किचन सिंकचा आपण सर्वाधिक वापर करतो. अनेकदा खरकटी भांडी आपण किचन सिंकमध्ये ठेवतो किंवा हात धुताना हाताला लागलेले अन्न सिंकमध्ये जमा होतात आणि सिंक ब्लॉक होण्याची शक्यता वाढते. अनेकदा किचनची साफसफाई करताना आपण किचन सिंक स्वच्छ करायला विसरतो पण यामुळे सिंक ब्लॉक होतो तेव्हा आपण प्लंबरला बोलावतो पण तुमचा किचन सिंक ब्लॉक झाला असेल तर टेन्शन घेऊ नका कारण आज आम्ही तुम्हाला काही घरगुती उपाय सांगणार आहोत. हे उपाय एवढे फायदेशीर आहे की तुम्हाला प्लंबरला बोलवण्याचीही आवश्यकता नाही.
कॉफी
किचन सिंक ब्लॉक झाल्यानंतर तुम्ही कॉफीच्या मदतीने स्वच्छ करू शकता. यासाठी कॉफी पावडर शिवाय लिक्वीड सोप आणि गरम पाण्याची आवश्यकता भासणार. जर किचन सिंकमधून पाणी जात नसेल तर सुरुवातीला कॉफी पावडर आणि लिक्वीड सोप टाका. त्यानंतर गरम पाणी टाका. असे केल्यामुळे सिंकमध्ये असलेला कचरा बाहेर पडणार.
हेही वाचा : बाथरूममधील बादली, मग खराब झाले असतील तर या सोप्या ट्रिक्स वापरा; नव्यासारखी येईल चमक
व्हिनेगर
ब्लॉक झालेल्या किचन सिंक व्हिनेगर आणि बेकींग सोडाच्या मदतीने तुम्ही स्वच्छ करू शकता. सुरुवातीला किचन सिंकमध्ये बेकींग सोडा टाका त्यानंतर व्हिनेगर टाका. यामुळे सिंकमध्ये अडकलेला कचरा बाहेर पडणार आणि सिंक स्वच्छ होईल. जर तुमच्याकडे व्हिनेगर नसेल तर त्या ऐवजी तुम्ही लिंबूचाही वापर करू शकता.
किचन सिंक ब्लॉक होऊ नये, यासाठी तुम्ही आठवड्यातून एकदा किचन सिंक स्वच्छ करावे. खरकटे भांडी ठेवू नये आणि किचन सिंकमध्ये अन्न कधीही टाकू नये. याशिवाय सिंक ड्रेनच्या वर जाळीचे कव्हर लावावे यामुळे अन्न आणि कोणताही कचरा पाइपमध्ये जाणार नाही.
(टीप : वरील लेख हा प्राप्त माहितीवर आधारित आहे)