चांगला स्वयंपाक करता येणे जितके महत्त्वाचे असते तितकेच तुमचे स्वयंपाकघर स्वच्छ आणि नीटनेटके ठेवणे देखील असते. तुम्ही स्वयंपाकघराची स्वच्छता नेहमीच करत असाल. पण बऱ्याचदा स्वयंपाक घरातील काही छोट्या छोट्या गोष्टींकडे दुर्लक्ष होते. स्वयंपाकघरातील डब्बे जर बरेच दिवस साफ केले नाही तर ते तेलकट होऊ शकतात. सामान्य पद्धतीने साफ करूनही कित्येकदा त्याचा चिकटपणा जात नाही. अशावेळी त्यामध्ये कोणतेही सामान ठेवण्यास अडचण येऊ शकते. जर तुमच्या स्वयंपाकघरामध्ये असे डब्बे असतील तर येथे काही टीप्स दिल्या आहेत ज्याचा वापर डब्याचा चिकटपणा हटविण्यासाठी करू शकतो.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

आपल्या स्वयंपाक घरात असे काही पदार्थ असतात जे आपल्याला कोणत्या कोणत्या गोष्टीसाठी उपयोगी ठरू शकतात. स्वयंपाक तयार करण्यासाठी साफ-सफाईमध्ये चहा पावडर खूप उपयोगी ठरू शकते. तुम्हाला माहितीये का भांड्याचा चिकटपणा दूर करण्यासाठी चहा पावडर मदत करू शकते. होय. तुम्ही योग्य तेच ऐकत आहात.

हेही वाचा- प्रेशर कुकरच्या शिट्टीतून वाफ लीक होतेय? ‘या’ ट्रिक्स वापरा, झटपट शिजेल अन्न

चहापावडरने कसे साफ करू चिकट डब्बे

जेव्हा तुम्ही चहा तयार करता तेव्हा शिल्लक राहिलेली चहापावडर नेहमी फेकून देऊ शकता. तुम्ही त्याचा वापर भांडे साफ करण्यासाठी करू शकता. तुम्हाला तुमच्या शिल्लक राहिलेली चहापावडर एखाद्या भांड्यात घेऊन उकळा. मग त्यात डिशवॉश पावडर मिसळून तेलकट डब्बे साफ करू शकता. ही ट्रीक तुम्हाला डब्बे चांगल्या पद्धतीने साफ करण्यासाठी मदत करू शकते. मग बघा तुमच्या स्वंयपाकघरातील डब्बा चकचकीत होईल.

मराठीतील सर्व लाइफस्टाइल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: How to clean kitchen dabba using tea powder snk
Show comments