रत्येक गोष्टीची एक एक्सपायरी डेट असते. ती एक्सपायरी डेट म्हणजे ठरावीक तारखेनंतर ती वस्तू वापरण्यायोग्य नसते. मेकअप प्रोडक्ट्सबाबतही तेच असते. पण अनेकदा आपण मेकअप प्रोडक्ट्सची शेल्फ लाइफ तपासणे विसरतो किंवा त्या प्रोडक्टवरची भाषा आपल्याला समजत नाही, त्यामुळे अनेक महिने आपण एक्सपायर झालेले तेच मेकअप प्रोडक्ट्स वापरत राहतो. यामुळे अनेकदा त्वचेच्या समस्यांचा सामना करावा लागतो. पण आज आम्ही तुम्हाला मेकअप प्रोडक्ट्स एक्सपायर झालेत हे कसे ओळखायचे हे सांगणार आहोत. ज्यामुळे तुम्ही खराब मेकअप प्रोडक्ट्सपासून तुमची स्कीन वाचवू शकता. पण यासाठी तुम्हाला खालील काही सोप्या टिप्स लक्षात ठेवाव्या लागतील.
१) प्रोडक्टचा उवट वास येणे
मेकअप प्रोडक्टची शेल्फ लाइफ त्याच्या वासावरुनही निश्चित केली जाऊ शकते. उदाहरणार्थ, जर तुमच्या आयलाइनर आणि मस्कराचा गॅसोलीनसारखा वास येत असेल, तर तुम्हाला ते प्रोडक्ट तुमच्या मेकअप किटमधून काढून फेकायला हवे. कारण जर तुम्ही त्यांचा वापर केला तर त्याच्यामुळे तुमच्या डोळ्यांना अॅलर्जी किंवा जळजळ होऊ शकते. त्यामुळे आजच तुमच्या वॉर्डरोबमधून तुमचे मेकअप प्रोडक्ट्स काढा आणि त्यांचा वास घेऊन ते वापरण्यास योग्य आहेत की नाही हे जाणून घ्या.२
२) प्रोडक्टचा टेक्सचर बदलणे
ब्युटी प्रोडक्ट्सच्या टेक्सचरी काळजी घेणे देखील खूप महत्वाचे आहे. म्हणजेच जर तुम्ही घेतलेले एखादे ब्युटी प्रोडक्ट आधी क्रीमिश होते, परंतु काही दिवसांनी त्यात काही दाने दिसत असतील किंवा ते वापरताना सुकल्यासारख्या दिसत असेल तर ते प्रोडक्ट एक्सपायर झाले असे समजा. अशा प्रोडक्टचा वापर केल्याने तुम्हाला बॅक्टेरिया इंफेक्शन होऊ शकते, त्यामुळे ते न वापरणेच फायदेशीर ठरेल.
३) रंग वेगळा दिसणे
तुमच्या कोणत्याही मेकअप प्रोडक्टचा रंग पूर्वीपेक्षा वेगळा दिसत असेल तर त्याकडे दुर्लक्ष करू नका. कारण हे एक असे चिन्ह आहे जे सांगते की, तुमचे मेकअप प्रोडक्ट वापरण्यायोग्य राहिलेले नाही, ते एक्सपायर झाले आहे. अशा प्रोडक्टचा वापर करणे तुम्ही थांबवले पाहिजे.
४) बुरशीसारखं दिसणे
जर तुम्हाला तुमच्याकडील ब्युटी प्रोडक्टस् जसे की फाउंडेशन, आयलाइनर आणि मस्करा क्लंपिंग नेहमीपेक्षा जाड दिसत असेल तर ते वापरू नका. कारण प्रोडक्ट्समधील हे लक्षण असे सांगते की, त्यात बॅक्टेरियाचे प्रमाण वाढत असून ते फेकण्याची वेळ आली आहे.
५) वेगळी लेअर येणे
तुम्हाला माहीत आहे का की, फक्त क्रीम आणि लिक्विड प्रोडक्ट्सच एक्स्पायर होत नाहीत तर फेस पावडर किंवा आय शॅडो सारखी पावडर बेस प्रोडक्ट्स देखील एक्सपायर होतात. म्हणजेच, जर तुमच्या पावडर प्रोडक्ट्सवर ग्रे फिल्म किंवा चॉकसारखी लेअर दिसत असेल, तर हे एक चिन्ह आहे जे सांगते की, तुमच्याकडील ब्युटी प्रोडक्ट खराब झाली आहेत आणि आता त्यांचा वापर करणे म्हणजे त्वचेच्या समस्या ओढावून घेण्यासारखे आहे.
६) व्हाइट स्पॉट येणे
जर तुम्हाला तुमच्या लिप लाइनर किंवा आयलायनरच्या लूकवर आणि टीपवर व्हाइट स्पॉट दिसत असतील तर याचा अर्थ तुम्ही त्या प्रोडक्टची एक्सपायरी डेट तपासली पाहिजे. कारण जर हे प्रोडक्ट एक्सपायर झाले असेल पण तरीही तुम्ही त्यांचा सतत वापर करत असाल तर त्यामुळे तुम्हाला त्वचेचा संसर्ग होऊ शकतो, त्यामुळे त्यांचा वापर तात्काळ बंद करा.
७) नीट मिक्स न होणे
अनेक मेकअप प्रोडक्ट थिक असल्याने लगेच घट्ट होता. अशावेळी ते वेगळे दिसते. म्हणून असे थिक मेकअप प्रोडक्ट वापरण्यापूर्वी ते चांगले हलवून घ्या. यानंतरही जर प्रोडक्ट फॉर्मूल नीट ब्लेंड होत नसेल आणि त्यावर ऑइल लेअर दिसत असेल तर याचा अर्थ ते ब्युटी प्रोडक्ट कपाटातून फेकून देण्याची वेळ आली आहे.