उच्च रक्तदाबामुळे त्रस्त असणाऱ्या व्यक्तींना अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. सामान्य रक्तदाब १२०/८० mmHg असणे आवश्यक असते. यापेक्षा जास्त झाल्यास उच्च रक्तदाबाचा त्रास सुरू होतो. उच्च रक्तदाबामुळे मेंदू, हृदय यांसारख्या महत्त्वाच्या अवयवांचे नुकसान होण्याची शक्यता असते. यासह अशा रुग्णांच्या आरोग्याबाबत अनेक समस्या निर्माण होऊ शकतात. त्यामुळे उच्च रक्तदाबाचा त्रास असणाऱ्या व्यक्तींना तब्बेतीची विशेष काळजी घ्यावी लागते. उच्च रक्तदाब नियंत्रित ठेवण्यासाठी कोणत्या सवयी मदत करतात जाणून घ्या.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

व्यायाम
‘अमेरिकन हार्ट असोसिएशन जर्नल’मध्ये प्रकाशित करण्यात आलेल्या लेखानुसार आठवड्यातून तीनदा ४० मिनिटे योग्य पद्धतीने व्यायाम करणे अत्यंत आवश्यक आहे. यामुळे निरोगी राहण्यास आणि रक्तदाब नियंत्रित ठेवण्यास मदत मिळते.

आहारातील मिठाचे प्रमाण कमी करा
आहारातील मिठाचे प्रमाण कमी केल्याने हृदय निरोगी राहण्यास आणि रक्तदाब नियंत्रित राहण्यास मदत मिळते. प्रोसेस फूडमध्ये मिठाचे प्रमाण जास्त असू शकते, त्यामुळे असे पदार्थ खाताना त्यामधील मिठाचे प्रमाण तपासा. कमी मीठ असणारे पदार्थ खाल्ल्याने रक्तदाब नियंत्रित ठेवण्यास मदत मिळेल.

Bad Cholesterol : शरीरात वाढलेले खराब कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी मदत करतात ‘हे’ ड्रायफ्रूट्स

पुरेशी झोप घ्या
पुरेशी झोप न घेतल्यास रक्तदाब वाढण्याबरोबर एपनिया, इनसोमनिया हे आजार होऊ शकतात. त्यामुळे दररोज पुरेशी झोप घेणे आवश्यक आहे. झोपण्याआधी जितका शक्य असेल तितका ‘स्क्रिन टाइम’ टाळा यामुळे गाढ झोप लागण्यात मदत मिळते.

(येथे देण्यात आलेली माहिती घरगुती उपचार आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. अधिक माहितीकरिता तज्ञांचा सल्ला घ्या.)

मराठीतील सर्व लाइफस्टाइल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: How to control high blood pressure these habits will help you for that pns