बाथरूममध्ये पाण्याचा अधिक वापर होतो. त्यामुळे बादली किंवा मग लवकर खराब होतात. अनेक जण आठवड्यातून एक-दोनदा बाथरूम स्वच्छ करतात; पण काही वेळा बाथरूममध्ये ठेवलेले सामान किंवा बादली व मग आपण स्वच्छ करायचे विसरतो. त्यामुळे अनेक दिवस वापरल्यानंतर अंघोळीची बादली किंवा मग अस्वच्छ दिसू लागतो आणि त्याचा रंगही बदलतो.
जर तुमच्या बाथरूममधील बादली व मग खराब झाला असेल, तर टेन्शन घेऊ नका. कारण- आज आम्ही तुम्हाला काही सोप्या ट्रिक्स सांगणार आहोत. या ट्रिक्सचा वापर केल्यानंतर बादली आणि मगला नव्यासारखी चमक येईल.
१. बेकिंग सोडा
बेकिंग सोडा हा आपण सहसा स्वयंपाकघरात वापरतो; पण तुम्हाला माहीत आहे का बेकिंग सोड्याच्या मदतीने तुम्ही अस्वच्छ बादली व मग स्वच्छ करू शकता. त्यासाठी एका भांड्यामध्ये बेकिंग सोडा, भांडी घासण्याचा साबण व लिंबू रस एकत्र करा. जुन्या टूथब्रशने बादली व मगवर हे मिश्रण लावा आणि १० मिनिटे ठेवा. त्यानंतर ब्रशने बादली व मग घासा आणि स्वच्छ पाण्याने धुवा.
२. हायड्रोजन पॅरॉक्साइड
बाथरूममधील बादली व मग स्वच्छ करण्यासाठी तुम्ही हायड्रोजन पॅरॉक्साइडचा वापर करू शकता. थोड्या पाण्यामध्ये हायड्रोजन पॅरॉक्साइड टाका आणि हे मिश्रण बादलीवर लावावे. बादली जुन्या ब्रशने घासून धुऊन घ्यावी. त्यामुळे बादलीवर नव्यासारखी चमक येईल.
३. व्हिनेगर
सहसा चायनीज फूड बनवताना व्हिनेगरचा वापर केला जातो; पण व्हिनेगर बादली, मग स्वच्छ करण्यासाठीही तितकेच फायदेशीर आहे. दोन कप व्हिनेगर पाण्यात मिसळा आणि जुन्या ब्रशने बादली धुवा.
(टीप : वरील लेख हा प्राप्त माहितीवर आधारित आहे)