गुळ हा शरिरासाठी पौष्टीक आहे हे सगळ्यांनाच माहिती आहे. अनेक घरांमध्ये रोज गूळ खाल्ला जातो. काही लोक हिवाळ्यात साखरेऐवजी गूळ खाणे पसंत करतात कारण ते शरीराला उबदार ठेवते. गूळ तुमच्या आरोग्यासाठी नक्कीच खूप फायदेशीर आहे, पण आजकाल बाजारात पौष्टीकतेच्या नावाखाली नकली गुळ बनवण्याचे काम वाढले आहे. बाजारात बिनदिक्कतपणे बनावट गूळ मिळत आहे.
तुम्हाला माहितीच की, बनावट गूळ तुमच्या आरोग्यासाठी खूप हानिकारक आहे. हे खाल्ल्याने आपल्या शरीराचे खूप नुकसान होऊ शकते. आज आम्ही तुम्हाला बनावट गुळ आणि पौष्टीक गूळ ओळखण्याची सोपी पद्धत सांगणार आहोत. ज्याद्वारे तुम्ही विकत घेतलेला गूळ खरा आहे की नकली हे तुम्ही सहज शोधू शकता? गूळ खरेदी करण्यासाठी काही टिप्स फॉलो केल्यास तुम्हाला शुद्ध आणि बनावट गुळातील फरक सहज समजू शकतो. चला तर मग जाणून घेऊया शुद्ध गूळ ओळखण्याच्या काही स्मार्ट टिप्स.
या सर्व गोष्टी बनावट गुळात मिसळल्या जातात
गूळ हे एक सुपरफूड आहे जे तुमच्या शरीराला डिटॉक्स करते. त्यात कॅल्शियम, लोह, पोटॅशियम, झिंक, प्रथिने आणि व्हिटॅमिन बी सारखे पोषक घटक मुबलक प्रमाणात आढळतात. गुळ हा उष्ण मानला जातो, त्यामुळे थंडीच्या दिवसात तो खाल्ला जातो. त्यामुळे तुम्ही खात असलेला गूळ खरा आहे की नकली हे जाणून घेणे तुमच्यासाठी खूप महत्त्वाचे आहे? आजकालचा काळ असा आहे की लोकांना फसवून व्यावयायीक जास्त पैसे कमवत आहेत. बनावट आणि भेसळयुक्त गुळात कॅल्शियम कार्बोनेट आणि सोडियम बायकार्बोनेट मिसळले जाते. जे शरीरासाठी खूप हानिकारक आहे. तर सोडियम बायकार्बोनेटचा वापर रंग देण्यासाठी केला जातो ज्याद्वारे तो खरा गुळ वाटतो.
गूळ खरेदी करायला गेलात तर या रंगाचा खरेदी करा
नेहमी तपकिरी रंगाचा गूळ खरेदी करा. पिवळा किंवा हलका सोनेरी रंगाचा गूळ खरेदी करु नका, कारण तो खोटा असण्याची शक्यता आहे. उसाचा रस बराच वेळ उकळल्यानंतर त्यात रासायनिक बदल होतात. त्यामुळे त्याचा रंग गडद लाल आणि तपकिरी होतो.
हेही वाचा >> Dark Underarms: काळवंडलेल्या अंडरआर्म्समुळे हैराण आहात? ‘हे’ घरगुती उपाय करून पहा, आठवडाभरात मिळेल रिझल्ट
हा आहे नकली गुळाचा रंग
तुम्हाला बाजारात पांढरा, हलका पिवळा किंवा लाल असा नकली गूळ मिळेल. जर तुम्ही ते पाण्यात टाकले तर भेसळयुक्त पदार्थ भांड्याच्या तळाशी जातील, तर शुद्ध गूळ पाण्यात पूर्णपणे विरघळेल.
कडक गूळ
शुद्ध गुळ किती कडक आहे हे देखील ओळखता येतं. गूळ जितका कडक तितकाच त्याच्या शुद्धतेची हमी जास्त असते. अशा स्थितीत बाजारातून गूळ घेण्याआधी पहा, तो कडक आहे की नाही?