Home Remedies : आपण अनेकदा चेहऱ्याच्या सौंदर्याकडे खूप लक्ष देतो पण कोपर, गुडघा, घोट्यावरील काळी पडलेली त्वचेकडे मात्र दुर्लक्ष करतो. कोरडेपणा, त्वचेत हायड्रेशन नसणे, औषधांचा प्रभाव, कोपर जास्त घासणे किंवा कोपर ठेकवून सर्वत्र बसणे इत्यादी अनेक कारणांमुळे कोपर काळे पडू शकतात. गुडघा आणि घोट्यावरील त्वचाही अशीच काली पडते. जर तुमचीही समस्या अशीच असेल तर येथे जाणून घ्या की काळी पडलेली त्वचा पुन्हा एकदा कशी उजळता येईल.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

कोपर, गुडघा, घोट्यावरील काळेपणा दूर करण्यासाठी घरगुती उपाय

बटाटा
कोपर, गुडघा, घोट्याचा काळेपणा दूर करण्यासाठी बटाट्याचा रस उपयुक्त ठरू शकतो. बटाट्याच्या रसात लिंबाचा रस समान प्रमाणात मिसळावा. हे दोन रस एकत्र लावल्याने त्वचेला ब्लीचिंग गुणधर्म प्राप्त होतात. हा रस आठवड्यातून ३ ते ४वेळा किंवा दररोज १० ते १५ मिनिटे कोपर, गुडघा, घोट्यावर ठेवा.

बेकिंग सोडा
त्वचेच्या अनेक समस्या दूर करण्यासाठी बेकिंग सोडा वापरला जातो. बेकिंग सोड्यानेही कोपर, गुडघा, घोट्याचा काळेपणा दूर करता येतो. ३ ते ४ चमचे बेकिंग सोडा घ्या आणि पेस्ट तयार करण्यासाठी पुरेसे पाणी मिसळा. ही पेस्ट काळ्या कोपर, गुडघा, घोट्यावर लावा आणि १० मिनिटांनी त्वचा धुवा.

हेही वाचा – पावसाळ्यात माश्यांमुळे वैतागला आहात? माश्यांना घालवण्यासाठी डॉक्टरांकडून जाणून घ्या आवश्यक उपाय

हळद
औषधी गुणधर्मांनी समृद्ध हळद ​त्वचेवरील टॅनिंग कमी करण्यासाठी चांगला परिणाम दर्शवते. २ चमचे हळद घेऊन त्यात पाणी किंवा दूध घालून पेस्ट बनवा. ही पेस्ट १५ ते १० मिनिटे कोपर, गुडघा, घोट्यावर ठेवल्यानंतर स्वच्छ धुवा.

हेही वाचा – जीमला न जाताही वजन कमी करता येते; फक्त ‘या’ सवयी बदला, वजन होईल कमी

कोरफड
त्वचेमध्ये ओलावा नसणे हे देखीलकोपर, गुडघा, घोट्याची त्वचा काळे होण्याचे एक कारण आहे. अशा परिस्थितीत, कोरफड त्वचेला हायड्रेशन देण्यासाठी परिपूर्ण आहे. हायड्रेशन सोबत, कोरफड त्वचेला सुखदायक आणि बरे करण्याचे गुणधर्म देण्यासाठी देखील प्रभावी आहे. कोपर, गुडघा, घोट्यावर कोरफडीचा गर रात्रभर ठेवता येतो किंवा अर्धा तास ठेवल्यानंतर धुवा.

मराठीतील सर्व लाइफस्टाइल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: How to clean darkness of elbows knees ankles use potato lime baking soda aloe vera tips and tricks home remedies snk