How to Clean Bathroom Taps : प्रत्येकाला असं वाटतं की, त्यांचं घर स्वच्छ आणि सुंदर दिसावं. त्यामुळे आपण नेहमी घर स्वच्छ ठेवण्याचा प्रयत्न करतो. घराच्या स्वच्छतेचा विचार करताना बाथरूमची स्वच्छता केली जाणंही तितकीच महत्त्वाची आहे.
आठवड्यातून दोन किंवा तीन वेळा बाथरूम स्वच्छ करणं गरजेचं आहे; पण अनेकदा बाथरूम स्वच्छ करताना आपण नळांकडे लक्ष देत नाही आणि काही काळानंतर हे नळ गंजल्याचे दिसून येते. नळ स्टेनलेस स्टील किंवा लोखंडापासून बनलेले असतात; त्यामुळे त्यांना गंज लागल्यास ते खूप लवकर खराब होतात.
जर तुमच्या बाथरूमचा नळ गंजला असेल, तर टेन्शन घेऊ नका. काही खास टिप्सच्या मदतीने तुम्ही नळ चांदीसारखा चमकवू शकता. आज आपण त्याविषयीच जाणून घेऊ.

लिंबू

लिंबूमध्ये अॅसिडिक तत्त्वं असतात; ज्यामुळे नळावर चढलेला गंज लगेच निघून जातो. त्यासाठी गरम पाण्यात लिंबूचा रस व थोडे मीठ टाका. हे मिश्रण नळावर टाकून जुन्या टूथब्रशने घासा. नळ पूर्वीसारखा स्वच्छ दिसू शकतो.

Liquor and fish stocks seized in Bhayander news
मतदारांना आमिषे दाखविण्यास सुरवात; भाईंदरमध्ये मद्य आणि मासळाची साठा जप्त
Eknath Shinde on Ladki Bahin Yojana Sixth installment
महायुतीला सत्ता मिळाली, लाडक्या बहिणींना २१०० रुपये कधीपासून…
Nishigandha Wad
हिंदी मालिकेच्या सेटवर निशिगंधा वाड यांचा अपघात; तातडीने रुग्णालयात केलं दाखल
david dhawan advice huma qureshi on weight
“तुला खूप लोक सांगतील वजन कमी कर, सर्जरी कर, पण…”, हुमा कुरेशीला प्रसिद्ध दिग्दर्शकाने वजनाबद्दल दिलेला सल्ला, म्हणाली…
Meenakshi Seshadri Romantic rain song while she having diarrhea
सेटवर एकच शौचालय, पावसात रोमँटिक गाण्याचं शूटिंग अन्.., मीनाक्षी शेषाद्रीने सांगितला अतिसार झाल्यावर चित्रीकरणाचा वाईट अनुभव
Rakul Preet Singh opens up about her diet
हळदीच्या पाण्याचे सेवन अन् दुपारच्या जेवणात…; रकुल प्रीत सिंगने सांगितला तिचा डाएट प्लॅन; म्हणाली, “रात्रीचे जेवण…”
How many times you should wash your bedsheets cleaning tips to wash your sheets
तुम्ही तुमची बेडशीट महिन्यातून किती वेळा धुता? जाणून घ्या स्वच्छ करण्याच्या ‘या’ सोप्या टिप्स

हेही वाचा : How to Stop Snoring : तुमच्या जोडीदाराला घोरण्याची सवय आहे का? या ट्रिक्सच्या मदतीने करा त्यांची सुटका!

व्हिनेगर

स्वच्छतेसाठी व्हिनेगर खूप महत्त्वाचा घटक मानला जातो. व्हिनेगरच्या मदतीने कोणतीही वस्तू लवकर स्वच्छ होते. जर तुमच्या बाथरूमचा नळ खराब झाला असेल किंवा काळा पडला असेल, तर व्हिनेगरच्या मदतीने तुम्ही तो नव्यासारखा चमकवू शकता.
त्यासाठी एक कप चुना घ्या आणि त्यात मीठ व पाणी टाका. हे मिश्रण गंज लागलेल्या नळावर लावा आणि १० मिनिटे तसेच ठेवा. त्यानंतर त्यावर व्हिनेगर टाका आणि दोन मिनिटे ठेवा. स्क्रबरने हा नळ घासा. तुम्हाला हा नळ चांदीसारखा चमकताना दिसेल.

बेकिंग पावडर

जर तुमच्या घरातील कोणताही नळ गंजला असेल, तर तो स्वच्छ करण्यासाठी तुम्ही स्वयंपाकघरातील बेकिंग पावडरचा वापर करू शकता. त्यासाठी बेकिंग पावडरमध्ये लिंबूचा रस पिळा आणि ते मिश्रण नळावर लावा. त्यानंतर जुन्या टूथब्रशने नळ व्यवस्थित घासा. पाण्याने धुतल्यानंतर तुम्हाला नळ स्वच्छ झालेला दिसेल.

(टीप : वरील लेख हा प्राप्त माहितीवर आधारित आहे.)