Kitchen Jugaad | How to clean burnt cooker: कुकरचा वापर घरोघरी केला जातो. रोजच्या वापरात असलेला हा कुकर आपण रोज स्वच्छ करतो पण तरीही अनेकदा बाहेरून आणि आतून तो काळपट पडू लागतो. नव्या कुकरची काळजी अगदी वापरण्यापासून ते धुण्यापर्यंत आपण घेत असतो. घड्याळावर चाललेल्या आपल्या या आयुष्यात जेवणाची कामे पटापट व्हावीत म्हणून अनेकदा कुकरचा वापर होत असूनही त्याच्या स्वच्छतेकडे नकळतपणे दुर्लक्ष होऊ लागतं आणि त्याचा परिणाम म्हणजे काळवंडलेला कुकर.

कुकरचा काळपटपणा घालवण्यासाठी आणि तो स्वच्छ, चकाकणारा दिसण्यासाठी काही सोप्पे उपाय आहेत ते केल्यानंतर तुम्ही वापरत असलेला कुकर अगदी नवा-कोरा दिसू लागेल, यात शंका नाही.

Alum Cleaning Hacks
घरातील फरशी चकाचक करण्यासाठी तुरटी आहे अत्यंत फायदेशीर; जाणून घ्या सोप्या टिप्स
Manoj Jarange Patil on Kalicharan
‘हिंदुत्व तोडणारा राक्षस’, कालीचरण यांच्या विधानानंतर मनोज जरांगे…
Malai cauliflower recipe Different style recipe of making cauliflower for winter special
रोज काय भाजी करावी सुचत नाही? १ कांदा चिरून करा मलाई फ्लावर; बोटं चाटत रहाल अशी चमचमीत फ्लॉवरची भाजी
Kitchen jugad video orange peel and milk scrub for tanning skin
Kitchen Jugaad: दुधात संत्र्याची साल टाकताच कमाल झाली; Video पाहाल तर दररोज कराल हा उपाय
dudhi barfi recipe
अवघ्या काही मिनिटांत बनवा दुधी भोपळ्याची पौष्टिक बर्फी; वाचा साहित्य आणि कृती…
Matar Puri recipe
चविष्ट आणि पौष्टिक मटार पुरी अवघ्या काही मिनिटांत बनवा; जाणून घ्या साहित्य आणि कृती
quickly make delicious egg cutlets Read materials and actions
व्हेज कटलेट खाऊन कंटाळा आलाय? मग झटपट बनवा अंड्याचे स्वादिष्ट कटलेट; वाचा साहित्य आणि कृती
How to use banana peel for mosquito
घरात डासांचा सुळसुळाट वाढतोय? केळीच्या सालीचा ‘हा’ सोपा उपाय डासांचा करेल नायनाट

कुकर स्वच्छ करण्यासाठीचे हे ३ घरगुती उपाय: (Home remedies to Clean Cooker)

१. लिंबू (Lemon)

अनेकदा कुकर बाहेरून तर स्वच्छ चकाकणारा असतो पण आतून तो अगदी काळपट पडलेला असतो. यासाठी आपल्या किचनमध्ये रोज वापरात असलेला लिंबू कामी येतो. लिंबूच्या मदतीने हा उपाय करण्यासाठी जेव्हा तुम्ही कुकरमध्ये डाळ-भात लावाल, तेव्हा आधी तळाशी पाणी टाकल्यानंतर त्या पाण्यात लिंबाच्या १-२फोडी टाकून ठेवा. यामुळे कुकर आतल्या बाजूने अजिबात काळा पडणार नाही.

हेही वाचा… पचनक्रिया सुधारण्यासाठी जेवणानंतर करा ‘या’ १० हस्त मुद्रा; आरोग्यासाठी ठरतील फायदेशीर

२. मक्याचे पीठ (Corn flour)

काळ्या पडलेल्या कुकरसाठी मक्याचं पीठचादेखील अगदी उत्तमप्रकारे वापर होतो. यासाठी आधी एका भांड्यात ३ चमचे मक्याचे पीठ आणि १ चमचा बेकिंग सोडा घ्या. यामध्ये एका लिंबाचा रस पिळा. त्यानंतर त्यात थोडं डिशवॉश लिक्विड घाला आणि त्याची पेस्ट तयार करा.

आता तयार झालेली ही पेस्ट कुकरला १० ते १५ मिनिटांसाठी लावून ठेवा. नंतर कुकरवर थोडं पाणी टाकून कुकर घासणीने घासून स्वच्छ करा. यामुळे कुकर अगदी छान चकाकेल.

हेही वाचा… पाण्याच्या टाकीत न उतरता चिखल, माती करा स्वच्छ; ‘हे’ तीन सोपे व स्वस्त उपाय वाचवतील पैसे

३. चिंच आणि मीठ (Tamarind and Salt)

काळा झालेला कुकर स्वच्छ करण्यासाठी या उपायाचाही खूप फायदा होऊ शकतो. या उपायासाठी एका वाटीत चिंचेचा कोळ घ्या आणि त्यात मीठ टाका. आता हे मिश्रण कुकरला लावा आणि घासणीने स्वच्छ करा. कुकरवरील काळे डाग, अस्वच्छपणा लगेच साफ होईल आणि तो नव्यासारखा चमकेल.

हेही वाचा… Tea and Headache: चहाप्रेमींनो, ‘या’ वेळेस चुकूनही घेऊ नका चहा; डोकेदुखीसाठी ठरू शकतो घातक? जाणून घ्या तज्ज्ञांचा सल्ला