रंगाच्या चकाकीवर रंगकामाची परिणामकता बऱ्याच प्रमाणात अवलंबून असते. चकाकीवरून तो रंग कुठे वापरायचा हे ठरते. चढत्या भाजणीनुसार फ्लॅट, मॅट, एगशेल, सॅटीन, सेमी ग्लॉस, हाय ग्लॉस अशी विभागणी होते. फ्लॅट, मॅट, एगशेलपर्यंतचे फिनििशग हे कमी चकाकी देणारे आहे. त्यांचा वापर शक्यतो कमी वर्दळीच्या जागी करावा, जसे की बेडरूम, स्टडीरूम वगरे. या प्रकारच्या फिनििशगवरून कमी प्रमाणात प्रकाश परावर्तीत होतो. भिंतीवरील छोटे-मोठ्ठे खड्डे या फिनिशिंगने बऱ्यापकी झाकले जातात. पण कोणाला अगदी जोर लावून भिंत धुवायची सवय असेल तर अशा वेळी हा रंग जरा खराब होऊ शकतो. बाकी सॅटीन, सेमी ग्लॉस, हाय ग्लॉस या फिनिशिंगमध्ये प्रकाश बराच परावर्तीत होतो व त्यामुळे रंगाला चकाकी अधिक येते. जास्त वर्दळीच्या ठिकाणी जसे हॉटेल, लॉबी, ऑफिस किंवा घरात दिवाणखान्यात या फिनिशिंगचे रंग खास करून वापरावेत. तसेच स्वयंपाकघरात जिथे डाग पडायची शक्यता जास्त आहे, अशा ठिकाणी थोडा ग्लॉसी रंगच लावणे जास्त व्यवहारी ठरते. त्यामुळे कितीही जोर करून या भिंती घासल्या तरी रंग खराब होत नाही. पण अर्थातच रंगाची चकाकी ही तुमच्या सजावटीच्या थीमवरसुद्धा अवलंबून असते. फक्त ते एखादे हॉटेल आहे म्हणून सगळ्या भिंती चकमकायला पाहिजेत असे नाही. सजावट जर नसíगक गोष्टी वापरून किंवा इंडस्ट्रिअल लुकवर आधारित असेल तर अशा वेळी मॅट फिनिश, रफ पोत असलेल्या भिंती जास्त अनुरूप दिसतील.

कधीतरी महाबळेश्वरच्या सनसेट पॉइंटवरून पाहिलेली आकाशातील रंगछटा मनात घर करून बसलेली असते. माझी खोली रंगवताना हीच छटा देणार असे आपण मनात पक्के ठरवतो. कलर शेडकार्डमध्ये आपल्या मनातील रंग मिळाला नाही तर रंगाऱ्याला सांगून दोन-तीन रंग मिसळून पाहिजे ती छटा तयार करून घेतली जाते. पण प्रत्यक्ष चारही भिंती रंगवल्यावर सूर्यास्तामध्ये कमी पडतील एवढय़ा विविध छटा आपल्या आजूबाजूला पाहायला मिळतात. जे अर्थातच दिसायला खराब दिसते. यामागील कारण असे की रंगारी चारही भिंतीला पुरेल एवढा रंग तयार करून ठेवत नाही. सुकून वाया जाण्याच्या भीतीने प्रत्येक वेळी थोडा थोडा रंग तयार केला जातो. अशा वेळी दर वेळी बरोब्बर तीच छटा त्याला करता येईल याची खात्री नसते. त्यामुळे कधीही रंग मिसळून भिंती रंगवू नयेत. (अर्थात अगदी छोटी जागा असेल व तयार केलेल्या एका रंगाच्या डब्यात काम होणार असेल तर भाग निराळा). आजकाल रंगाच्या हजाराच्यावर छटा कॉम्प्युटरवर करून मिळतात. त्यातीलच एखादी छटा वापरल्यास सर्व खोलीला एकसमान रंग लागतो. कारण रंगाच्या छटेतील थोडासुद्धा फरक सजावटीला मारक ठरू शकतो.
रंगांच्या बाबतीत आपण आपल्यावर मर्यादा घालून ठेवलेल्या आहेत. वॉटर बेस्ड का ऑइल बेस्ड, निळा का हिरवा एवढाच आपण विचार करतो. पण कलर इंडस्ट्रीमध्ये रंगामध्ये मिसळायच्या घटकांमध्ये इतके संशोधन झाले आहे की प्रत्येक जागेच्या कार्यपद्धतीनुसार रंग बनवले जातात. जिथे आग लागण्याची सर्वात जास्त शक्यता आहे अशा सर्वर रूममध्ये खास फायर हॅझार्ड पेंट लावला जातो. लॅब, क्लिनिक जिथे स्वच्छतेची अत्युच्चम काळजी घेतली जाते. कुठल्याही प्रकारच्या जंतूंच्या वाढीला आळा घातला जातो, अशा ठिकाणी अ‍ॅन्टी फंगल पेंट वापरला जातो. शेवटच्या मजल्यावर होणाऱ्या उन्हाच्या तडाख्यापासून वाचवायला हिट-रेझिस्टन्ट पेंट गच्चीला लावला जातो. त्याचप्रमाणे गंज पकडू नये म्हणून अ‍ॅन्टी-करोजन, एखाद्या संगमरवर किंवा नसíगक दगडासारखे भासणारा ईमिटेशन-स्टोन पेंट, चक्रावून टाकणारे टेक्चर पेंट असे कितीतरी प्रकार बाजारात मिळतात. आपल्या गरजेनुसार त्या त्या रंगाचा विचारपूर्वक वापर आपल्या सजावटीत करावा.

Consuming too many fruits every day can cause various health issues said doctors
तुम्हाला रोज जास्त फळे खाण्याची सवय आहे? मग शरीरावर होऊ शकतो ‘हा’ परिणाम, वाचा तज्ज्ञ काय सांगतात…
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
curd and coffee for tan removal
Tan Removal Remedy : चमकदार त्वचेसाठी घरच्या घरी करा उपाय! दही व कॉफीचा लावा मास्क; पण डॉक्टरांचे मत काय?
Black Plastic Kitchenware May Look Nice But Could Be Harming Your Health: Latest Study Finds
महिलांनो तुम्हीही स्वयंपाकघरात काळी भांडी वापरता? परिणाम वाचून पायाखालची जमीन सरकेल
Ragi Upma Recipe
२ वाटी पीठापासून नाश्त्यामध्ये बनवा नाचणीचा पौष्टिक उपमा; वाचा साहित्य आणि कृती
how to remove bad smell from bathroom
बाथरूम आणि टॉयलेटमधील दुर्गंधी दूर करण्यासाठी वापरा ‘ही’ घरगुती ट्रिक
kala lake, Kalyan, Indurani Jakhad, contractor Notice,
कल्याण : काळा तलाव साफसफाईत दिरंगाई करणाऱ्या ठेकेदाराला नोटीस, आयुक्त डॉ. इंदुराणी जाखड यांची कारवाई
additional commissioner of pcmc on Fire At Unauthorized Scrap Shops
पिंपरी-चिंचवड: “अनधिकृत गोदामांवर नंतर बोलू आधी आग विझवू”, अतिरिक्त आयुक्तांची अनधिकृत गोदामांना बगल!

सध्या एकाही भिंतीला टेक्चर पेंट केला नाही असे घर सापडणे मुश्कीलही नहीं, नामुमकिन झाले आहे. जास्त पसे खर्च न करता थोडक्यात सजावटीला उठाव देण्याची किमया टेक्चर पेंटमध्ये खचितच आहे. सजावटीची मूलभूत तत्त्वे जशी लक्ष वेधून घेणे, केंद्रिबदू तयार करणे, पोत-रंग यांच्या अचूक वापराने प्रमाणबद्धता व सुसंगती तयार करणे, या गोष्टी टेक्चर पेंटमुळे बऱ्याच प्रमाणात साध्य होतात. बरेच वेळा आपल्याला नसíगक, थोडा ओबडधोबड पोत असलेल्या भिंती आवडतात. पण त्यावर जमणारी धूळ, त्याची देखभालीवर येणारी मर्यादा यामुळे मनाला आवर घालावा लागतो. पण टेक्चरपेंटमुळे या मर्यादा कधीच मागे पडल्या आहेत. दिसायला रफ पण स्पर्शाला गुळगुळीत अशा टेक्चरमुळे दिसायला आपल्याला पाहिजे तसे पण देखभालीवर शून्य खर्च होतो. शब्दश: अगणित टेक्चर्स आपण भिंतीवर काढू शकतो आणि तेही विविध रंगांत. स्टेनसिलिंग म्हणून जो भिंतीवर छाप काढण्यासारखा प्रकार आला आहे त्याने कुठलेही चित्र आपण रेखाटू शकतो. फक्त या सर्व प्रक्रियेला चांगला निष्णात माणूस असणे गरजेचे आहे.

हे झाले काही रंगांचे प्रकार. पण बरेच वेळेला चुकीच्या रंगकामामुळे काही समस्या निर्माण होतात जसे (भिंतीचे) ब्लीडिंग. यामध्ये दोन वेगवेगळ्या रंगांच्या रासायनिक प्रक्रियेमुळे भिंतीवर डाग तयार होतात. यावर उपाय म्हणजे आधीचा जुना रंग पूर्णपणे काढून टाकून मग नवीन रंग लावणे. ब्लीस्टिरग किंवा फोड आल्यासारखी भिंत दिसू लागल्यावर समजावे की हे एकतर चिकटपणा कमी पडून रंग भिंतीपासून फुगून वर आला आहे किंवा भिंतीवर ओल आली आहे. अशा वेळी फोड आलेला भाग घासून, साफ करून परत रंगकाम करावे लागते. जसे आधी सांगितले, जिथे ओल असते तिथे रंग नीट बसणे अशक्य आहे. त्यामुळे तो भाग पूर्ण कोरडा करून (वॉटरप्रूफिंग वगरे करून) आणि भविष्यातपण पूर्ण कोरडा राहील याची काळजी घेऊनच परत रंगकाम करावे. त्याचप्रमाणे पेंटर्स निष्णात नसतील तर खराब कामगिरीमुळे ब्रशचे फराटे भिंतीवर दिसू शकतात. ज्यामुळे सगळ्या सजावटीचा बोऱ्या वाजू शकतो. यावर एकच उपाय म्हणजे चांगल्या पेंटरकडून सगळे रंगकाम परत करून घेणे. खर्च वाचवण्यासाठी किंवा बाकी काही कारणांनी निकृष्ट दर्जाचा रंग वापरल्यास रंगातून पावडर निघू शकते. त्यामुळे रंग चांगल्या कंपनीचा आहे की नाही याची खात्री करून घ्यावी.

सजावटीमधील रंगकामाची ही क्रिया सजावटीला एका उंचीवर नेऊन ठेवते. रंगकाम झाले म्हणजे सजावट पूर्ण झाली. असे म्हणतात की ज्याचा शेवट गोड, ते सगळेच गोड. त्यामुळे असे चकचकीत, गुळगुळीत भिंती असलेले घर क्लायंटच्या हाती परत सोपवताना त्यांच्या चेहऱ्यावरील हास्य आम्हाला खूप समाधान देऊन जाते.

वैशाली आर्चिक

सौजन्य – लोकप्रभा
response.lokprabha@expressindia.com

Story img Loader