आपल्या प्रत्येकाच्याच घरात झाडू असतो, आपल्या घराला स्वच्छ ठेवतो, घरातली सगळी घाण जो बाहेर काढतो; असा झाडू प्रत्येकाच्याच घरात असतो. तुमच्याही घरात झाडू असेल तर तो झाडू एकदा नक्की पाण्यात टाका. आता तुम्ही म्हणाल झाडू पाण्यात टाकून काय होणारे… तर कमाल होईल. तुम्हीही हे पाहून अवाक् व्हाल. बऱ्याच वर्षांपासून असलेलं तुमचं टेन्शन या जुगाडामुळे नक्कीच कमी होईल. एका गृहिणीने हा जुगाड दाखवला आहे. या हटके जुगाडाचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय.
गृहिणींकडे बरेच घरगुती भन्नाट जुगाड असतात. काही गृहिणी सोशल मीडियावर हे जुगाड शेअर करतात. अशाच एका गृहिणीने शेअर केलेला हा जुगाड सध्या खूप व्हायरल होतोय.
जुना झाडू रात्रभर पाण्यात भिजवा आणि कमाल पाहा
घरातील झाडू जुना झाला असेल किंवा तुटला असेल तर तो लगेच टाकून देऊ नका, हाच झाडू स्वच्छ करण्यासाठी आम्ही तुम्हाला एक उपाय सांगणार आहोत. या व्हिडीओमध्ये गृहिणीने दाखवल्याप्रमाणे तुमच्या घरातील जुना झाडू जमिनीवर ठेवा, त्यावर पाणी टाकून झाडूचा पुढचा भाग भिजवा. आता त्यावर साबण किंवा कपडे धुण्याची पावडर लावा. आता ब्रशने पुढील भाग हळू हळू घासा. यामुळे झाडूला चिकटलेली घाण, धूळ निघून जाईल; असं या गृहिणीने सांगितलं आहे. त्यानंतर या झाडूला रात्रभर पाण्यात भिजवा आणि दुसऱ्या दिवशी कडक उन्हात वाळवा. यावेळी एक गोष्ट लक्षात ठेवा, झाडू खूपच खराब झाला असेल, त्याच्या काठ्या निघत असतील तर हा उपाय करू नका.
पाहा व्हिडीओ‘
हेही वाचा >> Kitchen Jugaad Video: रात्री झोपण्याआधी गॅसवर कांदे नक्की ठेवा; कुटुंबावरील मोठा धोका टळेल
@Puneritadka यूट्यूब अकाउंटवरून हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. तुम्ही हा उपाय करून पाहा आणि त्याचा परिणाम आम्हाला आमच्या सोशल मीडियाच्या कमेंट बॉक्समध्ये सांगा.