नोकरी हा आपल्यापैकी बहुतेकांच्या जीवनातील महत्त्वाचा भाग आहे. नोकरीमध्ये आपले उत्तम योगदान देण्यासाठी प्रत्येकाला खूप प्रयत्न करावे लागतात. कामाचे टार्गेट पूर्ण करताना, डेडलाइन्स पाळताना कर्मचाऱ्यांना अनेक छोट्या-मोठ्या समस्यांचा सामना करावा लागतो. या सर्वांमध्ये ऑफिसमधील वातावरण कसे आहे हेदेखील अत्यंत महत्त्वाचे असते. अनेक कर्मचाऱ्यांना त्रासदायक बॉससह काम करणे खूप आव्हानात्मक वाटते. त्यामुळे कर्मचाऱ्यांचा मानसिक ताणदेखील वाढतो. सतत बदलणाऱ्या व्यावसायिक जगात बॉससह जुळवून घेणे किती आव्हानात्मक आहे याचा अनुभव प्रत्येक कर्मचाऱ्याला केव्हा ना केव्हा येतोच.

गुरुग्राममध्ये(गुडगावं) अॅड टेक स्टार्टअपमध्ये पीआर क्षेत्रात कार्यरत २५ वर्षीय महिलेने सहकाऱ्यांबद्दलचा अनुभव द इंडियन एक्स्प्रेसला सांगितला. “ऑफिसमध्ये माझा इतर सहकाऱ्यांसह अनुभव सामान्यत: आनंददायी होता; पण बॉसबरोबर मात्र माझे फारसे मैत्रीपूर्ण संबध नव्हते. बॉसबरोबर संवाद साधणे अवघड होते. कारण- बॉस आमच्या मताचा विचार न करता, थेट उत्तरांची अपेक्षा करीत असे. माझा पूर्वीचा बॉस कामासंबंधित बाबी व्यक्तिगतरीत्या मनावर घेत असे आणि लोकांविरुद्ध मनात राग ठेवत असे. अशा अशा दडपणाच्या वातावरणामुळेमी तिथे असतानाच सहाजणांनी ती कंपनी सोडली.”

Suresh Dhas On Santosh Deshmukh
Suresh Dhas : “आका हा सोपा आका नाही, ठराविक लोकांना प्रत्येक महिन्याला…”, आमदार सुरेश धस यांचा गंभीर आरोप
Pushpak train accident of karnataka express play horn may save life of many passengers
Jalgaon Train Accident : कर्नाटक एक्स्प्रेसच्या चालकाने भोंगा वाजवला…
Bigg Boss 18 Shilpa Shirodkar Husband Sent Letter watch promo
Bigg Boss 18: “मी नीट झोपतंही नाहीये, जेवणाची चव गेलीये…”, शिल्पा शिरोडकरने ढसाढसा रडत वाचलं नवऱ्याचं पत्र, पाहा व्हिडीओ
district administration decision to crack down on extortionists along with making the district industry friendly
उद्योगस्नेही जिल्हा करण्याबरोबरच खंडणीखोरांना चाप लावण्यासाठी जिल्हा प्रशासनाचा ठोस निर्णय
Job
Job Application : “काम कब करेगा?”, बॉसने गिटार वाजवतो, मॅरेथॉनमध्ये धावतो म्हणून नाकारली नोकरी; COOची पोस्ट चर्चेत
Success Story Of IPS officer Nitin Bagate
Success Story: प्रयत्नांती परमेश्वर! एकेकाळी SP कार्यालयाबाहेरील भाजीविक्रेता आज तेथेच डीएसपी पदावर कार्यरत; वाचा, ‘या’ आयपीएस अधिकाऱ्याची गोष्ट…
Is ESOP or RSU better for employee welfare
कर्मचाऱ्यांच्या भल्यासाठी ‘ईसॉप’ की ‘आरएसयू’ चांगले?
बारामतीत कार्यक्रमाच्या निमंत्रणावरून नाराजी नाट्य; खासदार सुप्रिया सुळे यांचे मुख्यमंत्र्यांना पत्र

एका स्ट्रॅटेजी एक्स्पर्टने द इंडिन एक्स्प्रेसला आपला अनुभव सांगितला, “मी दोन त्रासदायक बॉससह काम केले आहे. पहिल्या बॉसबरोबर काही काळाने मला चांगले जुळवून घेता आले. तेथे काही गोष्टी शिकायला मिळाल्या आणि चांगली संधीही मिळाली. दुसऱ्या बॉसबरोबर मात्र कामाची भट्टी जमलीच नाही. मला राजीनामा द्यावा लागला. याचा अर्थ एखादी पद्धत सर्वांसाठी उपयोगी ठरत नाही.”

नकोशा बॉसचा त्रास होणारे तुम्ही एकमेव नाही.

“कर्मचाऱ्याकडून कामाबाबत अती अपेक्षा ठेवणाऱ्या बॉसबरोबर काम करणे अनेकदा कठीण वाटू शकते. कधी संवादात निर्माण होणारे अडथळे, विरोधाभासी अपेक्षा किंवा चुकीची नेतृत्व शैली, कर्मचारी आणि बॉस यांच्या कामाच्या पद्धतीमध्ये ताळमेळ नसणे असे काही घटक जबाबदार असू शकतात. अशा आव्हानांचा कर्मचाऱ्याचा कामावर आणि त्यांना नोकरीतून मिळणाऱ्या समाधानावर निर्विवादपणे प्रभाव पडतो,” असे तज्ज्ञ सांगतात.

तज्ज्ञांच्या मते- बॉस आणि कर्मचारी यांच्यातील संबंध वेळीच समजून घेणे कंपनीच्या उद्देश, विस्तार यांसाठी अत्यंत महत्त्वाचे असते. “वेगवेगळ्या पार्श्वभूमीतून आलेले कर्मचाऱ्यांचे अनुभव सारखेच असतात; ज्यातून त्यांचा त्रागा, निराशा, तणाव आणि या समस्येचा सामना कसा करावा यासाठी उपाय शोधण्याची धडपड जाणवते,” असे ‘स्ट्रेंथ मास्टर्स’चे संस्थापक अभिषेक जोशी यांनी द इंडियन एक्स्प्रेसला माहिती देताना सांगितले.

शेवटी कर्मचारी असो की बॉस पद कोणतेही असले तरी काम करणारी व्यक्ती ही माणूसच असते.


द इंडियन एक्स्प्रेसला माहिती देताना प्रमाणित थेरपिस्ट, समुपदेशक, मानसोपचार तज्ज्ञ व सल्लागार डॉ. हर्षिल शहा यांनी त्रासदायक बॉसचे विविध प्रकारांमध्ये वर्गीकरण केले आहे.

हेही वाचा – नवरा सतत टोमणे मारतो, प्रेयसी सतत पैशावरून बोलते…तुमचा भावनिक छळ होतोय हे कसे ओळखाल? सुटकेसाठी काय करावे?

त्रासदायक बॉसचे प्रकार (Types of annoying bosses)

तापट स्वभाव असणारे बॉस (Short-tempered ones) : असे बॉस चिडखोर असतात आणि छोट्याशा कारणावरून त्यांचा राग अनावर होऊ शकतो. त्यांचे रागावर नियंत्रण नसते आणि ते वारंवार चिडचिड करतात. अशा बॉससह काम करणारे कर्मचारी नेहमी तणावाखाली असतात. बॉसच्या सततच्या चिडचिडेपणामुळे कर्मचारी आपल्या पूर्ण क्षमतेने काम करू शकत नाहीत, असे डॉ. शहा सांगतात.

मनात राग ठेवणारे बॉस (Passive-aggressive one) : असे बॉस उघडपणे कर्मचाऱ्यांच्या चुका सांगत नाहीत; पण मनात राग ठेवतात आणि नंतर एकाच वेळी कोणत्याही कारणाने आपला राग व्यक्त करतात. असे बॉस कर्मचाऱ्यांना आधी झालेल्या चुकांबद्दल टोमणे मारतात. त्यांची निराशा ते योग्य वेळी योग्य पद्धतीने व्यक्त करू शकत नाहीत.

मवाळ किंवा पडेल भूमिका घेणारे बॉस (Submissive ones) : कंपनीचा कारभार नीट चालावा तसंच कंपनीचा विकास व्हावा यासाठी गरज असतानाही आपलं म्हणणं ठामपणे मांडू न शकणारे तसंच परखडपणे मत मांडू न शकणारे बॉस. अशा बॉसमुळे कंपनीला प्रचंड तोटा होऊ शकतो. त्यांना स्वत:लाही फटका बसतो आणि कर्मचाऱ्यांचंही नुकसान होतं.

निर्दयी स्वभावाचे बॉस (Cold-blooded ones) : कर्मचाऱ्यांचा अधिकारांचा प्रश्न येतो तेव्हा असे बॉस माणुसकी दाखवत नाहीत. ते कर्मचाऱ्यांना खूप आवश्यकता असेल तरीही कोणतीही रजा देत नाहीत. असे बॉस कर्मचाऱ्यांच्या त्यांच्याकडून दीर्घकाळ काम करण्याची अपेक्षा करतात; पण कर्मचाऱ्यांच्या मानसिक आणि शारीरिक आरोग्याचा अथवा त्यांच्या कुटुंबाचा विचारही करीत नाहीत.

सतत काम करणारे बॉस (The processor boss) : अशा बॉसबरोबर जुळवून घेणे अत्यंत अवघड असते आणि त्यांच्या कर्मचाऱ्यांनी त्यांच्याप्रमाणेच काम करावे, अशी त्यांची अपेक्षा असते. अशा बॉससह काम करण्याची गुरुकिल्ली म्हणजे नेहमी सतर्क राहणे आणि रोज, आठवड्याला व महिन्याला त्यांच्या तुमच्याकडून काय अपेक्षा आहेत ते समजून घेणे आणि त्यानुसार एक यादी तयार करुन सगळं काम झालंय ना याची खात्री करणे असे बॉस कधीच कोणाच्या कामाबाबत समाधानी नसतात.

स्वत:चं म्हणणं खरं करणारा बॉस (Narcissist ones) : केवळ ’मी‘च, ’मला‘च व ’माझे‘च, अशी धारणा बाळगणारे व त्या अनुषंगाने वागणाऱ्या व्यक्ती आत्मप्रौढी असतात. असे बॉस त्यांच्या स्वार्थी गरजांनुसार त्यांचे निर्णय घेतात आणि आपल्यासह काम करणाऱ्यांना काय वाटेल याचा अजिबात विचार करीत नाहीत. अशा बॉसला नेहमी स्वत:चे कौतुक ऐकायला आवडते आणि हाच त्यांच्यासह जुळवून घेण्याचा मार्ग असतो. असे बॉस अनेकदा एखाद्या कर्मचाऱ्याचे कौतुक करतात आणि त्यांना स्वत:च्या बाजूने वळविण्याचा प्रयत्न करतात

त्रासदायक बॉसच्या संवाद साधण्याच्या विविध पद्धती (Communication styles of difficult managers)

डॉ. शाह म्हणाले, “बॉस हे कर्मचाऱ्यांशी संवाद साधण्यासाठी अनेक पद्धतींचा वापर करू शकतात.”

प्रोजेक्शन : असे बॉस अनेकदा त्यांच्या नकारात्मक भावना, विश्वास किंवा गुण याचा दोष दुसऱ्यावर लादू शकतात. प्रोजेक्शन हे सहसा अस्वस्थ मानसिक संघर्ष आणि चिंतेपासून स्वतःचे संरक्षण करण्यासाठी केले जाते.

डिस्प्लेसमेंट (Displacement) : एकाकडच्या नकारात्मक गोष्टी दुसऱ्याला ऐकवण्याची वृत्ती असणारे बॉस. सामान्यतः असे बॉस त्यांच्या वरिष्ठांकडून मिळणारी नकारात्मक भावना त्यांच्या हाताखाली काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांकडे ढकलतात.

इतर पद्धती म्हणजे कर्मचाऱ्यावरील राग मनात ठेवणे आणि कर्मचाऱ्यांशी वाईट वागणे.

हेही वाचा – तुम्ही वारंवार फोन बघता का किंवा वारंवार हात धुता का? तुम्हाला OCD असू शकतो; OCD म्हणजे नेमकं काय? तज्ज्ञांकडून जाणून घ्या…

कर्मचाऱ्यांचे मानसिक आरोग्य परिणाम (Impact on mental health of employees)

  • कर्मचाऱ्यांचे मानसिक आरोग्य आणि नोकरीतून मिळणाऱ्या समाधानामध्ये बॉस महत्त्वपूर्ण भूमिका बजावतात. कामाच्या ठिकाणी दडपणाच्या वातावरणामुळे कुटुंबातही ताणतणाव जाणवतो.
  • याचा अनेकदा कर्मचाऱ्यांच्या मानसिक आरोग्यावर नकारात्मक परिणाम होतो; ज्यामुळे त्यांना नैराश्य, चिंता व निद्रानाश (झोप न येणे) अशा त्रासांचा सामना करावा लागतो आणि त्यांना कौटुंबिक जीवनात तडजोड करण्यास भाग पाडते. या बाबींचा परस्पर संबंधांवर परिणाम होतो.
  • “गंभीर प्रकरणांमध्ये, ते कर्मचाऱ्यांना नोकरी सोडण्यास भाग पाडू शकतात आणि आत्महत्येचा विचार करू शकतात,” असे डॉ. शाह म्हणाले.
  • याबाबत हील. ग्रो. थ्राईव्ह फाउंडेशनच्या संस्थापक व मानसोपचार तज्ज्ञ मानसी पोद्दार यांनी द इंडियन एक्स्प्रेससह संवाद साधताना सांगितले की, टॉक्सिक बॉस कर्मचाऱ्यांच्या आरोग्याच्या समस्या आणि दीर्घकालीन तणाव वाढवू शकतात; ज्यामुळे मधुमेह आणि रक्तदाब यांसारख्या समस्या निर्माण होतात.
  • “एक त्रासदायक बॉस कर्मचाऱ्यांमध्ये दुबळेपणा आणि चिंतेची भावना निर्माण करतो. कालांतराने यामुळे प्रेरणा, आनंद आणि काम करण्याची इच्छा कमी होते. अशाने अनेकदा कर्मचाऱ्यांमध्ये नैराश्य येऊ शकते आणि त्यांच्या कामाची गुणवत्ता कमी होऊ शकते, असे पोद्दार यांनी सांगितले.

हेही वाचा – टॅटू काढताना वापरलेली शाई आणि सुई सुरक्षित आहे का? टॅटूमुळे आरोग्याला धोका होऊ शकतो का?

यातून बाहेर पडण्याचा मार्ग काय?

  • कर्मचाऱ्यांनी स्वतःच्या मानसिक आणि भावनिक आरोग्याकडे दुर्लक्ष करून जास्त काम करू नये. कारण- त्याचा तुमच्या शारीरिक आरोग्यावर आणि कौटुंबिक व परस्पर संबंधांवर दीर्घकाळ नकारात्मक परिणाम होऊ शकतो, असे पोद्दार यांनी सुचवले.
  • एखाद्या त्रासदायक बॉसशी कसे वागावे याबाबत सहकारी किंवा मार्गदर्शकांची मदत घेणे महत्त्वाचे आहे. इतरांचा अनुभव जाणून घेतल्यास आणि इतरांचा सल्ला घेतल्यास एकटेपणाची भावना कमी होते आणि आव्हानात्मक व्यावसायिक नातेसंबंध हाताळण्यास मदत होते. कितीही आव्हाने असली तरी कामासंबंधित कर्तव्ये पूर्ण करणे महत्त्वाचे असते.
  • “अडचणींना शांत आणि संयमीपणे सामोरे जा. शक्य असल्यास, विचार न करता प्रतिक्रिया देणे टाळण्यास शिका आणि प्रतिसाद देण्यापूर्वी विचार करण्यासाठी थोडा वेळ घ्या,” असे स्ट्रेंथ मास्टर्सचे जोशी यांनी सांगितले.
  • संवादातील समस्या दूर करण्यासाठी किंवा विशिष्ट समस्यांचे निराकरण करण्यासाठी केवळ समस्यांवर लक्ष न देता, त्या सोडवण्यासाठी उपाय काय आहे यावर लक्ष केंद्रित करा.

पण तरीही कधी कधी अशा त्रासदायक बॉसबरोबर कसे वागावे हे शिकण्याशिवाय लोकांकडे पर्याय नसतो.

त्रासदायक बॉसबरोबर कसे वागावे?

  • १) “त्रासदायक बॉसबरोबर कसे वागावे हे समजून घेण्याआधी ते असे का वागत आहेत हे समजून घेण्याचा प्रयत्न करा. बॉसच्या वागण्यामागे काही कारण आहे किंवा तुम्ही फार अतिविचार तर करीत नाही ना? याची खात्री करा. इतर व्यक्तींप्रमाणेच बॉसलादेखील त्यांच्या काही समस्या आणि आव्हानांचा सामना करावा लागतो हे लक्षात ठेवा. जेव्हा कर्मचाऱ्यांच्या हे लक्षात येते तेव्हा बॉसबद्दल सहानुभूती निर्माण होते आणि अधिक प्रभावी संवाद साधला जाऊ शकतो,” असे जोशी सांगतात.
  • २) बॉस काही गोष्टींची काळजी का करतो हे समजून घेतल्याने तुम्हाला त्यांच्या व्यवस्थापन शैलीबद्दल माहिती मिळू शकते.
  • ३) जी माणसं आपल्याला आवडत नाहीत ती न आवडणाऱ्या गोष्टी आपल्यावर लादतात आणि त्या वर्तनापासून स्वतःला कसे दूर करावे हे शिकणे महत्त्वाचे आहे.
  • ४) जर तुमच्या बॉसला राग नियंत्रणात ठेवण्यात समस्या येत असेल, तर राग येण्याचे कारण काय आहे ते ओळखा आणि ते टाळण्याबाबत अधिक काळजी घ्या.
  • ५)काही वेळेस बॉसविरुद्ध भूमिका घेण्यावाचून तुम्हाला पर्याय नसतो. बॉसविरोधात अतिवरिष्ठांशी बोलणं, कामात बदल करवून घेणं किंवा भूमिकाच बदलून घेणं इष्ट ठरतं.
  • ६) मनापासून बोललं तर तिढा सुटू शकतो. वागणं आक्षेपार्ह असेल किंवा कामाच्या जागी मर्यादा ओलांडल्या जात असतील तर स्पष्टपणे तसं सांगा. “कामाच्या ठिकाणी चांगले वातावरण राखण्यासाठी मर्यादा ठरवणे आणि त्या जपणे आवश्यक आहे,” असे जोशी यांनी सांगितले.

तुमची वाटचाल यशस्वी होणं, कौशल्यं घोटीव होणं आणि कठीण प्रसंगाला तोंड देण्याची तयारी यादृष्टीने बॉस चांगला असणं महत्त्वाचं आहे.

Story img Loader