बदललेल्या जीवनशैलीमुळे आरोग्याकडे सर्वात जास्त दुर्लक्ष होते. रोजचा कामाचा ताण, प्रवासाची दगदग यांमध्ये स्वतःची काळजी घेण्यासाठी पुरेसा वेळ मिळत नाही. याचा परिणाम त्वचेवर लगेच दिसून येतो. चेहऱ्यावर सुरकुत्या येणे, पिंपल्स, डार्क सर्कल्स अशा समस्या उद्भवतात. त्यातच भर पडते ती वाढणाऱ्या प्रदूषणाची. प्रदूषणामुळे ‘स्किन डॅमेज’ होण्याची शक्यता असते. रोजच्या ‘स्किन केअर रुटीन’मध्ये काही गोष्टींचा समावेश केल्यास, या स्किन डॅमेजपासून सुटका मिळवण्यासाठी मदत होते. कोणत्या आहेत त्या गोष्टी जाणून घ्या.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

क्लीनजिंग, टोनिंग, मॉइश्चरायझिंग
क्लीनजिंग, टोनिंग, मॉइश्चरायझिंग या तीन पद्धती नियमितपणे पाळल्यास ते त्वचेच्या आरोग्यासाठी फायदेशीर ठरते. यामुळे प्रदूषणामुळे त्वचेला होणाऱ्या नुकसानापासून वाचवता येईल.

पाणी
निरोगी राहण्यासाठी शरीरात योग्य प्रमाणात पाणी असणे आवश्यक असते, त्वचेसाठीही पाणी तितकेच महत्त्वाचे असते. त्यामुळे त्वचेला निरोगी ठेवण्यासाठी दररोज योग्य प्रमाणात पाणी पिणे आवश्यक आहे. यासाठी पाण्याचे प्रमाण जास्त असणाऱ्या फळांचा आहारात समावेश करू शकता.

Turmeric Stains : कपड्यांवरून हळदीसारखे डाग काढण्यासाठी ‘हे’ घरगुती उपाय करतील मदत

सुर्यप्रकाश
सुर्यप्रकाशामधील युवी किरणांमुळेच नाही तर हवेतील धुलीकण, प्रदूषण यांमुळे देखील त्वचेचे नुकसान होण्याची शक्यता असते. त्यामुळे बाहेर पडल्यानंतर त्वचेवर सुर्यप्रकाश थेट पडणार नाही याची काळजी घ्या.

शीट मास्क
शीट मास्क वापरल्याने त्वचेला हायड्रेशन मिळण्यास मदत होते. कोरड्या त्वचेला पोषकतत्त्व पुरवण्यासाठी शीट मास्क उत्तम पर्याय मानला जातो. आठवड्यातून दोन ते तीन वेळा शीट मास्क वापरण्याचा सल्ला दिला जातो.