आजकाल अनेकांच्या घरात विविध प्रकारच्या पाण्याच्या बाटल्या वापरल्या जातात. तुमच्यापैकी अनेकजण जिमला जाताना, प्रवासात, ऑफिस, शाळा, कॉलेजला जाताना पाण्याची बाटली घेऊन जातात. पण सतत वापरून या बाटल्या अस्वच्छ होतात. परंतु बऱ्याच वेळा पाण्याच्या बाटलीचे तोंड लहान असल्याने त्या बाहेरुनचं स्वच्छ करता येतात. परंतु त्या आतून नीट स्वच्छ करता येत नसल्याने त्यात बॅक्टेरिया वाढू लागतात. अशावेळी आम्ही तुम्हाला पाण्याची बाटल्या आतून स्वच्छ करण्यासाठी काही सोप्या टिप्स सांगणार आहोत.
पाण्याची प्लास्टिकची बाटली आतून स्वच्छ करण्याच्या टिप्स
१) डिटर्जंट आणि गरम पाणी
दररोज वापरल्या जाणाऱ्या पाण्याच्या बाटल्या तुम्ही डिटर्जंट आणि गरम पाण्याने नीट स्वच्छ करु शकता. जर पाण्याच्या बाटलीचे तोंड रुंद असेल तर तुम्ही स्पंजच्या साहाय्याने ते आतून स्वच्छ करु शकता, जर तुमच्याकडे इंसुलेटेड पाण्याची बाटली असेल तर ती तुम्ही गरम पाण्याने भरून १० मिनिटे तशी ठेवा, यामुळे त्यातीत बॅक्टेरिया मरतात.
२) व्हिनेगर आणि गरम पाणी
साबण आणि पाण्याने धुतल्यानंतर बाटलीत एक चतुर्थांश व्हिनेगर घाला. आता त्यात गरम पाणी घालून वरपर्यंत भरा. बाटलीमध्ये हे द्रावण रात्रभर भरुन ठेवा आणि नंतर कंटेनर रिकामा करा. यानंतर बाटली स्वच्छ पाण्याने धुवा.
३) बेकिंग सोडा आणि गरम पाणी
बाटलीत दोन चमचे बेकिंग सोडा टाका आणि गरम पाणी घालून वरपर्यंत भरा. आता बाटलीचे झाकण बंद करुन नीट शेक करा. यानंतर झाकण काढा आणि काही तास असेच राहू द्या. यानंतर बाटली रिकामी करा आणि स्वच्छ पाण्याने धुवून बाजूला ठेवा.
४) ब्लीच आणि थंड पाणी
पाण्याच्या बाटलीतून येणारी दुर्गंधी आणि बॅक्टेरिया दूर करण्यासाठी ब्लीच आणि थंड पाणी ही एक चांगली पद्धत आहे. यासाठी बाटलीत एक चमचा बेकिंग सोडा आणि थंड पाणी टाका आणि रात्रभर ठेवा आणि सकाळी रिकामी करा, यानंतर डिटर्जंटने स्वच्छ करुन कोरडे करा.