Kitchen Hacks for Pressure Cooker: कुकरमध्ये अन्न शिजवणे अत्यंत सोप असते. कुकरमध्ये जेवण बनवल्यामुळे गॅस सिलेंडरची देखील बचत होते. तसेच लवकर जेवण तयार होते. स्वयंपाकघरातील कित्येक भांड्याचे काम कुकर पूर्ण करू शकतो पण जेव्हा सफाईचा प्रश्न येतो तेव्हा यासाठी खूप कसरत करावी लागते.
जर कुकरला व्यवस्थित साफ केले गेले नाही तर त्यामध्ये घाण साचू शकते. पुढे जाऊन इतकी वाढेल की ते साफ करणे अवघड होते आणि हळू हळू कुकर पिवळा पडतो. कुकरचा पिवळापणा दुर करणे खूप आवश्यक आहे कारण अशा प्रकारच्या अस्वच्छता असल्यामुळे आरोग्यावर दुष्परिणाम पाहायला मिळतो.
कुकरचा पिवळापणा कसा करावा दूर?
बेकींग सोडा ठरेल उपयोगी
बेकिंग सोडा आणि लिंबाच्या मदातीने कुकर पुन्हा नव्यासारखा चमकू लागेल. तुम्हाला फक्त एवढंच करायचे की सर्वात आधी बेकिंग सोडा आणि मीठ पूर्णपणे कुकरमध्ये सोडा. त्यानंतर हळू हळू स्पंजने साफ करा. असे केल्यामुळे पिवळेपणा गायब होतो. त्यानंतर कोणत्याही डिसवॉशने तुम्ही कुकरची सफाई करू शकता. डिशवॉशने सफाई केल्यानंतर कुकर पाण्याखाली स्वच्छ धूवून घ्या. असे केल्यानंतर कुकर नव्यासारखा दिसेल.
हेही वाचा – पावसामध्ये तुमचा Smartphone सुरक्षित कसा ठेवावा? जाणून घ्या सोप्या Safety Tips
कांद्याचा करा वापर
रोज स्वयंपाकात कांदा नसेल तर जेवणाची चव अर्धवट राहिल. पण कांद्याच्या साली कुकरला पुन्हा नवे रुप देऊ शकतात. तुम्हाला एवढेच करायचे आहे की, कुकरमध्ये कांद्याच्या साली टाकून त्या गरम कराय त्यानंतर तुम्ही डिशवॉशने धुवून टाका तुमचा कुकर अगदी नवा असल्यासारखा दिसेल.
हेही वाचा – खराब सोफा साफ करण्यासाठी ‘ही’ सोपी ट्रीक वापरा, काही मिनिटांमध्ये नव्यासारखा चमकू लागेल
पिवळा कुकर स्वच्छ करण्यासाठी हे ट्रीक एकदा नक्की वापरून पाहा.