दिवाळी आता सुरू झाली आहे. घरोघरी दिवाळीच्या फराळची गडबड सुरू आहे. फराळ म्हटल की त्यात तेलकट पदार्थ आहे. चकली, करंजी, शंकरपाळ्या सारखे पदार्थ तेळात तळले जातात. एवढचं काय लाडू तयार करण्यासाठी देखील बुंदी किंवा शेव तेलात तळून करावी लागते. फराळ कितीही चविष्ट असला तरी तळणीचे काम फार अवघड असते. एकतर ते अत्यंत सावधगिरीने आणि काळजीपूर्वक करावे लागते. कारण तळाताना जरा दुर्लक्ष झालं तर सर्व मेहनतीवर पाणी फिरू शकते.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

तळताना नेहमी तेलामध्ये पदार्थांचा गाळ साचतो. त्यामुळे गरम तेलामध्ये तो करपतो. तसेच तळलेल्या पदार्थांनाही तो चिकटतो. पण तुम्हाला माहितीये का? तळण तळताना तेलातील शिल्लक गाळ तुम्ही चुटकीसरशी वेगळा करू शकता? तुम्हाला वाटेल आम्ही तेल थंड करून मग ते चाळणीने गाळून घेऊन वेगळे करण्याबाबत सांगत आहोत. पण आमच्याकडे यापेक्षा वेगळा आणि प्रभावी उपाय आहे. चला तर मग जाणून घेऊ या…

हेही वाचा – लवंगी मिर्ची फटाका कसा तयार केला जातो; पाहा Viral Video

sushmaswathidivili या इस्टाग्राम अकांउटवर ही ट्रिक शेअर केली आहे. व्हायरल व्हिडीओमध्ये दाखवले आहे की, एका वाटीत ३ टेबलस्पून कॉर्नफ्लॉवर त्यात पाणी टाका आणि तळणीच्या गरम तेलात टाका. तेलात टाकताच साचलेला सर्व गाळ एकत्र येईल आणि पिठाला चिकटेल. त्यानंतर थोड्यावेळाने तळलेले पिठ बाजूला काढा. त्यासह तेलातील गाळही निघून जाईल. तुम्ही आरामात कोणताही पदार्थ तेलात तळू शकता.

मराठीतील सर्व लाइफस्टाइल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: How to clean used cooking oil while making faral for diwali know easy trick snk