पाणी पिण्यासाठी अनेकजण तांब्याची भांड्याचा वापर करतात. कारण त्याचे आरोग्यासाठी अनेक फायदे आहेत. तांबे हा धातू आपल्या शरीरासाठी आवश्यक खनिजांपैकी एक आहे. तांब्याच्या बाटलीतून पाणी प्यायल्यास रक्तातील लालपेशी तयार करण्यासाठी आणि रोगप्रतिकारशक्ती सुधारण्यास मदत होते. तांब्याच्या बाटलीतून पाणी पिणे चांगले असले तरी ती बाटली योग्य पद्धतीने साफ करणे गरजेचे आहे.
आज आम्ही तुम्हाला तांब्याची बाटली साफ करण्याची सोपी ट्रिक सांगणार आहोत. तुम्हाला लिंबू आणि मीठ आणि गरम पाणी वापरून तांब्याची बाटली साफ करता येईल.
इंस्टाग्रामवर priya_dwarke या अकांउटवर एक व्हिडीओ पोस्ट करून ही ट्रिक सांगितली आहे. या व्हिडीओमध्ये दाखवले आहे की, तांब्याच्या बाटलीमध्ये उकळते पाणी ओता. त्यात लिंबाचा रस आणि थोडे मीठ टाका. एक तास तसेच राहू द्या. त्यानंतर हे पाणी ओतून देऊन बाटली आतून व्यवस्थित धुऊन घ्या.
हेही वाचा – लाकडी चमचे कसे करावे साफ? सोपा उपाय वापरुन पाहा; नव्यासारखी येईल चमक
हा व्हिडीओ सोशल मीडियावर सध्या व्हायरल होत आहे. तुम्हीही वापरून पाहा आणि बघा किती फायदेशीर आहे ते.
हेही वाचा – तांब्याची बाटली की मातीचा माठ: कोणत्या भांड्यातून पाणी पिणे आरोग्यासाठी लाभदायक?
तांब्याच्या बाटलीतून पाणी प्यायल्याने होणारे फायदे
- अमेरिकान कॅन्सर सोसायचीच्या संशोधनानुसार, तांब्यामुळे तुमच्या शरीरातील कोलेस्ट्रॉल आणि ट्रीग्लेसेराईची पातळी कमी होते.
- तसेच ते अन्नाचे विभाजन करण्यासाठी मदत करते जे शरीराराला लोह शोषूण घेण्यासाठी मदत करते आणि शरीरात हिमोग्लोबिन निर्माण करते .
- तांब्याच्या बाटलीतून पाणी प्यायल्याने पचनक्रिया सुधारते होते आणि जे ह्दय आणि रक्तवाहिण्यांची प्रणालीस मदत करते.
- आपल्या शरीरात साचलेल्या चरबीचे विभाजन करण्यामध्ये महत्त्वाची भूमिका निभावतो जेणेकरून पाण्याच्या बाटलीतून तांब्याच्या बाटलीतून पाणी प्यायल्याने वजन कमी करण्यास फायदा होतो.
- उन्हाळ्यामध्ये ते शरीराला थंडावा आणि आराम देते