How to clean mirror : आरसा ही अशी वस्तू आहे की, जी प्रत्येकाच्या घरी असते. क्वचितच कोणी असेल की, ज्याच्या घरी आरसा नाही. घरातून बाहेर पडताना प्रत्येक व्यक्ती एकदा तरी आरशासमोर उभी राहते आणि स्वत:ला पाहते. आरशासमोर स्वत:चे रूप न्याहाळणे अनेकांना आवडते. आपण कसे दिसतोय, याची उत्सुकता प्रत्येकाला असते. त्यामुळे आरशाचा वापर प्रत्येक जण करतो.
अनेकदा घर स्वच्छ करताना आरसा स्वच्छ करायला मात्र आपण विसरून जातो.
बरेच दिवस आरसा स्वच्छ न केल्यामुळे आरशावर डाग पडतात. आरसा स्वच्छ करताना अनेक जण काही चुका करतात आणि त्यामुळे आरशावर आणखी डाग पडतात. धूसर आरसा कसा स्वच्छ कसा करायचा, हा प्रश्न तुम्हाला पडतो का? टेन्शन घेऊ नका. आज आम्ही तुम्हाला अगदी सोपा उपाय सांगणार आहोत.

तुम्ही बटाट्याच्या मदतीने आरसा स्वच्छ करू शकता. तुम्हाला वाटेल हे कसे शक्य आहे? पण, हे खरेय. सहसा बटाटा आपण खातो; पण बटाट्याचा वापर आरसा स्वच्छ करण्यासाठीसुद्धा केला जातो.

Hack to remove coconut from its shell
नारळाच्या करवंटीमधून खोबरे बाहेर काढण्यासाठी ‘ही’ सोपी पद्धत नक्की ट्राय करा
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
Ants in a box of rice
Kitchen Hacks: तांदळाच्या डब्याला मुंग्या लागल्यात? ‘हे’ सोप्पे उपाय मुंग्यांना पळवून लावतील
Where skeleton flowers grow best
‘ही’ दुर्मिळ फुले पावसाच्या पाण्यात दिसतात आरशाप्रमाणे पारदर्शी; असे का? जाणून घ्या…
Lays Paneer Bites Recipe in marathi easy paneer recipe
१० रुपयांच्या चिप्सपासून बनवा पनीरचा ‘हा’ खास पदार्थ, संध्याकाळच्या नाश्त्यासाठी ठरेल बेस्ट! लगेच वाचा रेसिपी
bmc launched cleanliness drive to clean Mumbai
महापालिकेने घेतला शहर स्वच्छतेचा वसा, दररोज स्वच्छता मोहीम राबविण्याचा महापालिकेचा निर्णय
kitchen tips hacks how to clean kitchen utensils shiny
Kitchen Hacks : चपातीमुळे काळा पडलेला, खराब झालेला तवा काही मिनिटांत होईल चकाचक; वापरा फक्त ‘या’ सोप्या ट्रिक्स
Makar Sankranti Special: Easy Khichdi Recipe
Makar Sankranti Special Khichdi : मकर संक्रांतीला अशी बनवा चविष्ठ खिचडी, एका क्लिकवर जाणून घ्या ही सोपी रेसिपी

हेही वाचा : घरी कोथिंबीर कशी लावायची? जाणून घ्या लागवडीची ही सोपी पद्धत

फक्त एका बटाट्याने असा स्वच्छ करा आरसा

एक बटाटा घ्या. या बटाट्याला मधोमध कापून घ्या. बटाट्याचा पांढरा भाग खराब आरशावर घासा. नीट घासल्यानंतर आरसा पाण्याने स्वच्छ धुऊन घ्या. तुमचा आरसा नव्यासारखा चमकताना दिसेल. ही ट्रिक वापरून पाहा; मग तुम्हीही आश्चर्यचकित व्हाल.

Monika Kholiya या यूट्युब अकाउंटवरून असाच एक व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओमध्ये एक तरुणी बाथरूमचा आरसा बटाट्याने स्वच्छ करताना दिसत आहे. तीसुद्धा बटाट्याला मधोमध कापते आणि बटाट्याचा पांढरा भाग आरशावर घासते. आरसा पाण्याने स्वच्छ धुतल्यानंतर काही क्षणांतच तिचा आरसा चकचकीत दिसतो.
या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिलेय, “१०० टक्के काम करणारी ही ट्रिक आहे.” तर एका युजरने लिहिलेय, “जर बटाटा नसेल, तर तुम्ही खायचा नैसर्गिक चुनासुद्धा वापरू शकता.”

(टीप : वरील लेख हा प्राप्त माहितीवर आधारित आहे)

Story img Loader