Cleaning Hacks: घरामध्ये सकारात्मक, उत्साही वातावरण असावे असे प्रत्येकाला वाटत असते. यासाठी घर नियमितपणे साफ करणे आवश्यक असते. ठराविक काळानंतर केर काढणे, फरशी-लादी पुसणे आवश्यक असते. स्वच्छ घरामध्ये लक्ष्मीचा वास असतो असे म्हटले जाते. सोप्या पद्धतीने सांगायचे झाले तर स्वच्छतेमुळे घरातील लोकांचे आरोग्य सुधारते. परिणामी काम करायला चालना मिळते. व्यवस्थितपणे साफसफाई करुनही एखादा कोपरा अस्वच्छ राहू शकतो. बरेचसे लोक घर साफ करण्यासाठी महागड्या उत्पादनांची मदत घेतात. यामध्ये पैसे खर्च करण्याऐवजी काही सोप्या ट्रिक्स वापरुन तुम्ही फुकटात घर पूर्णपणे स्वच्छ करु शकता.

ऑलिव्ह ऑइलने स्वयंपाकघराचा कठडा साफ करावा.

स्वयंपाकघराच्या कठड्यावर गॅस/ स्टोव्ह ठेवलेला असतो. जेवण बनवताना हा भाग घाण होत असतो. काहीजणांकडे स्वयंपाकघरात लाकडी कठडा लावलेला असतो. त्यावर बऱ्याचवेळेस डाग पडलेले असतात. हे डाग काढण्यासाठी कठड्यावर किंचित ऑलिव्ह ऑइल टाकून ते कपड्याने पुसून घ्यावे.

bmc launched cleanliness drive to clean Mumbai
महापालिकेने घेतला शहर स्वच्छतेचा वसा, दररोज स्वच्छता मोहीम राबविण्याचा महापालिकेचा निर्णय
bjp ravindra chavan
Ravindra Chavan : ‘उपरा’ डोंबिवलीकर ते भाजप प्रदेश…
kitchen tips hacks how to clean kitchen utensils shiny
Kitchen Hacks : चपातीमुळे काळा पडलेला, खराब झालेला तवा काही मिनिटांत होईल चकाचक; वापरा फक्त ‘या’ सोप्या ट्रिक्स
Car Cabin Bad Smell
तुमच्याही गाडीमध्येही सतत घाणेरडा दुर्गंध येतो? मग एका स्वस्तातल्या सोप्या उपायाने गाडी आतून होईल फ्रेश
Plastic Chair Cleaning Tips
काळ्या-पिवळ्या पडलेल्या प्लास्टिकच्या खुर्च्या ‘या’ तीन छोट्या उपायांनी करा स्वच्छ
Bad Breath Smell Home Remedies
तोंडातून येणारी दुर्गंधी काही सेकंदांत होईल दूर! फक्त करून पाहा ‘हा’ सोपा उपाय; मिळेल ताजेतवानेपणाचा अनुभव
pcmc health department to take punitive action if found garbage thrown in openly
कचरामुक्त पिंपरी-चिंचवडसाठी पुढाकार; आठ क्षेत्रीय कार्यालयांतील ८० ठिकाणांवर लक्ष
How to Clean Your Laptop Screen
लॅपटॉप, टीव्हीची स्क्रीन साफ करताना टाळा ‘या’ चुका; नाही तर वाढेल खर्च

डायबिटीजच्या रुग्णांनी रक्तातील साखरेचे प्रमाण वाढवणाऱ्या ‘या’ फळांचे आणि पदार्थांचे सेवन करणे टाळावे

साफसफाई करताना शेव्हिंग क्रीमचा वापर करावा.

दाढी करण्यासाठी वापरली जाणारी शेव्हिंग क्रीम घरातील कार्पेट साफ करण्यास वापरता येऊ शकते. त्याशिवाय बाथरुममधील फरशी आणि काचा देखील शेव्हिंग क्रीमने स्वच्छ करता येतात.

दुर्गंधी नाहीशी करण्यासाठी लिंबाची मदत घ्यावी.

अनेकदा साफसफाई करुनही घरामध्ये घाणेरडा कुबट वास येत असतो. हा वास घालवण्यासाठी लिंबू वापरणे योग्य ठरते. स्वयंपाकघरामधील कटींग बोर्ड धुण्यासाठीही याचा वापर करता येतो. एक लिंबू मध्यभागी कापून त्याचा अर्धा तुकडा त्या बोर्डवर घासवा, जेणेकरुन साफ होण्याबरोबरच त्याला सुवास देखील येईल.

होळीला रंग खेळताना वापरा फक्त ‘हर्बल कलर्स’; अशा प्रकारे ओळखा खऱ्या-खोट्यातला फरक

घरातील पंखे पुसण्यासाठी ही ट्रिक वापरा.

पंखे दिवसभर सुरु असल्यामुळे ते लवकर घाण होतात. ते साफ करताना त्यांच्या पातींवरील कचरा कपड्यांवर किंवा खालच्या कार्पेटवर पडू शकतो. अशा वेळी पिलो कव्हर पंख्याच्या पातींमध्ये अडकवून मग पंखा पुसावा.

Story img Loader