चांदीचे दागिने कालांतराने काळे पडतात. अनेकदा चांदी काळी पडली की, आपण चांदी स्वच्छ करण्यासाठी सोनाराकडे जातो; पण प्रत्येक वेळी सोनाराकडे जाणे शक्य होत नाही. तुमचा वेळ आणि पैसा दोन्ही वाचावे म्हणून आज आम्ही तुम्हाला काळ पडलेले चांदीचे दागिने घरच्या घरी कसे स्वच्छ करायचे, याविषयी काही घरगुती ट्रिक्स सांगणार आहोत.
भांडी घासण्याचा लिक्विड साबण
सुरुवातीला गरम पाण्यात भांडी घासण्याच्या लिक्विड साबणाचे दोन-तीन ड्रॉप टाका. त्यानंतर चांदीच्या वस्तू त्या पाण्यात बुडवून ठेवाव्यात आणि या वस्तू स्वच्छ करण्यासाठी ब्रिसलच्या ब्रशचा उपयोग करावा. मग सुती कापडाने या चांदीच्या वस्तू कोरड्या कराव्यात.
हेही वाचा : किचन सिंक ब्लॉक झालंय? प्लंबरला बोलवण्याची काहीही गरज नाही…हे घरगुती उपाय वापरून पाहा
टूथपेस्ट
एक जुना टूथब्रश घेऊन, त्यावर पेस्ट लावावी. मग त्या ब्रशने चांदीच्या वस्तू चांगल्या घासून घेतल्यानंतर पाच-दहा मिनिटांसाठी गरम पाण्यात बुडवून ठेवाव्यात. मग त्या वस्तू पुसून घ्याव्यात.
बेकिंग सोडा
बेकिंग सोड्यामध्ये पाणी टाकावे आणि घट्ट पेस्ट बनवावी. हाताने ही पेस्ट चांदीच्या दागिन्यांवर लावावी. १५- २० मिनिटांनंतर दागिने धुऊन घ्यावेतआणि सुती कापडाने पुसावेत.
हेही वाचा : बाथरूममधील बादली, मग खराब झाले असतील तर या सोप्या ट्रिक्स वापरा; नव्यासारखी येईल चमक
हेअर कंडिशनर
चांदीच्या दागिन्यांवर हेअर कंडिशनर लावावे. त्यानंतर ब्रशने दागिने चांगले घासावेत. त्यामुळे तुमच्या दागिन्यांवर जमा झालेले काळेपण दूर होईल.
(टीप : वरील लेख हा प्राप्त माहितीवर आधारित आहे)