Diabetes in Early Stage: आजच्या धकाधकीच्या जीवनात आणि व्यस्त लाइफस्टाइलमुळे, मधुमेह ही केवळ भारतातच नाही तर जगभरात मोठी समस्या बनली आहे. त्याचे टाईप १ आणि टाईप २ असे दोन प्रकार आहेत. या आजाराचे योग्य व्यवस्थापन केले नाही तर इतर अनेक शारीरिक समस्या उद्भवू शकतात. मधुमेहावर नियंत्रण ठेवण्यासाठी त्याची लक्षणं ओळखणे गरजेचे आहे.
मधुमेहाची लक्षणं कशी ओळखावी?
१. वारंवार भूक लागणे
मधुमेहाच्या रुग्णांना वारंवार भूक लागते. तुम्हालाही अशा समस्या येत असतील तर उशीर न करता ताबडतोब तुमची आरोग्य तपासणी करून घ्या.
२. अतृप्त तहान
जर तुमचा घसा पुन्हा पुन्हा कोरडा होत असेल तर पाणी पिऊनही तहान भागत नाही. अशा परिस्थितीत तुम्ही तुमच्या साखरेची तपासणी करून घ्यावी.
(हे ही वाचा: कलिंगड खाण्याची योग्य वेळ काय? चुकीच्या वेळेचा किडनीवर होऊ शकतो परिणाम)
३. वारंवार लघवी येणे
जर तुम्हाला रात्री चार-पाच वेळा लघवी करण्यासाठी उठावं लागत असेल, तर तुमची साखर तपासली पाहिजे, कारण ते मधुमेहाचे एक मोठे लक्षण आहे.
४. वजन कमी होणे
तुमचे वजन अचानक झपाट्याने कमी होऊ लागले तर ते मधुमेहाचे लक्षण असू शकते, त्यामुळे वेळीच सावध होण्याची गरज आहे.
(हे ही वाचा: विश्लेषण: आईस्क्रीममुळे शरीराला खरंच थंडावा मिळतो का? जाणून घ्या)
५. थकवा येणे
जर तुम्ही न थकता १० ते १२ तास काम करायचट, पण आता ८ तास काम केल्यावर तुम्हाला थकवा येऊ लागला असेल तर, तुम्ही मधुमेहाची तपासणी करून घ्या.
(येथे दिलेली माहिती घरगुती उपचार आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. ते अवलंबण्यापूर्वी, नक्कीच वैद्यकीय सल्ला घ्या.)