How To Choose Mango : सध्या उन्हाळा सुरू आहे. उन्हाळा म्हणजे आंब्याचा महोत्सव. उन्हाळ्यात आवडीने आपण आंब्याचा रस खातो. लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच आंब्याचा रस आवडते. असा क्वचितच कोणी असेल की ज्याला आंब्याचा रस आवडत नाही. अनेकदा बाजारातून आंबे खरेदी करताना खूप काळजी घ्यावी लागते. काही वेळा आंबे खराब निघतात आणि आपली फसवणूक होते. काही लोक लोकप्रिय आंब्याच्या नावावर कोणतेही आंबे खपवतात तर काही लोक रासायनिक पद्धतीने पिकवून आंबे बाजारात विक्रीला आणतात. ज्यामुळे अनेकदा आपल्याला चांगल्या प्रतीचे आंबे मिळत नाही. तुमच्याबरोबर सु्द्धा असे कधी झाले आहे का? जर हो तर आता टेन्शन घेऊ नका. कारण आज आपण अशी ट्रिक जाणून घेणार आहोत ज्यामुळे आंबे खरेदी करताना तुमची फसवणूक होणार नाही. सध्या असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये आंबे खरेदी करताना कोणती काळजी घ्यावी, याविषयी सांगितले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

prajakta_salve_marathi या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलेय, “आंबे घेताना हे नक्की करा एकही आंबा खराब निघणार नाही” प्राजक्ता साळवे या त्यांच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून असे अनेक घरगुती उपाय सांगणारे व्हिडीओ शेअर करत असतात.

हेही वाचा : रोज सकाळी ब्रेड खाणे आतड्यांच्या आरोग्यासाठी हानिकारक?अल्ट्रा-प्रोसेस्ड पदार्थ खाणे का टाळावे?

पाहा व्हायरल व्हिडीओ

हेही वाचा : दर आठवड्याला किती वजन कमी करणे सुरक्षित? ICMR ने सांगितल्या वजन कमी करण्यासाठीच्या ट्रिक्स

या व्हिडीओमध्ये त्यांनी आंबा खरेदी करताना एक ट्रिक वापरण्यास सांगितली आहे. व्हिडीओत सांगितल्याप्रमाणे आंबा खरेदी करताना आंबा हातात घ्यायचा आणि आंब्याच्या टोकाला दाबायचं. जर आतपर्यंत दाबता येत असेल तर समजायचा की हा आंबा चांगला पिकलेला आणि चांगला आहे पण जेव्हा आंब्याच्या टोकाला दाबल्यानंतर पुन्हा वर आला तर समजायचं की खराब आंबा आहे. आता तुम्ही सुद्धा आंबा खरेदी करायला जाणार तेव्हा ही सोपी ट्रिक वापरून बघा.
त्यानंतर या व्हिडीओमध्ये प्राजक्ता साळवे यांनी रस काळपट होऊ नये म्हणून एक ट्रिक सांगितली आहे.रस बनवताना आंब्याची कोय शिल्लक असते. ती कोय आंब्याच्या रसामध्ये टाकायची आणि रस फ्रिजमध्ये ठेवायचा. त्यामुळे रस काळपट होणार नाही.
सध्या हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत असून अनेक युजर्सना हा व्हिडीओ आवडला आहे.या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिलेय, “काही पण. आंबा कापल्याशिवाय समजणारच नाही”

मराठीतील सर्व लाइफस्टाइल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: How to choose good quality mango try a trick while buying ndj
Show comments