Cooker and colgate jugaad: कुकरचा वापर घरोघरी केला जातो. रोजच्या वापरात असलेला हा कुकर आपण रोज स्वच्छ करतो; पण तरीही अनेकदा बाहेरून आणि आतून तो काळवंडू लागतो. नव्या कुकरची काळजी अगदी वापरण्यापासून ते धुण्यापर्यंत आपण घेत असतो. घड्याळावर चाललेल्या आपल्या या आयुष्यात जेवणाची कामे पटापट व्हावीत म्हणून अनेकदा कुकरचा वापर होत असूनही त्याच्या स्वच्छतेकडे नकळतपणे दुर्लक्ष होऊ लागते आणि त्याचा परिणाम म्हणजे काळवंडलेला कुकर.

कुकरमध्ये कोणताही पदार्थ आपण शिजवतो किंवा बनवतो तेव्हा काही केल्या त्याचे डाग जात नाहीत. नेहमीच आपण भांड्याच्या साबणाने कुकर साफ करायला जातो. तसेच या साबणाने कुकर जोरजोरात घासूनही त्याचे डाग काही केल्या जात नाहीत. काळवंडलेला हा कुकर दिसायलाही चांगला दिसत नाही आणि तो नीट स्वच्छही झालेला नसतो. याचा उपाय शोधण्यासाठी अनेकदा आपण महागडे प्रॉडक्ट्स वापरून बघतो; पण त्याचा काही केल्या फायदा होत नाही. पण, खरं तर तुम्ही घरच्या घरी यासाठी एक रामबाण उपाय करून पाहू शकता; ज्यामुळे तुमचा कुकर चकाकेल आणि सगळे काळपट डाग चुटकीसरशी गायब होतील. चला तर मग जाणून घेऊ हा उपाय नक्की आहे तरी काय…

Sprouted coconuts What they are and if its advisable to have them
अंकुरलेले नारळ म्हणजे काय? ते खाणे योग्य आहे का? तज्ज्ञ काय सांगतात…
walmik karad illegal transportation
वाल्मीक कराड: राखेच्या अवैध वाहतुकीतून दहशतीचा धुरळा!
Woman driving BMW steals flower pot from outside Noida shop, video goes viral
“अशा श्रीमंतीचा काय उपयोग?” आलिशान बीएमडब्ल्यूमधून आलेल्या महिलेचं रात्री १२ वाजता लाजीरवाणं कृत्य; VIDEO व्हायरल
Marathi actress Tejaswini Sunil married to Shreeram Nijampurkar
प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीने ३१ डिसेंबरला बांधली लग्नगाठ, पारंपरिक पद्धतीने पार पडला सोहळा, पाहा Photos
Do you know how to make Chakali in the market
बाजारातील तयार चकल्या कशा बनवतात माहीत आहे का? पाहा VIRAL VIDEO तून ‘हा’ जुगाड
Mangal rashi parivrtan 2024
पुढील ८४ दिवस मंगळ करणार मालामाल; ‘या’ तीन राशींचे लोक कमावणार बक्कळ पैसा
unhygienic vegetables frozen matar shocking video goes viral on social media
आता तर हद्दच झाली! वाटाणे पाण्यात टाकताच काय झालं पाहा; VIDEO पाहून सोललेले वाटाणे घेताना शंभर वेळा विचार कराल
Diwali 2024 reuse flowers and diya trending jugad video goes viral
VIDEO: दिवाळीनंतर सुकलेली फुलं आणि गूळ पाण्यात नक्की टाकून पाहा; परिणाम पाहून तुम्हीही अवाक् व्हाल

कुकरचे डाग घालवण्यासाठी जबरदस्त जुगाड

कुकर घासण्याच्या आधी एका भांडी घासायच्या काथ्यावर कोलगेट आणि सोडा घ्या. त्यावर थोडेसे पाणी घेऊन, कुकर चांगला घासून घ्या. वाटल्यास अजून थोडे पाणी त्यात टाका आणि कुकरच्या आतल्या बाजूने स्वच्छ घासून घ्या. तशीच कुकरची बाहेरील बाजूदेखील स्वच्छ करून घ्या. त्यामुळे कुकरमध्ये असलेले काळे डाग निघून जातील आणि तुमचा कुकर अगदी नवाकोरा दिसेल.

हेही वाचा… लग्नासाठी कांजीवरम साडी विकत घेताय? मग थांबा! अस्सल साडी ओळखण्यासाठी ‘या’ सोप्या टिप्स लक्षात ठेवा

कुकरला स्वच्छ करताच क्षणी तुम्हाला जाणवेल की, कुकर अगदी चकाचक झालाय. याच उपायाने तुम्ही अ‍ॅल्युमिनियमचं कोणतंही भांडं स्वच्छ करू शकता आणि त्यावरचे डाग कायमचे घालवू शकता.

@PoonamKiRasoiandtips या यूट्यूब अकाउंटवरून हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. तुम्हीही हा उपाय नक्की करून पाहा.

हेही वाचा… New Year 2025: गर्दीपासून थोडं लांब! नवीन वर्षाच्या सेलिब्रेशनसाठी ‘या’ टॉप ५ ठिकाणांना भेट द्यायला विसरू नका

Story img Loader