लहानांपासून मोठ्यांपर्यंत अनेकांना हल्ली चष्मा लागलेला आहे. चष्म्याच्या मदतीने आपण डोळ्यांच्या समस्यांपासून स्वत:ला वाचवू शकतो. चष्मा वापरणारे लोक चष्म्यांना खूप जपतात. कारण- चष्मा हा अत्यंत नाजूक असतो; पण अनेकदा आपण चष्म्याची लेन्स चांगल्या रीतीने स्वच्छ करीत नाही. चष्म्याच्या लेन्सची काळजी घेणे खूप जास्त गरजेचे आहे. आज आम्ही तुम्हाला चष्मा स्वच्छ करण्याच्या काही खास टिप्स सांगणार आहोत. अशा आहेत त्या टिप्स ….

जर तुम्हाला चष्मा स्वच्छ करायचा असेल, तर अर्धा कप डिस्टिल वॉटरमध्ये अर्धा कप ‘विच हेजल’ मिक्स करा. या मिश्रणाला एका स्प्रे बाटलीमध्ये भरा आणि चष्म्याच्या लेन्सवर स्प्रे करा. त्यानंतर मायक्रोफायबर कापडाने लेन्स व्यवस्थित पुसा. तुमचा चष्मा स्वच्छ होईल.

Tomato soup in winter is good for health Tomato soup recipe in marathi
हॉटेलसारखं परफेक्ट टोमॅटो सूप १० मिनीटांत होईल तयार; थंडीत गरमागरम सूप करा एन्जॉय, सोपी रेसिपी
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
curd and coffee for tan removal
Tan Removal Remedy : चमकदार त्वचेसाठी घरच्या घरी करा उपाय! दही व कॉफीचा लावा मास्क; पण डॉक्टरांचे मत काय?
Black Plastic Kitchenware May Look Nice But Could Be Harming Your Health: Latest Study Finds
महिलांनो तुम्हीही स्वयंपाकघरात काळी भांडी वापरता? परिणाम वाचून पायाखालची जमीन सरकेल
leopard's mouth got stuck in the water pot
“लोक म्हणतात त्याला कर्माचे फळ मिळाले…”, कळशीत अडकलं बिबट्याचं तोंड अन् असं काही झालं; VIDEO पाहून नेटकरी करतायत कमेंट्स
Ragi Upma Recipe
२ वाटी पीठापासून नाश्त्यामध्ये बनवा नाचणीचा पौष्टिक उपमा; वाचा साहित्य आणि कृती
how to remove bad smell from bathroom
बाथरूम आणि टॉयलेटमधील दुर्गंधी दूर करण्यासाठी वापरा ‘ही’ घरगुती ट्रिक
Savlyachi Janu Savali
Video: सावली द्विधा मनस्थितीत अडकणार; भैरवीला दिलेले वचन कसे पूर्ण करणार? पाहा ‘सावळ्याची जणू सावली’ मालिकेचा प्रोमो

हेही वाचा : महिलांसाठी नव्हे, पुरुषांसाठी बनवले होते सर्वात आधी सॅनिटरी पॅड! मुलं कसे आणि कुठे वापरायचे?

चष्मा स्वच्छ करताना नेहमी काळजी घ्या आणि चुकूनही थंड पाण्याने चष्मा धुऊ नका. अर्धा कप गरम पाण्यामध्ये लिक्विड साबण मिक्स करा. या मिश्रणाला चष्म्याच्या लेन्सवर टाका आणि मऊ कापडाने लेन्स पुसा.

चष्मा स्वच्छ करण्यासाठी तुम्ही व्हिनेगरचाही वापर करू शकता. त्यासाठी पाण्यामध्ये व्हिनेगर मिक्स करा आणि हे मिश्रण एक स्प्रे बाटलीत भरा. त्यानंतर लेन्सवर स्प्रे करा. त्यानंतर कॉटन किंवा मायक्रोफायबर कापडाने लेन्स पुसून घ्या.

हेही वाचा : खिडक्यांच्या काचा वारंवार खराब होतात? फक्त पाच रुपयांत ‘या’ वस्तू वापरून काचा चमकवा नव्यासारख्या

अल्कोहोलचा वापर करूनही चष्मा स्वच्छ करू शकता. पाण्यात अल्कोहोलचे काही थेंब मिक्स करा. त्यात डिश वॉश लिक्विडचे काही थेंब टाका आणि हे मिश्रण एका स्प्रे बाटलीत भरून लेन्सवर स्प्रे करा. त्यानंतर लेन्स मऊ कापडाने पुसा.

Story img Loader