पितळेची भांडी नियमित स्वच्छ करून सुद्धा वारंवार काळी पडतात का? टेन्शन घेऊ नका. तुम्ही काही घरगुती ट्रिक्सचा वापर करून भांडी झटक्यात स्वच्छ करू शकता. आज आपण या ट्रिक्स कोणत्या, याविषयी जाणून घेऊया.
लिंबू आणि बेकींग सोडा
लिंबू आणि बेकींग सोडाचा वापर करून तुम्ही पितळेची भांडी स्वच्छ करू शकता. लिंबूच्या रसात थोडा सोडा टाकावा आणि हे मिश्रण पितळेच्या भांड्यांवर लावावे आणि थोडा वेळ तसेच राहू द्यावे त्यानंतर ही भांडी गरम पाण्याने धुवून घ्यावे.
व्हिनेगर
जर तुमच्याकडे लिंबू नसेल तर तुम्ही व्हिनेगरनेसुद्धा पितळेचे भांडी स्वच्छ करू शकता. सुरुवातीला विनेगर पितळेच्या भांड्यांवर लावा आणि मीठाने ही भांडी घासून घ्या, त्यानंतर गरम पाण्याने भांडी स्वच्छ धुवावी.
हेही वाचा : स्विच बोर्ड काळा पडला का? या ट्रिक वापरून झटक्यात स्वच्छ करा; पाहा देशी जुगाड ….
लिंबू आणि मीठ
लिंबूच्या आणखी एका पद्धतीने तुम्ही पितळेची भांडी स्वच्छ करू शकता. लिंबू आणि मीठाचे मिश्रण भांड्याना लावून चांगली घासून घ्या आणि त्यानंतर गरम पाण्याने स्वच्छ धुवून घ्या. पितळेची भांडी नव्या सारखी चमकतील.
चिंच
चिंचे १५ मिनिटे पाण्यात भिजवून ठेवा. त्यानंतर चिंचेच्या पल्पला पितळेच्या भांड्यांवर घासावे आणि त्यानंतर पाण्याने धुवावे. पितळेची भांडी स्वच्छ होतील