रंगाच्या चकाकीवर रंगकामाची परिणामकता बऱ्याच प्रमाणात अवलंबून असते. चकाकीवरून तो रंग कुठे वापरायचा हे ठरते. चढत्या भाजणीनुसार फ्लॅट, मॅट, एगशेल, सॅटीन, सेमी ग्लॉस, हाय ग्लॉस अशी विभागणी होते. फ्लॅट, मॅट, एगशेलपर्यंतचे फिनििशग हे कमी चकाकी देणारे आहे. त्यांचा वापर शक्यतो कमी वर्दळीच्या जागी करावा, जसे की बेडरूम, स्टडीरूम वगरे. या प्रकारच्या फिनििशगवरून कमी प्रमाणात प्रकाश परावर्तीत होतो. भिंतीवरील छोटे-मोठ्ठे खड्डे या फिनिशिंगने बऱ्यापकी झाकले जातात. पण कोणाला अगदी जोर लावून भिंत धुवायची सवय असेल तर अशा वेळी हा रंग जरा खराब होऊ शकतो. बाकी सॅटीन, सेमी ग्लॉस, हाय ग्लॉस या फिनिशिंगमध्ये प्रकाश बराच परावर्तीत होतो व त्यामुळे रंगाला चकाकी अधिक येते. जास्त वर्दळीच्या ठिकाणी जसे हॉटेल, लॉबी, ऑफिस किंवा घरात दिवाणखान्यात या फिनिशिंगचे रंग खास करून वापरावेत. तसेच स्वयंपाकघरात जिथे डाग पडायची शक्यता जास्त आहे, अशा ठिकाणी थोडा ग्लॉसी रंगच लावणे जास्त व्यवहारी ठरते. त्यामुळे कितीही जोर करून या भिंती घासल्या तरी रंग खराब होत नाही. पण अर्थातच रंगाची चकाकी ही तुमच्या सजावटीच्या थीमवरसुद्धा अवलंबून असते. फक्त ते एखादे हॉटेल आहे म्हणून सगळ्या भिंती चकमकायला पाहिजेत असे नाही. सजावट जर नसíगक गोष्टी वापरून किंवा इंडस्ट्रिअल लुकवर आधारित असेल तर अशा वेळी मॅट फिनिश, रफ पोत असलेल्या भिंती जास्त अनुरूप दिसतील.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा