आजकाल लोकांनी बैठी जीवनशैली अंगीकारली आहे, वर्क फ्रॉम होम कल्चरमुळे तर एका जागेवरुन उठणे सुद्धा कठीण झालंय. त्यामुळे आपल्या एकूणच आरोग्यावर परिणाम करणाऱ्या समस्या निर्माण होत आहेत. सांधेदुखीची समस्या ही त्यापैकीच एक आहे. बैठ्या जीवनशैलीमुळे स्थूलपणा, हृदयविकार आणि मधुमेहासारखे विकार जडतात. शरीरातील एकापेक्षा जास्त सांध्यांना सूज येणं किंवा तीव्र वेदना होणं याला संधिवात असे म्हणतात. तज्ज्ञांच्या मते, लवकर उपचार न केल्यास गंभीर संधिवात होऊ शकते. दरम्यान सेलिब्रिटी योगा ट्रेनर अंशुका परवानी यांनी इंस्टाग्रामवर निरोगी सांध्यांचे महत्त्व पटवून दिले आहे तसेच त्यासाठी कोणते व्यायाम करावे हे सुद्धा सांगितले आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

सर्वात आधी तुम्हाला तुमच्या काही सवयी बदलल्या पाहिजे. शारीरिक हालचाल, संतुलित आहार, वेळेवर झोप या गोष्टींमुळे तुम्हाला निरोगी राहण्यास मदत होईल आणि तुमचे सांधेही निरोगी राहतील. सेलिब्रिटी योगा ट्रेनर अंशुका यांनी काही साधे सांध्यांचे व्यायाम सुचवले आहेत. जे स्नायूंना बळकट करण्यास आणि सहज वळवण्यास मदत करतील. हे अगदी सोपे व्यायाम असून यामुळे कोणत्याही दुखापतीचा धोका नाही. तसेच त्यांनी काही मानेच्या व्यायामाचेही प्रकार दाखवले आहेत. तुम्हाला आहारासोबत व्यायामही करणे गरजेचे आहे कारण लठ्ठपणामुळे संधिवात होण्याचे प्रमाण वाढते आणि वाढलेल्या वजनाचा अतिरिक्त भार हा गुडघ्यावर, खुब्याच्या सांध्यावर पडत असतो. त्यामुळे सेलिब्रिटी योगा ट्रेनर अंशुका परवानी यांनी इंस्टाग्रामवर शेअर केलेला व्हिडीओ एकदा नक्की पाहा आणि आपल्या डॉक्टरांच्या सल्ल्यानं ते व्यायाम प्रकार ट्राय करा.

पाहा व्हिडीओ –

हेही वाचा – ब्रेकफास्टसाठी परफेक्ट हेल्थी मसूर डाळ वडे, चवही जबरदस्त…जाणून घ्या सोपी रेसिपी

संधिवात कसा नियंत्रित ठेवावा ?

  • नियमीत व्यायाम करा, हालचाल करत राहा
  • निरोगी वजन ठेवा, वजन वाढू देऊ नका
  • दिवसभर घरात बसून नका, घराबाहेर थोडा वेळ घालवा, सूर्यप्रकाशात बसा.
  • जे सांधे दुखत असतील तिथे हलक्या हाताने मसाज करा
  • हायड्रेटेड राहा, दिवसभरात पुरेसे पाणी प्या

एकुणच संधिवातावर नियंत्रण मिळविण्यासाठी समतोल जीवनशैली अंगीकारली पाहिजे.

मराठीतील सर्व लाइफस्टाइल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: How to control joint pain effective yoga stretches for healthy joints srk21