Anger control tips : काही लोकांना छोट्या छोट्या गोष्टींवर राग येतो त्यामुळे त्यांच्या मानसिक आरोग्यावर खूप वाईट परिणाम होतो. एवढंच नव्हे तर चेहऱ्यावरही लवकर सुरकुत्या येतात. म्हणूनत तुम्हाला तुमच्या रागावर नियंत्रण ठेवता आले पाहिजे. जर तुम्हाला राग कसा नियंत्रित करावा समजत नसेल तर आम्ही तुमची मदत करू शकतो. काही सोप्या टिप्स वापरून तुम्ही तुमच्या रागावर सहज नियंत्रण करू शकता.
रागावर नियंत्रण कसे ठेवायचे
राग तुम्हाला मानसिक आणि शारीरिक दृष्ट्या कमकुवत बनवतो. यामुळे आर्थिक नुकसानही होते. राग येणे सामान्य असले तरी ते सर्वच बाबतीत योग्य नसते. काही लोक त्यांच्या रागावर नियंत्रण ठेवू शकत नाहीत, ज्यामुळे त्यांना भावनिकदृष्ट्या खूप त्रास होतो.
हेही वाचा – नाकावरील हट्टी ब्लॅकहेड्स जात नाहीयेत का? ‘या’ २ पद्धती वापरून पाहा, मुळापासून होईल नष्ट
- रागामुळे मधुमेह, उच्च रक्तदाब, डोकेदुखी यांसारख्या समस्यांना सामोरे जावे लागते. अशा स्थितीत जेव्हाही तुम्हाला राग येतो तेव्हा तुम्ही मेडिसीन बॉल जमिनीवर आपटता. यामुळे तुमचा राग शांत होईल.
- जर तुम्हाला खूप राग येत असेल तर दीर्घ श्वास घ्या किंवा काही ध्यान करण्यासाठीचे संगीत ऐका किंवा एखादे चांगले पुस्तक वाचा. याशिवाय जेव्हा तुम्हाला राग येतो तेव्हा तुमच्या भावना शेअर करा. यामुळे तुम्हाला निर्णय घेणे सोपे जाते.
- त्याच वेळी, जेव्हा तुम्हाला राग येतो तेव्हा, बॅटल, रोप, टो टच, स्प्रिंट, पुश अप्स, टो टच, हाय नी, बट किक, जंप स्क्वॅट आणि माउंटन क्लाइंब्स यांसारख्या व्यायामांचा अवलंब करा. असे केल्याने तुम्हाला खूप बरे वाटेल. यामुळे मन शांत होते.