Cleaning Tips : घरच्या घरी फोन स्वच्छ कसा करायचा? जाणून घ्या या सोप्या टिप्सफोन हा प्रत्येकाच्या आयुष्यातील महत्त्वाचा घटक आहे. हल्ली माणूस फोनशिवाय जगू शकत नाही. दररोजच्या धावपळीत फोन स्वच्छ करायला वेळ मिळत नाही ज्यामुळे फोनचे आतील पार्ट्स खराब होऊ शकतात. जर तुम्हालाही तुमचा फोन घरच्या घरी स्वच्छ करायचा असेल तर तुम्ही काही खास टिप्स फॉलो करू शकता.

१. फोन स्वच्छ करण्यासाठी कधीच कोणत्याही स्प्रेमध्ये क्लीनर भरु नये. कारण यामुळे क्लीनर फोनच्या आत जाण्याची जास्त भीती असते आणि फोन खराब होऊ शकतो.

हेही वाचा : बाथरूममधील बादली, मग खराब झाले असतील तर या सोप्या ट्रिक्स वापरा; नव्यासारखी येईल चमक

२. कधीही फोन स्वच्छ करताना कॅमेरा घासू नका यामुळे कॅमेराची लेन्स खराब होऊ शकते.

३. स्मार्टफोन स्वच्छ करताना अल्कोहोलशी संबंधीत क्लीनर्स वापरा कारण हे क्लीनर्स फोनच्या आतमध्ये गेले तरी काही क्षणातच हवेत शोषून घेतले जातात आणि कोणत्याही प्रकारचे नुकसान होत नाही.

हेही वाचा : एक टूथब्रश किती दिवस वापरावा? प्रत्येकाला माहिती असायलाच हवे, जाणून घ्या

४. फोन स्वच्छ करताना जर तुम्ही एखाद्या ब्रशचा वापर करत असाल तर ब्रश सॉफ्ट आहे का, हे तपासा आणि ब्रशचा आकारही लहान निवडा. यामुळे फोनवर स्क्रॅचेस येत नाही.

५. फोन स्वच्छ करताना कधीच घरातील जुन्या कपड्यांचा वापर करू नका. याऐवजी तुम्ही मायक्रोफायबर क्लॉथचा वापर करू शकता. हा कापड मऊ असतो आणि स्वच्छ करण्यासाठी सोयीस्कर असतो.

(टीप: वरील लेख हा प्राप्त माहितीवर आधारित आहे)

Story img Loader