Kitchen Jugaad: झाडू ही एक अशी वस्तू आहे जी प्रत्येकाचा घरात असतेच. घराच्या स्वच्छतेसाठी झाडूचा वापर केला जातो. झाडूशिवाय घरातील साफसफाई पूर्ण होऊच शकत नाही. संपूर्ण घराची साफ-सफाई एकट्या झाडूने केली जाऊ शकते. पण जेव्हा आपण नवीन झाडू विकत आणण्याचा विचार करतो. तेव्हा सर्वात पहिलं आठवतं ते झाडूतील भुसा. नवीन झाडूमधून प्रचंड भुसा निघतो. झाडू मारताना तो भुसा घरभर पसरतो. या भुसामुळे घरात आणखी कचरा होतो. केर काढताना कचऱ्यापेक्षा त्यामधील भुसाच जास्त खाली पडतो. अशावेळी झाडूतील भुसा कसा काढायचा हा प्रश्न अनेक महिलांना सतावत असतो. दरम्यान एका गृहिणीने खास महिलांसांठी आज असाच एक हटके आणि टेन्शन दूर करणारा जबरदस्त असा किचन जुगाड दाखवला आहे. ज्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

दरवाजाचं कुलूप तुमच्या घरातील झाडूला लावून पाहा; विचित्र आहे पण असाच जुगाड व्हायरल व्हिडिओतील महिलेने दाखवला आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. तुम्ही कधी झाडूला कुलूप लावलं आहे का? नाही ना.. मग एकदा झाडुला कुलूप लावून बघा. हा जुगाड तुमच्या दैनंदिन जीवनातील अनेक समस्यांवर मात करेल. झाडूला कुलूप लावल्यानंतर झालेले बदल पाहून तुम्ही थक्क होऊन जाल. एका गृहिणीने या जुगाडाचा शोध लावला असून या अनोख्या जुगाडाचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. पाहूया महिलेने नेमक काय केलं आहे.

(हे ही वाचा: अंडी उकडताना फुटतात किंवा खराब होतात? ‘या’ ४ सोप्या किचन टिप्स वापरून पाहा, सोलताना होणार नाही त्रास!)

तुम्हाला नेमकं काय करायचं? 

महिलेने व्हिडिओमध्ये सांगितल्यानुसार, सर्वप्रथम तुम्हाला काॅटनचा मोठा बॅग घ्यायचा आहे. ज्यात तुम्हाला झाडू घालता येईल. झाडूचा जो खालचा झुपरेदार भाग असतो तो काॅटनच्या बॅगमध्ये पूर्ण घाला. झाडू घातल्यानंतर त्यानंतर एक कुलूप घेऊन त्यावर हलक्या हाताने वरुन टॅप करायचं आहे, असे महिलेने सांगितलं आहे. म्हणजे हळूवारपणे तुम्हाला कुलूप कॉटन बॅगला घासायचं आहे, ज्यात झाडू ठेवला आहे. थोड्या वेळाने काॅटनच्या पिशवीतून झाडू बाहेर काढा आणि तुम्हाला या पिशवीमध्ये झाडूचा भुसा पडलेला दिसेल. यामुळे तुमची सर्वात मोठी समस्या सुटेल, असे महिलेचे म्हणणे आहे. हा प्रयोग तुम्ही देखील करुन पाहा… 

येथे पाहा व्हिडीओ

Seema Family Vlog या युट्यूब चॅनेलवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. हा जुगाड तुम्हीही नक्की ट्राय करुन पाहा आणि खरंच याचा फायदा तुम्हाला झाला का, हे आम्हाला कमेंट करुन कळवा.

(Disclaimer: या लेखात देण्यात आलेली माहिती सोशल मीडियावरील व्हायरल झालेल्या व्हिडीओवर आधारित आहे. लोकसत्ता याची पुष्टी करत नाही.)